Elon Musk will buy Coca Cola : ट्विटर खरेदीनंतर एलन मस्क यांचा कोका कोला कंपनी खरेदीचा विचार?

Reading Time: 2 minutes

Elon musk wants to buy coca cola

मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटर विकत घेतल्यानंतर अब्जाधीश एलन मस्क यांनी पुन्हा एकदा मजेशीर ट्विट केले आहे. ट्विटरनंतर आता मी कोकाकोला तसेच मॅकडोनाल्ड्स ‘आइस्क्रीम मशीन्स ठीक करण्यावर” लक्ष केंद्रित केले आहे, असे त्यांनी ट्विट केले आहे. सोशल मिडीयावर यांची ही मजेदार पोस्ट अत्यंत व्हायरल होत आहे. आणि यावर नेटकरी याची मजा घेत आहेत.

 

हेही वाचा – Elon Musk: एलॉन मस्क यांचा यशाचा प्रवास

 

हा आहे ट्विटमागील अर्थ
त्यांच्या या मजेशीर पोस्टमागे मोठा गहन अर्थ दडल्याचे तज्ञ सांगतात. खासगी कंपनी असल्यावर बदल करतात येतात या धोरणानुसार आत मस्क यांनी कोका-कोलासंदर्भात ट्विट केलंय. खरं म्हणजे मस्क यांनी हे ट्विट एक विनोद म्हणून पोस्ट केलं आहे. कोका-कोला बनवण्यासाठी वापरला जाणारा फॉर्म्युला आपल्याला जाणून घ्यायाचाय असा यामागील अर्थ असल्याचं सांगितलं जातंय. कोकेनचा वापर कोका-कोला बनवताना केला जात असल्याने हा नेमका फॉर्म्युला काय आहे हे जाणून घेण्यासाठी मस्क अटलांटामधील ही कंपनीच विकत घ्यायला निघाले आहेत. “मी कोका-कोला कंपनी विकत घेणार आहे, त्यात पुन्हा कोकेन टाकण्यासाठी” असं मस्क यांचं संपूर्ण ट्विट आहे.

#LeavingTwitter हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड
नेक आठवडे सुरू असलेल्या तर्क-वितर्कांनंतर अखेर टेस्ला कंपनीचे मालक इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्यासाठी प्रतिष्ठित करार केला. ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल आणि त्यांच्या कार्यकारी मंडळाने सुरुवातीला मस्कच्या ताब्यात घेण्याच्या बोलीला विरोध करण्याचा प्रयत्न केला. शेवटी, विचारविनिमय केल्यानंतर, मस्क यांच्या बाजूने निर्णय घेण्यात आला. या घोषणेनंतर लगेचच #LeavingTwitter हा हॅशटॅग ट्विटरवर नंबर एकवर ट्रेंड करू लागला. लोकांनी मायक्रोब्लॉगिंग साइटवर जाऊन घोषणा केली की ते ट्विटर सोडत आहेत कारण ते या टेकओव्हरवर खूश नव्हते. इतरांनीही सोशल मीडियावर अनेक जोक्स आणि मीम्सचा आनंद लुटला.

 

हेही वाचा – Elon musk buys Twitter : एलन मस्क बनला ट्विटरचा नवीन मालक

9.2 टक्के होते भाग भांडवल
काही आठवड्यांपूर्वी मस्क यांनी ट्विटरमधील ९.२ टक्के भागभांडवल विकत घेतले होते. त्यांनतर ते ट्विटरमधील सर्वात मोठे भागधारक बनले होते. मात्र त्यांनी कंपनीच्या संचालक मंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता. कंपनी खासगी असेल तर त्यात बदल घडवता येतात असंही यावेळी ते म्हणाले होते. मस्क यांनी ट्विटर खरेदीसाठी दिलेल्या प्रस्तावानंतर ट्विटरच्या समभागाने ९ टक्क्यांची उसळी घेतली होती. त्यानंतर काही दिवसांनी मस्क यांनी ट्विटर विकत घेतलं होतं. त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना मुक्तपणे संवाद करण्याचं हे माध्यम अधिक युझर फ्रेण्डली आणि ओपन सोर्स माध्यम झालं पाहिजे असं मस्क म्हणाले होते.

काय म्हणाले मस्क साहेब
ट्विटर विकत घेतल्यानंतर मुक्तपणे बोलणं, व्यक्त होणं हा लोकशाहीचा महत्वाचा पाया आहे. ट्विटर हे असं डिजीटल माध्यम आहे ज्यावर भविष्यात मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टींवर चर्चा होतात, असं मस्क यांनी म्हटलेलं. तसेच, “मला ट्विटरमध्ये आणखी नवीन फिचर्स आणायचे आहेत. लोकांचा या माध्यमावरील विश्वास वाढवण्यासाठी हे एक ओपन सोर्स अल्गोरिदम बनवायचे आहे. स्पॅम बोट्स, सर्व व्यक्तींचं ऑथेंटिकेशन अशी बरीच काम डोक्यात आहेत. ट्विटरमध्ये फार क्षमता आहे. मी कंपनीसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे.

 

हेही वाचा – Definition of Rich गरीब-श्रीमंत की श्रीमंत-गरीब?

ट्विटर बनणार खाजगी कंपनी
एकदा हा करार पूर्ण झाला की ट्विटर सार्वजनिकरित्या सूचीबद्ध कंपनी म्हणून अस्तित्वात राहणार नसून त्याऐवजी, ती पूर्णपणे इलॉन मस्कच्या मालकीची खाजगी कंपनी बनेल. २०२२ च्या अखेरपर्यंत हा करार पूर्ण होईल. ट्विटर कोणत्या मार्गावर जाईल हे फक्त वेळच सांगेल. परंतु जोवर इलॉन मस्क यांच्या योजनेचा संबंध आहे, मस्क यांना एक अशी जागा निर्माण करायची आहे जिथे प्रत्येकजण कोणत्याही सेन्सॉरशिपचा धोका न घेता किंवा ब्लॉक न होता चर्चा करू शकेल किंवा आपल्याला जे मांडायचं आहे ते मांडू शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published.