Elon Musk
Reading Time: 3 minutes

Elon Musk 

एलॉन मस्क (Elon Musk)! इलेक्ट्रिक कारची निर्मिती करणाऱ्या ‘टेस्ला’ कंपनीचे मालक आणि ‘फोर्ब्स’ च्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सातत्याने टॉप ३ मध्ये असणाऱ्या या उद्योगपतीच्या यशाचा प्रवास थक्क करणारा आहे.  एलॉन मस्क हे सोशल मीडियावर अत्यंत लोकप्रिय आहेत. ते त्यांच्या ट्विटर अकाउंटवर नेहमी सक्रिय असतात.  त्यांनी केलेल्या “Use signal” या ट्विटमुळे Signal ॲप प्ले स्टोअर वर पहिल्या क्रमांकावर आले होते. मस्क यांच्या ट्विटपूर्वी हे ॲप फार कमी लोकांना माहिती होते.

हे नक्की वाचा: इन्फोसिसची यशोगाथा  – कोण बनला करोडपती…?…

एलॉन मस्क यांचा यशाचा प्रवास-

१. अमेरिकन नव्हे साऊथ आफ्रिकन- कॅनडीअन 

  • अमेरिकन बिझनेसमन एलॉन मस्क हे मूळचे साऊथ आफ्रिकन- कॅनडिअन वंशाचे आहेत. त्यांची आई मेये मस्क कॅनडियन मॉडेल, तर वडील दक्षिण आफ्रीकन अभियंता आहेत. 
  • मस्क दहा वर्षांचे असताना त्याच्या पालकांचा घटस्फोट झाला होता. त्यांना एक बहीण व एक भाऊ आहे. 

२.वाचनाचे प्रचंड वेड 

  • वाचनाची प्रचंड आवड असणारे एलॉन मस्क यांनी वयाच्या नवव्या वर्षी एनसायक्लोपीडिया ब्रिटनिका हे पुस्तक वाचून संपवले होते. ज्या वयात अनेक मुलांना एनसायक्लोपीडिया म्हणजे काय हे देखील माहिती नसतं त्या वयात मस्क यांनी तो वाचून संपवला होता.  
  • कुटुंब अथवा मित्र परिवारासोबत ते कुठेही फिरायला गेले की सर्वप्रथम लायब्ररी शोधत. लायब्ररी दिसल्यावर ते दिवसभर तिथे पुस्तकं वाचत बसायचे. 

३. शैक्षणिक जीवन 

  • आजचे हुशार उद्योजक एलॉन मस्क आपल्या शालेय जीवनात मात्र अंतर्मुख स्वभावाचे होते. शाळेत असताना त्यांना फार कमी मित्र होते. ते पुस्तकवेडे असल्याने लायब्ररीतच जास्त रमत.
  • मस्क काही तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नव्हते. कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांच्याकडे पैशाची सतत चणचण असे. पण हुशारी आणि आयुष्य घडवायची इच्छाशक्ती मात्र त्यांच्याकडे होती. 
  • स्कॉलरशिपची रक्कम अपुरी पडत असल्यामुळे त्यांनी शिक्षणासाठी कर्ज काढलं आणि आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी एकाच वेळी दोन नोकऱ्यादेखील केल्या.

विशेष लेख: जॅक वेल्श – उद्योग जगतातील एक “हरवलेला तारा”

४. अमेरिकन नागरिकत्वाचा प्रवास  

  • एलॉन मस्क यांचा अमेरिकन नागरिकत्वाचा प्रवास थक्क करणारा आहे. अमेरिकन नागरिकत्व मिळविण्यासाठी मस्क यांनी सुरुवातीपासूनच प्रयत्न सुरू केले होते. त्यांच्या हा प्रवासही अतिशय रंजक आहे. 
  • नव्वदच्या दशकाच्या आसपास दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेषशिगेला पोचला होता. त्यामुळे तेथीक सरकारने सैन्यभरती अनिवार्य केली होती. वयाच्या 17 व्या वर्षी 1989 मध्ये एलॉन मस्क यांनी दक्षिण आफ्रिकेच्या सैन्यात अनिवार्य असणारी भरती टाळण्यासाठी कॅनडा गाठले. तिथे त्यांनी क्वीन्स विद्यापीठात प्रवेश घेतला व पुढे जाऊन अमेरिकन नागरिकत्व मिळवणे सोपे जावे म्हणून कॅनेडियन नागरिकत्व स्वीकारले.
  • अमेरिकन नागरिकत्व मिळविण्यासाठी सुरुवातीपासून केलेले प्रयत्न फळाला आले आणि अखेर सन 2002 मध्ये त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले.  
  • वयाच्या अवघ्या १०-१२ वर्षी त्यांना अमेरिकन सरकारतर्फे गेम डेव्हलप केल्याबद्दल अवॉर्ड देण्यात आले होते. 

५. करिअरची सुरुवात

  • शिक्षण पूर्ण झाल्यावर 1995 साली मस्क यांनी आपला भाऊ किंबल मस्क यांच्यासह “झिप 2 कॉर्पोरेशन” नावाची कंपनी सुरू केली. 
  • अवघ्या  300 स्क्वेअर फुटच्या फ्लॅटमध्ये सुरु केलेली कंपनी चालवताना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.  त्यावेळी सतत पैशांची चणचण होती. राहायला जागा नव्हती. मग ऑफिस हेच त्यांचे घर बनले. बेड घ्यायला पैसे नसल्याने ऑफिसमधला सोफा हीच त्यांची बेडरूम होती.
  • त्यानंतर, एलॉन आणि किंबल मस्क यांनी मिळून 1999 मध्ये, झिप 2 कंपनी विकली आणि त्यामधून आलेल्या पैशांतून X.com नावाची कंपनी सुरू केली.  X.com कंपनी आज PayPal या नावाने ओळखली जाते. 
  • ऑनलाईन बँक या संकल्पनेबद्दल कोणाला माहिती नव्हती किंवा याबद्दल कोणी विचारही केला नव्हता तेव्हा एलॉन यांनी पहिली नेटबँकिंग कंपनी paypal सुरू केली. त्यावेळेस अनेकांनी त्यांना अशी कंपनी चालणार नाही हे सांगितले होते पण एलॉन मस्क यांनी या क्षेत्रातही यश मिळवून दाखवलं. 
  • ऑक्टोबर 2002 मध्ये, eBay या कंपनीने PayPal ला विकत घेतले. तेव्हा हा व्यवहार करताना मस्क यांनी दूरदृष्टीने कंपनीच्या 11% शेअर्सचा मालकी हक्क स्वतःकडेच ठेवला. 

६. यशाचा चढता आलेख

  • अमेरिकन नागरिकत्व मिळाल्यानंतर एलॉन मस्क यांनी अमेरिकेचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांचा  सल्लागार म्हणून काम केले होते. 
  • भविष्यात मानवाला पृथ्वीवर राहायला जागा कमी पडणार आणि इतर ग्रहावर त्याला आपली वसाहत निर्माण करावी लागणार या विचाराने प्रेरित झाल्यामुळे स्पेस टेक्नॉलॉजी मधील कोणतंही तांत्रिक शिक्षण नसताना केवळ या विषयाची आवड असल्यामुळे मस्क यांनी SpaceX नावाची कंपनी सुरू केली. 
  • या कंपनीने 22 मे, 2012 रोजी कंपनीने आपले Falcon 9 नावाचे पहिले मानवरहित व्यावसायिक रॉकेट अंतराळात पाठवून एक नवा इतिहास रचला. 
  • सरकारी कंपन्यांची मक्तेदारी असणाऱ्या या क्षेत्रात पहिल्यांदाच एखाद्या खाजगी कंपनीने शिरकाव करून त्यामध्ये यश मिळविले होते. 

महत्वाचा लेख: धीरुभाई अंबानी – रिलायन्स इंडस्ट्रीजचे महान उद्योजक ! 

७. एलॉन मस्क आणि टेस्ला कंपनी 

  • सन 2003 मध्ये  टेस्ला मोटर्स नावाची घाटयात चाललेली कंपनी विकत घेतली. इंधनांवर चालणाऱ्या वाहनांमुळे पर्यावरणाचे होणारे अतोनात नुकसान वाढतच चालले होते. अशावेळी इलेकट्रीकल वाहने हा पर्यावरणातले प्रदूषण कमी करण्यास हातभार लावतील या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी टेस्ला मोटर्स खरेदी केली. 
  • 2018 साली जेव्हा टेस्ला कंपनीच्या गाड्यांची मागणी प्रचंड वाढल्यामुळे उत्पादन कमी पडू लागला होतं तेव्हा जून-जुलै-ऑगस्ट या महिन्यांमध्ये कंपनीने आपली उत्पादन क्षमता वाढवून या 3 महिन्यांत 50000 गाड्यांचे उत्पादन केले.
  • आज टेस्ला मोटर्स जगातील नामांकित कंपन्यांच्या यादीमध्ये अग्रगण्य स्थानी आहे 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Elon Musk Marathi Mahiti, Elon Musk in Marathi, Elon Musk success story in Marathi, Elon Musk success story Marathi, Elon Musk success story Marathi Mahiti, Who is Elon Musk? Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.