Gold And Silver Price : जाणून घ्या आजचे सोन्या चांदीचे दर…..

Reading Time: 2 minutes

Gold And Silver Price

सोन्याच्या दरात सतत चढउतार होत असतात. आज म्हणजेच 1 मे रोजी देशात सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. देशात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 48,400 आहे, काल ही किंमत 48,550 रुपये होती. म्हणजेच सोन्याच्या किंमतीत प्रतितोळा 150 रुपये घट झाली आहे.

 

हेही वाचा – Gold ETF Vs Gold Mutual Fund: गोल्ड ईटीएफ की गोल्ड म्युच्युअल फंड, तुम्ही काय निवडाल?

 

24 कॅरेट सोन्याची किंमत-

देशात आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 52,800 रुपये आहे. काल ही किंमत 52,960 रुपये होती. वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात GST, TCS आणि इतर शुल्क समाविष्ट नाहीत.

 

चांदीच्या किंमतीत घसरण-

चांदीच्या दराबाबत बोलायचे झाले तर चांदीच्या दरात थोडीशी घसरण झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 63,500 आहे. ही किंमत काल 64,050 होती. म्हणजेच चांदीच्या दरात किलोमागे 500 रुपयांची घसरण दिसून आली आहे.

 

हेही वाचा – भारतात सोने गुंतवणुकीचे पाच पर्याय

 

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

हेही वाचा  – Sovereign Gold Bonds: सुवर्ण सार्वभौम रोखे

 

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.

Leave a Reply

Your email address will not be published.