Health Insurance : जाणून घ्या वैयक्तिक गंभीर आजार, फॅमिली फ्लोटर व वैयक्तिक आरोग्य विमा योजनेबद्दल

Reading Time: 2 minutes

जाणून घ्या वैयक्तिक गंभीर आजार, फॅमिली फ्लोटर व वैयक्तिक आरोग्य विमा योजनेबद्दल 

सतत वाढणारी महागाई बघता वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्या व कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आरोग्य विमा असणे अत्यंत महत्वाचे आहे.आरोग्य विमा असल्यामुळे वैद्यकीय आणीबाणी मध्ये आर्थिक अडचण भासत नाही. आरोग्य विमा योजनेमध्ये पॉलिसी धारकाने घेतलेल्या कव्हरेजच्या बदल्यात विमा कंपनीस नियमित प्रीमियम भरणे आवश्यक असते. आरोग्य विमा अंतर्गत पॉलिसी धारकाचा वैद्यकीय खर्च कव्हर केला जातो. परंतु आरोग्य विमा खरेदी करताना योग्य पॉलिसीेची निवड करणे देखील आवश्यक असते.वैयक्तिक आरोग्य विमा योजना,गंभीर आजार विमा योजना, फॅमिली फ्लोटर योजना यामध्ये निवड करणे ग्राहकास काहीवेळेस कठीण जाते.

 

हेही वाचा – Smoking affects health insurance premium : तुम्ही सिगारेट ओढत असाल तर विम्याबाबत ‘हे’ नक्की वाचा

 

१) वैयक्तिक आरोग्य विमा योजना –

 • वैयक्तिक आरोग्य विमा योजना फक्त पॉलिसी धारकास वैद्यकीय कव्हरेज प्रदान करते. पॉलिसी धारकास आरोग्यानुसार व गरजेुसार योग्य कव्हरेजची निवड करता येते. 
 • वैयक्तीक  आरोग्य विमा योजना अंतर्गत पॉलिसी धारकास हॉस्पिटलायझेशनचा खर्च, रुग्णवाहिकेचा खर्च इत्यादी आवश्यक वैद्यकीय खर्चामध्ये विमा संरक्षण मिळते. 
 • वैयक्तिक आरोग्य विमा योजनेमध्ये प्रीमियम रक्कम ही कव्हरेज रक्कम व पॉलिसीधारकाचे वय यावर अवलंबून असते. वैयक्तिक आरोग्य विमा योजना निश्चित केलेल्या ठराविक कालावधी पर्यंत मर्यादित असते, कालावधी पूर्ण झाल्यानंतर पॉलिसीधारकास विमा योजनेचे नुतनीकरण करावे लागते. 
 • वैयक्तिक आरोग्य विमा योजनेअंतर्गत पॉलिसी धारकास कॅशलेस हॉस्पिटलायझेशन क्लेम किंवा प्रतिपूर्ती हॉस्पिटलायझेशन क्लेम करता येतो.
 • भविष्यात वैद्यकीय खर्चामध्ये आपल्या आर्थिक सुरक्षिततेसाठी वैयक्तिक आरोग्य विमा योजना असणे आवश्यक आहे.

२) फॅमिली फ्लोटर योजना – 

 • फॅमिली फ्लोटर योजनेअंतर्गत संपूर्ण कुटुंबासाठी एकाच योजनेमध्ये विमा संरक्षण मिळते. फॅमिली फ्लोटर योजनेमध्ये प्रीमियम रक्कम ही मोठ्या सदस्याचे वय व घेतलेले कव्हरेज यावर अवलंबून असते. 
 • फॅमिली फ्लोटर योजनेचा प्रीमियम हा किफायतशीर असतो. कारण या योजनेअंतर्गत सर्व कुटुंबास विमा संरक्षणासाठी वेगवेगळा प्रिमियम भरावा लागत नाही. यामुळे फॅमिली  फ्लोटर योजना संपूर्ण कुटुंबाच्या संरक्षणासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
 • परंतु, लक्षात ठेवा कुटुंबातील मुलांचे वय २५ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास विमा कंपनी फॅमिली फ्लोटर योजनेअंतर्गत विमा संरक्षणास परवानगी देत नाही.
 • फॅमिली फ्लोटर योजना ही लहान कुटुंबासाठी फायदेशीर आहे.

.

हेही वाचा – Health Insurance: कोरोना व्यतिरिक्त आरोग्य विमा खरेदी करण्याची ६ महत्वाची कारणे

वैयक्तिक आरोग्य विमा योजना का फॅमिली फ्लोटर योजना निवडावी हा प्रश्न पडू शकतो.

 • वैयक्तिक आरोग्य विमा योजना किंवा फॅमिली वॉटर योजना निवडताना कुटुंबातील सदस्य, कुटुंबाचा वैद्यकीय इतिहास व आवश्यकता या गोष्टींचा विचारत घेणे गरजेचे असते.
 • वैयक्तिक आरोग्य विमा योजना किंवा फॅमिली फ्लोटर योजना यांची निवड करताना गंभीर आजार संरक्षण विमा विचारात घेणे देखील महत्वाचे ठरते.

३)गंभीर आजार विमा योजना –

 • कोणताही गंभीर आजार असल्यास उपचारासाठी होणारा वैद्यकीय खर्च शक्यतो जास्त असतो. त्यामुळे याचा परिणाम आर्थिक नियोजनावर होतो. यामुळे  आर्थिक ताण निर्माण होऊ शकतो. म्हणून अशा परिस्थितीत गंभीर आजार विमा कव्हरेज असणे महत्वाचे ठरते. गंभीर आजार विमा योजनेमध्ये 
  • हृदयविकाराचा झटका
  • स्ट्रोक
  • कर्करोग
  • अवयव प्रत्यारोपण
  • कोरोनरी बायपास इत्यादी. यांसारखे गंभीर आजार झाल्यास गंभीर आजार योजने अंतर्गत विमा संरक्षण मिळते.
 • गंभीर आजार योजनेचा प्रीमियम विमा रक्कम व कव्हर केलेल्या आजारांवर अवलंबून असतो.
 • पॉलिसी धारकाने कव्हर केलेल्या आजारांपैकी कोणताही आजार झाल्यास गंभीर आजार योजने अंतर्गत दावा करता येतो.
 • गंभीर आजार योजनेमध्ये योजना खरेदी केल्याच्या तारखेपासून ९० दिवसांचा प्रतीक्षा कालावधी असतो.

.

हेही वाचा – Health Insurance Renewal: आरोग्य विमा नुतनीकरण करताना लक्षात ठेवा या ९ गोष्टी..

लक्षात ठेवा,कोणतीही आरोग्य  विमा योजनेची निवड करताना पॉलिसी धारकाची आरोग्य स्थिती, गरज व आवश्यकता या घटकांचा विचार करणे आवश्यक आहे.

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Leave a Reply

Your email address will not be published.