health insurance review
Reading Time: 3 minutes

Health Insurance Review

कोरोना महामारीच्या अभूतपूर्व संकटांमुळे आरोग्य विम्याने सर्वांच्या प्राधान्य यादीमध्ये स्थान मिळवलं आहे. परंतु, आरोग्य विम्याचे पुनरावलोकन (Health Insurance Review) या अतिशय महत्वाच्या संकल्पनेबद्दल अनेकजण अनभिज्ञ असतील. आम्ही अर्थसाक्षरच्या माध्यमातून नेहमीच विमा संरक्षणाबाबत जागरूक राहण्याचा सल्ला देत असतो. आरोग्य विमा काढण्यासंदर्भातील आणि त्याबद्दल असणार्या तरतुदींची वेळोवेळी माहिती पुरवत असतो. आपल्यापैकी बर्याच जणांनी आधीच विमा काढलेला असेल मात्र  विमा काढला की पुन्हा तिकडे पहायची गरज नाही असे मात्र नाही. आपण आरोग्य विमा काढताना उत्तम योजना निवडलेली असतेच मात्र प्रत्येक वर्षी तिचे पुनरावलोकन केल्याने आपल्याला या योजनेचा जास्त लाभ  मिळू शकते.

हे नक्की वाचा: आरोग्य विमा विरुद्ध मेडीक्लेम

Health Insurance Review:  आरोग्य विम्याचे पुनरावलोकन करताना नेमके काय तपासाल?

१. नवीन वैशिष्टे आणि फायदे (add-on)  – 

  • विमा कंपन्या डिजिटायझेशनच्या मदतीने दरवर्षी नवनवीन वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने आणत असतात. यातील काही उत्पादने आपल्या सध्याच्या गरजांच्या पूर्ततेसाठी परिपूर्ण असतात. 
  • पुनरावलोकन करताना आपल्या नव्याने निर्माण झालेल्या अथवा कमी झालेल्या गरजांचा विचार करून आपणास आवश्यक अशी एखाद्या नवीन वैशिष्टपूर्ण योजनेची निवड केल्यास नक्कीच त्याचा जास्त लाभ होऊ शकतो. 

२. नो क्लेम बोनस – 

  • विम्याची त्यावर्षीची रक्कम वापरायची गरज पडली नाही तर विमाधारकाला नो क्लेम बोनसचा लाभ मिळतो. 
  • तो जवळपास 10% ते 150% पर्यन्त असू शकतो. आपण विमा योजनेचे पुनरावलोकन केल्याने जर ‘नो क्लेम बोनस’साठी आपण पात्र असाल, तर त्याचा लाभ घेऊ शकता.  

३. पूर्वीपासून असलेले आजार (Pre-existing disease) – 

  • आरोग्य विम्यामध्ये पूर्वीपासून असलेल्या आजरांसाठी (उदा. बीपी, डायबेटिज, इ.) वेगळे प्रयोजन असते. वेगवेगळ्या विमा कंपनीचा प्रतीक्षा कालावधी हा वेगवेगळा असू शकतो.
  • आपल्या सध्याच्या योजनेमध्ये जर पूर्वीपासून असलेल्या आजरांसाठी वेगळे प्रयोजन नसेल तर, प्रतीक्षा कालावधी जास्त असेल तर, तसेच प्रीमियम जास्त असेल तर आपण पुनरावलोक करताना उत्तम योजना निवडू शकता.
  • आपण जर आरोग्य विमा पॉलिसीचे पुनरावलोकन केले नाही, तर पूर्वीपासून असलेल्या आजारांबाबत असणाऱ्या  धोरणामध्ये मिळणार्‍या सवलतींपासून आपण वंचित राहू शकता.
  • समजा एखाद्या पूर्वीपासून असलेल्या आजाराच्या उपचारासाठी आपल्याला आपल्या विमा योजनेमध्ये प्रतीक्षा कालावधी चार वर्षांचा आहे, मात्र पुनरावलोकनामध्ये आपणास असे लक्षात आले की अन्य एखाद्या विमा कंपनीच्या योजनेमध्ये पूर्वीपासून असलेल्या आजारांबाबतीचा प्रतीक्षा कालावधी तीन वर्षापेक्षा कमी आहे तेही कमी प्रीमियम मध्ये! तर आपण ती योजना निवडू शकता.

महत्वाचा लेख: आरोग्य विम्यासंदर्भात काही महत्वाच्या गोष्टी

४. आरोग्य स्थिति – 

  • आपली सध्याची आरोग्य स्थिति कशी आहे, म्हणजे आपल्याला सध्या कोणते आजार असतील तर आपल्या सध्याच्या आरोग्य विमा योजनेमध्ये त्या आजारासाठी काही प्रयोजन आहे का, हे पडताळणे गरजेचे ठरते. 
  • नूतनीकरण करण्याआधी आपण आपली आताची आरोग्य विमा योजना एखादा आजार जसे की, मधुमेह कव्हर करत नसेल आणि दुसरी एखादी योजना अशा आजारांना देखील कव्हरेज देत असेल तर अर्थात आपण नूतनीकरणाच्या वेळी दुसरी योजना निवडू शकता.

५. जीवनशैलीमधील बदल – 

  • आपल्या जीवनशैली वरच आपले आरोग्य ठरत असते. आपले वय, कामाचे स्वरूप, ताण-तणाव, व्यायामाची सवय, आहार, राहणीमान, सवयी जसे की धूम्रपान, मद्यपान या सर्व गोष्टी आपल्या आरोग्यावर परिणाम करतात. 
  • कालपरत्वे आणि वयपरत्वे काही आजार पाठीशी लागू शकतात. त्यानुसार आपली विमा योजना अद्ययावत आहे की नाही हे तपासणे आणि ती नसेल तर करून घेणे आवश्यक आहे. 

६. कव्हरेज आणि प्रीमियम – 

  • बाजारात अनेक विमा कंपन्या आहेत. त्यामुळे या उद्योगामध्ये तीव्र स्पर्धा आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी विमा कंपन्या नेहमीच रोग आणि आजारावरील कव्हरेज यासंदर्भातील नियमांमध्ये नेहमी सुधारित करत असतात. 
  • अशी सुधारित योजना आपल्या आजाराशी निगडीत असेल तर पुनरावलोकनाच्या वेळेस आपण संबधित विमा योजना निवडू शकतो. 
  • उदा. – मोतीबिंदूसाठी आरोग्य विमा अंतर्गत कोणतीही तरतूद नव्हती, परंतु आता हे ‘डे केअर ट्रीटमेंट’ अंतर्गत कव्हर केले जाते.  

७. विवाह, पालकत्व आणि घटस्फोट– 

  • जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपले आयुष्य बदलत असते. त्याचप्रमाणे जबाबदर्‍या देखील येत असतात. त्यातील महत्वाचा टप्पा म्हणजे विवाह आणि पालकत्व. 
  • आपण जर लग्नाआधी विमा काढला असेल तर लग्नानंतर तो अद्ययावत करणे गरजेचे आहे. तसेच आपण लवकरच पालक होणार असाल अथवा नुकतेच झाला असाल तरी देखील पुनर्मूल्यांकन गरजेचे आहे.
  • आयुष्यात सगळे ठरवल्या प्रमाणेच घडते असे नाही. आपण घटस्फोट घेतला असेल अथवा घ्यायचा विचार करत असाल, तर लग्न आणि पालकत्व संबंधित कव्हरेज बदलू शकता. 
  • कव्हरेज कमी करण्यासाठी आपल्याला आपल्या विमा योजनेचा आढावा घेणे आणि ती अद्ययावत करून घेणे गरजेचे आहे.

संबंधित व्हिडीओ: आरोग्य विमा समज – गैरसमज

या सर्व बाबी लक्षात घेऊन आरोग्य विमा योजनेचे नूतनीकरण केले की नक्की आपल्या फायद्याचे ठरेल. यासोबतच पुनरावलोक करताना आपल्याला उत्तमोत्तम लाभ घेता येतील. या लेखामुळे आपल्या माहितीत भर पडली असणारच! आपल्या जवळच्यांना देखील ही माहिती वाचायला द्या आणि त्यांना याबाबत जागरूक करायला विसरू नका.  

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Health Insurance Review in Marathi, What is Health Insurance Review Marathi Mahiti, Health Insurance Review Mhanaje kay? Health Insurance Review Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.