Life Insurance FAQ
Reading Time: 3 minutes

Life Insurance FAQ

आजच्या लेखात आपण जीवनविमा खरेदी करताना पडणारे ६ मूलभूत प्रश्नांबद्दल (Life Insurance FAQ) माहिती घेणार आहोत. 

जीवनविमा – “जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी…” माणसाचे आयुष्य अनिश्चित घटनांनी भरलेले असते. जसं आयुष्य अनिश्चित तसंच जगणंही अशाश्वत. आपल्या आकस्मिक मृत्यूमळे आपल्या कुटुंबियांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू नये म्हणून आपण जीवनविमा खरेदी करतो. परंतु, जीवनविमा खरेदी करतानाही योग्य योजनेची निवड करणं अत्यंत आवश्यक आहे. आजच्या लेखात आपण जीवनविमा पॉलिसी संदर्भात काही महत्वाच्या प्रश्नोत्तरांची माहिती घेऊया. 

विशेष लेख: कोरोना व्यतिरिक्त आरोग्य विमा खरेदी करण्याची ६ महत्वाची कारणे

Life Insurance FAQ: जीवनविमा खरेदी करताना पडणारे ६ मूलभूत प्रश्न 

१. किती रकमेचा जीवनविमा घेणं आवश्यक आहे?

 • सर्वात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला किती रकमेचा जीवन विमा घेणे आवश्यक आहे याचे मूल्यांकन करणे. यासाठी मूल्यांकनाच्या अनेक पद्धती आहेत. 
 • आपली कौटुंबिक पार्शवभूमी, अवलंबून असलेल्या व्यक्तींची संख्या व त्यांचे उत्पन्न याचा विचार करून मूल्यांकनाची पद्धत निवडावी. 
 • यासाठीची सर्वात लोकप्रिय आणि सर्वसाधारण व्यक्तीला लागू पाडणारी पद्धत म्हणजे तुमचे उत्पन्न, आर्थिक जबाबदाऱ्या आणि मालमत्तेच्या प्रमाणात जीवनविमा खरेदी करणे. 

मूल्यांकनाचे सूत्र :

जीवनविमा =  [वार्षिक उत्पन्नाच्या 10 ते 12 पट रक्कम + तुमच्या आर्थिक जबाबदाऱ्या (कर्ज, देणी, इ.) – तुमची मालमत्ता (राहते घर सोडून)]

२. एकापेक्षा जास्त विमा योजना घ्यावात का? 

 • आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा जास्त असल्यास जास्त रकमेचा विमा खरेदी करावा लागतो. 
 • अशावेळी दोन वेगवेगळ्या विमा योजना खरेदी करण्यापेक्षा मोठ्या रकमेची एकच विमा योजना खरेदी करावी. कारण यामध्ये विमा हप्त्यांमध्ये बचत होऊ शकते. 
 • जर प्रिमिअममध्ये फारशी बचत होत नसेल, तर तुम्ही दोन वेगवेगळ्या पॉलिसी खरेदी करू शकता. 
 • दोन वेगवेगळ्या विमा पॉलिसी असल्यास एका विमा पॉलिसीचा क्लेम काही कारणांनी नाकारला गेल्यास दुसऱ्या पॉलिसीचा क्लेम मंजूर होईल हा आशावाद फारसा उपयोगी पडणारा नाही. 
 • एका विमा योजनेचा क्लेम काही कारणांनी नाकारला गेल्यास दुसऱ्या पॉलिसीचा क्लेम मंजूर होण्याची शक्यता तुलनेने कमी असते. कारण कुठलीही विमा कंपनी विनाकारण क्लेम नामंजूर करत नाही. सर्व विमा कंपन्या आयआरडीएच्या मार्गदर्शक तत्वांनुसारच काम करतात. 

एकापेक्षा जात विमा योजना खरेदीचा निर्णय घेताना विमा हप्त्यांचा व आपल्या गरजेचा विचार करा. 

३. मुदतीचा विमा (Term insurance) खरेदी करणं आवश्यक आहे का? 

 • हो, सर्वसामान्यपणे तुम्ही कमाईला सुरुवात केल्यावर मुदतीचा विमा खरेदी करा. एकूणच प्रीमियमची रक्कम तुलनेने कमी असते. परंतु, वाढत्या वयाबरोबर प्रीमिअम वाढत जातो. 
 • तुम्ही किती वर्षं नोकरी करणार आहात, महागाईचा दर पुढे किती वाढणार आहे, याचा विचार  करून मुदत विम्याची रक्कम निश्चित  करा. 
 • मुदत विम्यामध्ये मुदत पूर्ण होईपर्यंत हप्त्याची रक्कम बदलत नाही. परंतु, एक जरी हप्ता चुकला तरी विमा पॉलिसी रद्द होण्याची भीती असते.

सामन्यतः तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या वीस पट रकमेचा मुदत विमा खरेदी करा. 

हे नक्की वाचा: विमा पॉलिसीमध्ये अतिरिक्त कव्हरेज देणारे “रायडर” तुम्हाला माहिती आहेत का?

४. विमा रायडर्स म्हणजे काय? 

 • आपल्या विद्यमान विमा पॉलिसीमध्ये जोडता येणारी अतिरिक्त कव्हरेज सुविधा म्हणजे विमा रायडर. यामुळे विस्तारित कव्हरेज घेता येते. 
 • जीवन विमा योजनेसोबत अपघाती मृत्यू आणि अपंगत्व यासाठी रायडर घेण्याची सुविधा आहे. ही सुविधा मूळ प्रिमिअममध्ये जास्तीची रक्कम देऊन घेता येते. ही जास्तीची रक्कम अत्यंत माफक असते. 
 • रायडर सुविधेमुळे विमा हप्त्यात प्रति हजारी विमा रकमेला (सम अश्युअर्ड) एक रुपया इतकी वाढ होते. उदा. दहा लाख रुपयांच्या विम्यासाठी १००० रुपयांचा हप्ता जास्त भरावा लागेल. 

पॉलिसी घेताना रायडर घेतला नसेल तर, नंतर कधीही अधिकचा हप्ता भरून हा रायडर घेता येतो. 

५. विमा रायडर्स खरेदी करावेत का? 

 • विमा रायडर्स सर्वसमावेशक असतीलच असे नाही. काही विमा योजना रायडर्स देताना स्वतंत्र पॉलिसीपेक्षा कमी कव्हरेज देतात. 
 • उदा. क्रिटिकल इलनेसमध्ये ठराविक ४ ते ५ आजार कव्हर करतात. याऐवजी काही आरोग्य विमा कंपन्या क्रिटिकल इलनेस योजनेमध्ये यापेक्षा अधिक आजार कव्हर करतात. अपघात योजनेच्या बाबतीतही स्वतंत्र वैयक्तिक अपघात विमा अधिक व्यापक कव्हरेज देतो.
 • रायडर्स सुविधा घेताना आपली आवश्यकता, रायडर्सची व्याप्ती, आपल्याकडील इतर विमा योजना, तसेच ज्या रायडर्स खरेदी करणार आहोत त्यासाठी उपलब्ध असणारी स्वतंत्र विमा योजना याचा विचार करून रायडर्स संदर्भात योग्य निर्णय घ्या. 

रायडर घेण्यापूर्वी त्यासंदर्भातील नियम, अटी व फायदे कोणते समजून घेणे आवश्यक आहे.

महत्वाचा लेख: फसव्या विमा पॉलिसींचा सापळा

६.   जीवनविमा ऑनलाईन खरेदी करावा की ऑफलाइन?

 • जवळपास सर्वच विमा कंपन्या ऑफलाइन आणि ऑनलाइन विमा खरेदीची सुविधा देतात.
 • ऑनलाईन विमा खरेदी करताना अनेकदा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, युपीआय, डिजिटल वॉलेट, इ. मार्फत खरेदी केल्यास प्रिमिअममध्ये काही सवलत दिली जाते. अशावेळी  ऑनलाईन विमा खरेदी स्वस्त पडू शकते. 
 • ऑनलाईन विमा खरेदी करताना फॉर्म आपण स्वतः भरत असल्यामुळे Utmost good faith म्हणजेच विश्वासार्हता जपली जाण्याची शक्यता तुलनेने अधिक असते. त्यामुळे भविष्यात विमा क्लेम नामंजूर होण्याचे कारण उरत नाही. 
 • ऑफलाइन विमा खरेदीमध्ये सर्वसाधारणपणे विमा प्रतिनिधीमार्फतच विमा खरेदी केला जातो. विमा रकमेसोबत त्यामध्ये विमा प्रतिनिधींचे कमिशनही अंतर्भूत केलेले असते. त्यामुळे ऑफलाईन विमा खरेदी करताना जास्त रक्कम मोजावी लागते. 
 • विमा प्रतिनिधी जाणकार व अनुभवी असल्यास तुमच्याशी बोलून, तुमची परिस्थिती समजून घेऊन तुम्हाला सुयोग्य विमा योजना सुचवू शकतो.

जर तुम्हाला विमा संकल्पनेबद्दल व ऑनलाईन विमा खरेदीबद्दल इत्यंभूत माहिती असेल आणि विविध विमा योजना पडताळून पाहणे शक्य असेल तर तुम्ही ऑनलाईन विमा खरेदी करू शकता अन्यथा विमा प्रतिनिधीमार्फत विमा खरेदी करणं उत्तम. 

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: Life Insurance FAQ Marathi, Life Insurance FAQ in Marathi, Life Insurance FAQ Marathi Mahiti, 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपनी ही एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असलेली, व्यक्ती अथवा समूहाने विशिष्ट उद्देशाने स्थापन संस्था आहे तिला शाश्वत उत्तराधिकार असतो. कायद्याने तिला स्वतंत्र व्यक्तीसारखी कृत्रिम ओळख दिली असून तिला स्वतःची मुद्रा (Seal) असते. ज्यावर तिचे नाव, नोंदणी वर्ष आणि नोंदणी केलेले राज्य याचा उल्लेख असतो. त्याचा उपयोग कंपनीच्या महत्वाच्या कागदपत्रांवर केला जातो. व्यक्तीची ओळख ज्याप्रमाणे सहीने सिद्ध होते त्याप्रमाणे कंपनीची ओळख तिच्या मुद्रेने होते. अशा प्रकारे कंपनीची मुद्रा असण्याचे कायदेशीर बंधन आता नाही. तरीही काही गोष्टींची अधिकृतता स्पष्ट करण्यासाठी अजूनही याची गरज लागते. भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष प्रकारावरून चार तर त्यावर नियंत्रण कोणाचे? यावरून तीन प्रकार आहेत. याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात.

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…