Health insurance premiums : आरोग्य विमा पॉलिसीचे महागडे हप्ते टाळण्यासाठी ‘हे’ वाचा

Reading Time: 2 minutes

Health insurance premiums

मागच्या दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या महामारीने जगभरात थैमान घातले होते. आपल्या देशातही कोरोनाचे लाखोंमध्ये रुग्ण सापडले होते. अर्थव्यव्यस्था आणि इतर घटकांवर याचा विपरीत परिणाम झाला होता. आरोग्य विमा कंपन्यांवर देखील महामारी काळात ताण वाढला होता. कोरोना हा साथीच्या आजारांमध्ये मोडतो. यामुळे आरोग्य विमा कंपन्यांना मोठ्या  आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. 

सध्या आरोग्य विमा कंपन्यांच्या बाबतीत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. आरोग्य विमा कंपन्या लवकरच आपल्या प्रीमियममध्ये वाढ करणार आहे. किंवा बऱ्याच कंपन्यांनी प्रीमियम वाढवले सुद्धा आहेत.  प्रीमियम म्हणजे वर्षाकाठी किंवा महिन्याकाठी भरला जाणारा हप्ता(पैसे).  चालू वर्षात तब्ब्ल १५ टक्क्यांनी प्रीमियम रक्कम महागणाची शक्यता आहे.  कोरोनाच्या काळात वाढलेल्या वैद्यकीय खर्चांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

 हेही वाचा –  Health Insurance : जाणून घ्या वैयक्तिक गंभीर आजार, फॅमिली फ्लोटर व वैयक्तिक आरोग्य विमा योजनेबद्दल

आरोग्य विमा प्रीमियम वाढण्याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत 

 

  • आरोग्य विमा प्रीमियम वाढण्याचं प्रमुख कारण म्हणजे कोरोना महामारी. कोरोनाच्या दोन वर्षातील संकटांमुळे वैद्यकीय विभागाचे, आरोग्य प्रणालीचे आतापर्यंतचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. आरोग्य विम्याचे दावे या दोन वर्षांमध्ये वाढल्याने विमा कंपन्यांवर आर्थिक ताण पडला. बऱ्याच ठिकाणी खोटे दावे करण्यातही आल्याचे समोर आले आहे. यामुळेच आता आरोग्य विमा प्रीमियम वाढवण्याची तयारी कंपन्यांनी दर्शविली आहे.
  • कोरोनाचा प्रादुर्भाव आता पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, आसाम, मिझोराम या राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. बरेच लोक ज्यांच्याकडे आरोग्य विमा नव्हता अशांचा आता आरोग्य विमा खरेदीकरण्याकडे कल वाढला आहे. 
  • ज्यांना कोरोना व्यतिरिक्त इतर आजार होते किंवा त्यांच्या शस्त्रक्रिया  कोरोनाकाळात पुढे ढकलल्यामुळे आता तेही दावे दाखल करताना दिसत आहेत. त्यांची संख्याही वाढली असल्याने विमा कंपन्यांना आर्थिक फटका बसत आहे. जास्त दाव्यांच्या कारणामुळेही आरोग्य विमा कंपन्या प्रीमियममध्ये वाढ करू शकतात.
  • आरोग्य विमा कंपन्या वाढलेल्या अतिरिक्त विमा दाव्यांमुळे त्यांच्या अनुभवानुसारही प्रीमियममध्ये वाढ करू शकतात. यासाठी दर तीन वर्षांची मर्यादा आहे. यासोबतच आरोग्य विमा धारक जसे जसे वयाने वाढतात तस तसा त्यांचा प्रीमियम वाढत असतो. पॉलिसी प्रीमियम हे विशिष्ट वयोगटानुसार कमी जास्त असू शकतात. मात्र ज्यांचे वय आहे ४० पेक्षा जास्त आहे अशांना पॉलिसी प्रीमियम नक्कीच जास्त असतो.

 

हेही वाचा – Smoking affects health insurance premium : तुम्ही सिगारेट ओढत असाल तर विम्याबाबत ‘हे’ नक्की वाचा

 

तुम्ही प्रीमियम कमी करण्यासाठी हेकरू शकता

 

  •  जर आपण तरुण असाल आणि आरोग्य विमा पॉलिसीबाबत जाणकार असाल तर आपण स्वस्तात प्रीमियम भरू शकतो. आरोग्य विमा कंपनीने दिलेल्या विविध ऑफर्स माहिती असेल तर आपण पैशांची बचत करू शकतो.
  • यासोबतच दोन विमा कंपन्यांमधील प्रीमियम फरक, सुविधांचा फरक या गोष्टींकडे लक्ष देऊन आपण कमी पैशांत चांगला आरोग्य विमा प्रीमियम निवडू शकतो. आजच्या ऑनलाईन युगात आपण इंटरनेटवरून माहिती काढून विमा प्रीमियममधील तफावत अगदी सहज मिळवू शकतो. विमा प्रीमियममधील फरक आणि सुविधा एकदा माहिती झाल्यास आपण चांगल्यातील चांगला आरोग्य विमा कमी पैशांमध्ये घेऊ शकतो. 
  •  जर आपण एखाद्या कंपनीचा आरोग्य विमा दोन ते तीन वर्षांपासून सातत्याने खरेदी करत असू तर आपल्या प्रीमियमच्या बाबतीत ऑफर्स मिळतात. ज्या द्वारे जरी प्रीमियम रक्कम वाढत असेल तरी आपल्याला त्यामध्ये फायदा मिळू शकतो.

 

हेही वाचा – Health Insurance Review: आरोग्य विम्याचे पुनरावलोकन करणे आवश्यक असते का?

 

ज्येष्ठ नागरिक किंवा वय जास्त असल्यास कमी दरात विमा खरेदी करण्यासाठी याटीप्स करा फॉलो

  •  जेव्हा कमी वयातील व्यक्ती आरोग्य विमा प्रीमियम घेत असतात तेव्हा पैसे कमी लागतात. तरुण वयात आजारी पाडण्याचे प्रमाणे हे काहीसे कमी असल्यामुळे तरुण वर्गाला प्रीमियममध्ये फायदा होता. मात्र हेच जेष्ठ नागरिक किंवा वय जास्त असलेल्यांच्या बाबतीत विरुद्ध आहे. वय जास्त असल्यास प्रीमियम हे महागडे मिळतात.
  •  प्रीमियम तर महाग मिळतातच शिवाय काही नियम, अटी देखील फॉलो करावे लागतात. वय जास्त असल्यामुळे विमा कंपन्या नियमित पॉलिसी देऊ शकत नाही. काही कंपन्या जेष्ठ नागरिकांबाबत आकर्षक प्रीमियम ऑफर्स देत असतात. आरोग्य विम्यात येणाऱ्या काही बेसिक  गोष्टी जर आपण टाळण्यास तयार असल्यास आपल्याला या आकर्षक प्रिमीयम ऑफर्स नक्कीच मिळू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published.