PUC CERTIFICATE
PUC CERTIFICATE
Reading Time: 3 minutes

पीयूसी (प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र,) आपल्या गाडीसाठी गरजेचं का आहे

भारतात सध्या वाहतुकीच्या नियमांच्या, साधनांच्या बाबतीत बरेचसे बदल घडवून आणले जात आहेत. तुमचं वाहन चालवण्याचं लर्निंग लायसन्स आता थेट घरबसल्या मिळत आहे. नंतरच्या मुख्य ड्रायव्हिंग लायसन्ससाठी मात्र ट्रायलला जाणे अनिवार्य आहे. ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय गाडी चालवणे हा गुन्हा आहे. जर आपण ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय गाडी चालवली तर आपल्याला दंड देखील भरावा लागतो. वाहतूक पोलीस जेव्हा आपली गाडी अडवतात तेव्हा लायसन्ससोबत आणखी काही कागदपत्रांची विचारपूस करत असतात. यामध्ये इंश्युरन्स(गाडीचा विमा), पीयूसी, गाडीची कागदपत्रांची मागणी केली जाते. पीयूसीबद्दल लोकांना जास्तीची माहिती नाही असं कित्येक सर्वेक्षणांमधून समोर आलेलं आहे. सध्याच्या काळात पीयूसी हा अत्यंत महत्वाचा कागद आहे हे मात्र नक्की. 

हेही वाचा – Extended Warranty On Sales : गाडी, मोबाईलसाठी एक्सटेंडेड वॉरन्टी खरंच गरजेची आहे का?

पीयूसी (प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र) म्हणजे काय ? ते आवश्यक का आहे

  • सध्या वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे हवा प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. वाहनांचे प्रदूषण मोजण्यासाठी आता सरकारने यंत्रणा लावली आहे. काही यंत्रांच्या मदतीने वाहनांचं प्रदूषण मोजता येतं. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनांच्या प्रदूषणाच्या बाबतीत काही नियम निर्धारित केले आहेत. 

  • वाहनांच्या इंजिनांमधून आवश्यक कार्बन उत्सर्जन पातळी पूर्ण होते की नाही हे मोजण्याचं काम पीयूसी प्रमाणपत्राद्वारे केलं जातं. पीयूसी प्रमाणपत्र नमूद करतं की गाडीमधून कार्बन उत्सर्जनाचे युनिट्स विहित मर्यादेत आहेत आणि ठराविक टक्केवारीपेक्षा जास्त नाहीत. यामुळेच आता वाहतूक पोलीस गाडी पकडल्यानंतर पीयूसी प्रमाणपत्राची मागणी करतात. 
  • केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८९ अंतर्गत काही मर्यादांचं पालन करणं अत्यंत गरजेचं झालं आहे. वाहन मालकांनी या कायद्यांतर्गत दंड टाळण्यासाठी दर सहा महिन्यांनी त्यांचे वाहन तपासणे आणि प्रमाणित करणे आवश्यक आहे. 
  • जर वाहन चालकांनी पीयूसी प्रमाणपत्र बाळगले नाही तर पहिला गुन्हा झाल्यानंतर १,००० रुपयांचा दंड भरणे अनिवार्य आहे. त्यानंतरच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी म्हणजेच गाडी पकडल्यानंतर २,००० रुपये इतका दंड आहे. 

भारतात पीयूसी प्रमाणपत्र अनिवार्य आहे का ?

  • १९८९ केंद्रीय मोटार वाहन कायद्याअंतर्गत पीयूसी प्रमाणपत्र वाहन चालकाकडे असणे अनिवार्य आहे. एवढंच नाही तर भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने २०१८मध्ये एक परिपत्रक जारी केलं आहे. या पत्रकात नमूद केल्याप्रमाणे सर्व विमा कंपन्यांना वाहन मालकाने वैध पीयूसी प्रमाणपत्र दिल्यानंतरच वाहन विम्याचे नूतनीकरण शक्य आहे. या सर्व कारणांमुळेच पीयूसी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. 
  • वाहनाला काही झाल्यास म्हणजेच अपघात झाल्यास पीयूसी प्रमाणपत्र असेल तरचं विमा मिळेल अशी काही अट नाही. मात्र तरीही पीयूसी शिवाय गाडी चालवणे हा दंडनीय गुन्हाच आहे. 

हेही वाचा – Today’s Top 10 Shares : जाणून घ्या, बाजार सुरू होण्यापूर्वी आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

 

पीयूसी प्रमाणपत्राची चाचणी कशी केली जाते ? पीयूसी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रक्रिया कशी आहे

  • जर तुमचे वाहन नवीन असेल तर जिथून आपण वाहन खरेदी करत आहोत तिथला डीलर आपल्याला गाडीसोबत पीयूसी देईल. याच पीयुसीचे नंतर नूतनीकरण करण्यासाठी आपण पेट्रोल पंप किंवा इतर सरकारमान्य पीयूसी केंद्रांवरवर नूतनीकरण करू शकतो. 
  • वाहनाचे पीयूसी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्यावेळी आपल्या गाडीच्या सायलेन्सरमध्ये पाईप टाकून उत्सर्जन दर तपासला जाईल. हे सर्व संगणकावर आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपण पीयूसी प्रमाणपत्राची फी भरल्यावर आपल्याला लगेचच प्रमाणपत्र आणि पावती मिळून होईल. हे सर्व आपण पेट्रोल पंप किंवा इतर सरकारमान्य पीयूसी केंद्रांवरवर करू शकतो. 

पीयूसी प्रमाणपत्राची वैधता (expiry) किती दिवसांची असते

  • नवीन गाडीसाठी पीयूसी प्रमाणपत्र काढताना आपण ते सहा महिन्यांसाठी किंवा एका वर्षासाठी काढू शकतो. त्यानंतर नूतनीकरणावेळी पीयूसी प्रमाणपत्र काढताना त्याची वैधता ६ महिन्यांसाठी निश्चित केली जाते. 
  • पीयूसी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ६० रुपयांपासून तर १०० रुपयांपर्यंत दर आकारला जातो. ही किंमत इंधनांच्या प्रकारावर ठरवली जाते. जसं की पेट्रोल गाडी असेल तर एक किंमत आणि डिझेल गाडी असेल तर वेगळी किंमत.  

हेही वाचा – Economical Growth Rate : सर्वाधिक विकासदर ही दमदार वाटचालीची सुरवात

टीप : वाहन चालवताना पीयूसी प्रमाणपत्र असणे म्हणजे आपण फक्त दंड भरण्यापासून वाचतो असं नाही. मात्र आपली गाडी खरंच पर्यावरणाला हानी तर पोहोचवत नाही ना ! हे देखील लक्षात येतं. शेवटी आपल्या एकट्याच्या गाडीपेक्षा आपल्या परिसरातील हवा चांगली शुद्ध राहायला हवी असा मानस सगळ्यांचाच व्हायला हवा. अन्यथा तो दिवस दूर नाही की आपल्याला शुद्ध हवा विकत घ्यावी लागेल.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…