Share tips for beginners
Share tips for beginners
Reading Time: 3 minutes

Share Market Tips for Beginners

सध्या शेअर बाजार कमालीचा अस्थिर  आहे. एका मागून एक येणाऱ्या वाईट बातम्या शेअर बाजार पडण्याचं मुख्य कारण आहे. लोकांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागत आहे. 

  • जर समजा एखादा नवीन गुंतवणूकदार आताच्या स्थितीत शेअर बाजारात गुंतवणूक करणार असेल तर ही अत्यंत वाईट वेळ आहे. त्याला कारण असं की जागतिक युद्ध, आरबीआयचे नवीन नियम, वाढते व्याजदर, परकीय गुंतवणूदारांचा भारतीय शेअर बाजारात विक्रीचा मारा आणि इतरही अनेक गोष्टी. 
  • बरेच जण शेअर बाजारात नवीन आल्यानंतर नुकसान झेलतात. शेअर बाजारात पैसे कमावणे हे जास्त अवघड नसलं तरी ते सोपेही नाही. 
  • शेअर मार्केटचा चांगला अभ्यास असावा लागतो. संयम, वेळ आणि इतर गोष्टींवर प्रभुत्व मिळवूनच शेअर बाजारात आपण यशस्वी ठरू शकतो. मात्र यासाठी आपल्याला अनुभव घेणे गरजेचे आहे. 
  • एकाच दिवसात अथवा एका महिन्यात आपल्याला या गोष्टी जमणं कठीण आहे. शेअर बाजारात जर आपण नवीन असू तर आपण काही चुका या टाळल्याचं पाहिजेत.

हेही वाचा – Insider Trading : इन्साईडर ट्रेडिंग म्हणजे काय? शेअर बाजारात इन्साईडर ट्रेडिंग बेकायदेशीर का आहे?

शेअर बाजारात नवीन असल्यास याचुका टाळा

  • माहिती नसलेल्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे.
  • अब्जाधीश असणारे स्टॉक्स गुरू वॉरन बफेट हे शेअर बाजाराच्या आणि योग्य गुंतवणुकीच्या जोरावर आज यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. 
  • भारतातून राकेश झुनझुनवाला, विजय केडिया, राधाकृष्ण दमानिया हे अब्जाधीश देखील त्याच रांगेत बसलेले आहेत. 
  • हे सर्व शेअर बाजाराच्या माध्यमातूनच इतक्या वर गेले आहेत. मात्र त्यांनी गुंतवणूक करताना प्रचंड अभ्यास केलेला आहे. 
  • सामान्य गुंतवणूकदार नेमकं हेच लक्षात घेत नाही. लोकांना श्रीमंत तर व्हायचं आहे मात्र संयम, अभ्यास, वेळ लोकांना नकोय. 
  • बऱ्याचदा गुंतवणूकदार माहिती नसलेल्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात आणि आपले पैसे गमावतात. 
  • शेअर बाजारात गुंतवणूक करताना माहितीच्या आधारावरच गुंतवणूक करावी अन्यथा आपल्याला नुकसान होऊ शकते. नवख्या गुंतवणूकदारांनी हा नियम लक्षात घेतलाच पाहिजे.

 

  • शेअर विकत घेताना किंवा विकताना स्टॉप लॉस(stop loss) न लावणे.
  • शेअर बाजारात आपण दोन गोष्टी करत असतो. एक तर शेअर विकत घेतो किंवा विकतो. 
  • विकत घेतल्यानंतर जर तो शेअर वाढला तर फायदा बघून आपण तो विकतो. हा व्यवहार रोज शेअर बाजारात होत असतो. 
  • या व्यवहारात एक महत्वाची भूमिका बजावण्याचं काम करतो – स्टॉप लॉस (stop loss)!  
  • स्टॉप लॉस म्हणजे आपण एक लिमिट सेट करतो असतो जिथून आपल्याला शेअरमधून बाहेर पडायचं आहे. 
  • समजा मी टाटा मोटर्स कंपनीचा शेअर ३५० रुपयांना विकत घेतला आणि स्टॉप लॉस ३३५ रुपयांना लावला. जर बाजारात पडझड झाली आणि टाटा मोटर्सच्या शेअर ३३५ रुपयांना आला तर तो आपोआप विकला जातो. 
  • आपण जे विविध ब्रोकरेज ॲप  वापरतो त्यामध्ये हे सगळं असतं. 
  • जर समजा आपण स्टॉप लॉस लावलाच नाही तर आपण मोठं नुकसान होऊ शकतं. 
  • बरेच नव गुंतवणूकदार हे स्टॉप लॉसशिवाय ट्रेडिंग करतात आणि आपले पैसे गमावतात. कोणताही शेअर असला तरी स्टॉप लॉस लावणे हा नियम प्रत्येक गुंतवणूकदाराने लक्षात घ्यायलाच हवा.

हेही वाचा – Concept of Share Market: शेअर बाजारात गुंतवणूक करायची आहे? मग हे नक्की वाचा

  1. जोखमीचे किंवा छोटे छोटे (penny stocks) शेअर्स विकत घेणे.
  • शेअर बाजारात गुंतवणूक करताना प्रत्येकाकडेच लाखांमध्ये पैसे असतील असं नाही. 
  • काही गुंतवणूकदार हे कमी पैशांमध्ये गुंतवणूक सुरु करतात. कमी पैशांमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदार बऱ्याचदा छोट्या छोट्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात आणि फसतात. 
  • एक आणि दोन रुपयांना किंवा काही पैशांमध्ये मिळणारे स्टॉक हे एखाद्या लॉटरी किंवा जुगाराप्रमाणे असतात. 
  • लागली तर लॉटरी नाहीतर सर्व पैसे पाण्यात असा काहीसा हिशोब पेनी स्टॉकच्या बाबतीत असतो. 
  • त्यामुळे नवीन गुंतवणूकदारांनी नेहमीच अशा स्टॉक पासून दूर राहिलेच पाहिजे. अन्यथा गुंतवणूकदारांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागू शकते.

  • कमी दिवसांसाठी (काळासाठी) स्टॉक खरेदी करून नफ्याची आशा बाळगणे.
  • शेअर बाजारात उतरल्यानंतर कधीही एका दिवसात किंवा एका महिन्यात श्रीमंत होण्याची स्वप्न पाहूच नका. 
  • कित्येकजण शेअर बाजारात गुंतवणूक करतात आणि काही दिवसांमध्येच लगेचच ते विकून मोकळे होतात. 
  • शेअर बाजार हा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अत्यंत चांगला पर्याय आहे. असं असताना आपणही संयम आणि वेळेला महत्व द्यायला हवे. जर तस केलं नाही तर आपल्याला पश्चातापाला सामोरे जावे लागते. 
  • आपण कमी दिवसांसाठी स्टॉक खरेदी करतो आणि विकून टाकतो. विकून टाकल्यानंतर कित्येकदा आपण बघतो की तो स्टॉक वाढलेला आहे. यामुळे आपल्याला नुकसान झाल्याची भावना मनात निर्माण होते. 
  • त्यामुळे कधीही गुंतवणूक करताना दीर्घकालीन नफ्याचा विचार करावा.

 हेही वाचा – Share Market Investment: शेअर बाजारात गुंतवणूक करताना लक्षात ठेवा या ४ महत्वाच्या गोष्टी

  • ब्रोकरेज ऍपमधून मिळणाऱ्या मार्जिनवर स्टॉक खरेदी करणे
  • आपण शेअर बाजारात गुंतवणूक करताना मार्जिन हा शब्द अनेकदा ऐकला असेल. 
  • इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे शेअर आजच घ्यायचा आणि आजच विकायचा.
  • ट्रेडिंग करताना आपल्याला मार्जिन मिळते. मार्जिन म्हणजेच कंपनी आपल्याला पैसे (रक्कम) वापरण्यासाठी देते. 
  • एखादा स्टॉक आपण इंट्राडेमध्ये घेतला तर दुपारी ३.१५ च्या आत तो आपण विकलाच पाहिजे किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीत(होल्डिंग)मध्ये रूपांतरित करायला हवा असा नियम असतो. 
  • कंपनीकडून मार्जिन मिळते म्हटल्यावर बरेच गुंतवणूकदार जास्त प्रमाणात स्टॉक खरेदी करतात. यामध्ये गुंतवणूकदाराला स्वतःकडे असणाऱ्या रोख रक्कमेबद्दल भान राहत नाही आणि नुकसानाला सामोरे जावे लागते. 
  • शेअर बाजारात गुंतवणूक करताना मार्जिनमधून जास्त स्टॉक खरेदी करणं नवीन गुंतवणूकदारांनी टाळायला हवं.

शेअर बाजारातून फायदा मिळवण्यासाठी वरील चुका नवीन गुंतवणूकदारांनी टाळाव्यात. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…