Health Insurance vs Mediclaim: आरोग्य विमा विरुद्ध मेडीक्लेम

Reading Time: 3 minutes

Health Insurance vs Mediclaim: 

आरोग्य विमा (Health Insurance) आणि मेडीक्लेम (Mediclaim) यामध्ये दोघांमध्ये फरक आहे हे अनेकांना माहिती नसतं. आजच्या लेखात आपण आरोग्य विमा आणि मेडिक्लेम यामधला फरक समजून घेऊया.

भविष्याची तरतूद करून ठेवलीच पाहिजे हे आपल्याला सध्याच्या काळात चांगलेच समजले आहे. खरे पाहता आपण सर्व त्याबाबत जागरूक आहोतच. त्यासाठीची पहिली पायरी म्हणजे विमा काढून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठीची आर्थिक बाजू सुरक्षित करणे.

आरोग्य विमा आणि मेडीक्लेम वरवर पाहता सारखे वाटत असले तरी या दोन्हींमध्ये बराच फरक आहे. या दोन्ही पैकी कोणतीही पॉलिसी घेण्याआधी यातील फरक समजून घेतल्यास आपल्या गरजेनुसार पॉलिसी घेता येईल.

हे नक्की वाचा: आरोग्य विमा –  काही महत्वाच्या संज्ञा  

Health Insurance vs Mediclaim : आरोग्य विमा आणि मेडीक्लेम मधील फरक –

Mediclaim: मेडीक्लेम पॉलिसी –

मेडीक्लेम पॉलिसी –

 • आपल्याला रुग्णालयात दाखल झाल्यानंतर लागणार्‍या खर्चाची जबाबदारी मेडीक्लेम पॉलिसी घेते असे म्हणायला हरकत नाही. आजार, एखादा अपघात किंवा पूर्व-नियोजित शस्त्रक्रियेसाठी मेडीक्लेमचा उपयोग होतो.
 • यासाठी कॅशलेस आणि आधी आपण बिल भरून नंतर बिलाची रक्कम विमा कंपांनीकडून घेणे या दोन्ही सुविधा उपलब्ध असतात. 
 • कॅशलेस म्हणजे आपल्याला रुग्णालयामध्ये कोणतीही रक्कम भरण्याची गरज नसते. मात्र कॅशलेस सुविधा मिळवण्यासाठी आपण उपचार केवळ विमा कंपनीसोबत संलग्नीत रुग्णालयांमध्येच घ्यावे लागतात. अन्यथा विमा कंपनीच्या नियम व अटींनुसार आपल्याला अन्य रुग्णालयामधील खर्चाची भरपाई दिली जाते.
 • मेडीक्लेम पॉलिसी ठराविक कालावधीसाठी मर्यादित असते. त्यानंतर आपल्याला पॉलिसी सुरू ठेवायची असल्यास त्याचे नूतनीकरण करावे लागते.
 • कोणत्याही मेडीक्लेम पॉलिसी मध्ये रुग्णालयाचे शुल्क, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी व डिस्चार्जनंतर घेतले जाणारे उपचार, ओपीडी शुल्क, रुग्णालयातील आयसीयू, बेड इ.चे शुल्क, रुग्णालयात दाखल होण्याआधी आणि नंतर लागणारा खर्च हे सर्व खर्च सामायिक केलेले आहेत.  
 • मेडीक्लेमद्वारे आपणास फक्त रुग्णालयामध्ये दाखल झाल्या नंतरच्याच खर्चाची भरपाई मिळते.
 • यामध्ये कोणतीही जास्तीची सुविधा जसे की बाळंतपणाच्या खर्च इ. मिळत नाही.
 • मेडीक्लेमतर्फे मिळणार्‍या रुग्णालयाच्या खर्चाची भरपाई ही मर्यादित आहे, ती पाच लाखाच्या वर नाही मिळू शकत.          
 • मेडीक्लेमवर आयकर कायद्याच्या कलम 80ड च्या अंतर्गत टॅक्स वरती रुपये पंचवीस हजारपर्यन्त सूट मिळते. जर आपण 60 वर्षाच्या वर असाल तर ही रक्कम रुपये पन्नास हजार पर्यन्त वाढते. तसेच आपण 60 वर्षांच्या वर असाल आणि आपल्या पॉलिसी मध्ये आपले पालक समाविष्ट असतील तर ही रक्कम रुपये 1 लाख पर्यन्त आपण क्लेम करू शकता.

महत्वाचा लेख: आरोग्य विम्यासंदर्भात काही महत्वाच्या गोष्टी

Health Insurance: आरोग्य विमा पॉलिसी –

 • आरोग्य विमा हा आपल्याला आपल्या आरोग्याशी निगडीत संपूर्ण संरक्षण देतो. आपल्याला लागणार्‍या प्रत्येक वैद्यकीय खर्चाची जबाबदारी आरोग्य विमा घेते.
 • यात देखील आपण कॅशलेस पद्धत वापरू शकतो अथवा आपण बिल भरून नंतर ते विमा कंपनीला क्लेम करू शकतो.
 • आरोग्य विमा रुग्णालयीन खर्चापेक्षा जास्त संरक्षण देतो. जसे कॅन्सरसाठीची उपचार प्रणाली यामध्ये समाविष्ट आहे, हृदयरोग, किडनीचे आजार इ. गंभीर आजारांचा यात समावेश आहे.  
 • आरोग्य विम्याचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्हाला कोणत्याही गंभीर आजाराचे निदान झाल्यावर एकत्र रक्कम दिली जाते. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या बिलाची आवश्यकता नसते. आपण कितीही वेळा यासाठी क्लेम करू शकत असलो, तरी आपली विमा राशीची ठरलेली रक्कम मिळेपर्यंतच आपणास लाभ घेता येतो.  
 • आरोग्य विम्यामध्ये रुग्णवाहिका खर्च, प्राणी चावल्यावरचा खर्च, प्रसूती खर्च इ. सर्व खर्च सामायिक केलेले असतात.
 • आरोग्य विमा अंतर्गत मिळणारा लाभ फक्त रुग्णालयात दाखल होण्याइतकाच मर्यादित नसतो. तर रुग्णालयात दाखल होण्याआधी आणि नंतर लागणारा खर्च देखील यात ग्राह्य धरला जातो. तसेच जर अपघातामुळे आपले उत्पन्न थांबले असेल तर भरपाईचा सुद्धा यात समावेश आहे.  
 • प्रत्येक विमा कंपनी अंतर्गत भरपाई रक्कम वेगवेगळी असते. 
 • आरोग्य विमा आणि मेडीक्लेम दोन्हींमध्ये आयकर कायद्यानुसार सवलत मिळते. 
 • मेडीक्लेम प्रमाणेच आरोग्य विमा मध्ये देखील रुपये पंचवीस हजार पर्यन्त आपणास क्लेम करता येतात. तसेच वय वर्ष 60 च्या वरती आपण रुपये 50,000 तर आपल्या पालकांचा देखील विमा असेल तर 1 लाखापर्यन्त  इन्कम टॅक्स मध्ये सूट मिळते.

वरील उपयुक्त माहिती मूळे आपल्या मनामधील मेडीक्लेम (Mediclaim) आणि आरोग्य विमा (Health Insurance) यामधील संभ्रम दूर झाला असेल आणि आता आपण नक्कीच आपल्या गरजेप्रमाणे दोन्ही पैकी योग्य निवड करू शकाल.  

आरोग्य विमासंदर्भातील अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा  

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web Title: What is Difference between Health Insurance And Mediclaim? Marathi inf0 Arthasakshar

Web Search: Difference between Health Insurance And Mediclaim in Marathi,  Health Insurance vs Mediclaim in Marathi, Health Insurance vs Mediclaim Marathi Mahiti, Health Insurance and Mediclaim in marathi

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *