EXTENDED WARRANTY ON SALES
EXTENDED WARRANTY ON SALES
Reading Time: 3 minutes

 Extended Warranty On Cars

 

 • आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्यातील कित्येकांना चकचकीत (Lavish) जीवनशैलीमध्ये राहणे आवडते. 
 • महागडा मोबाईल, महागडी घड्याळे, महागड्या वस्तू, दुचाकी, चारचाकी प्रत्येकालाच हव्याहव्याश्या वाटतात. 
 • हे सर्व खरेदी करत असताना आपल्याला एक कार्ड, किंवा कागद दिला जातो ज्यामध्ये सदरील वस्तूंच्या वॉरन्टी-गॅरंटी बद्दल माहिती दिलेली असते. 
 • आता बऱ्याच वस्तूंवर गॅरंटी मिळत नाही मात्र वॉरन्टी नक्कीच मिळत असते. 
 • वॉरन्टी फुकट मिळते इथपर्यंत ठीक होतं, मात्र आता वॉरन्टी थेट विकत घ्यावी लागते. या विकत घेतल्या जाणाऱ्या वॉरन्टीला एक्सटेंडेड वॉरंटी(विस्तारित) असं गोंडस नाव देण्यात आलं आहे. 
 • आपल्यातील कित्येकांना वॉरन्टी आणि एक्सटेंडेड वॉरन्टी यामधला फरकच माहिती नाही. 
 • दुकानदार किंवा सेल्समन ग्राहकांना थोडी माहिती देतो, लगेच ग्राहक डोळे झाकून एक्सटेंडेड वॉरन्टी खरेदी करतो. एक्सटेंडेड वॉरन्टी नेमकी कशासाठी ? का ? घेतो हा प्रश्न मात्र ग्राहक स्वतःला विचारत नाही. 

हेही वाचा – Dream Car: “ड्रीम कार” खरेदीसाठी म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी उपयुक्त ठरेल ?

एक्सटेंडेड वॉरन्टी म्हणजे नेमकं काय

 • वॉरन्टी म्हणजे जर आपण एखादी वस्तू खरेदी केली आणि तिच्यात काही विशिष्ट काळाच्या आत खराबी निघाली तर कंपनी आपल्याला ती वस्तू बदलून किंवा नीट करून देण्याचे वचन देते. हे वचन म्हणजेच वॉरन्टी. 
 • इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कार, वॉशिंग मशीन, बॅकपॅक या सर्व गोष्टींसोबत आपल्याला वॉरन्टी मिळत असते. वॉरन्टी काळ हा ६० दिवसांपासून तर काही वर्षांपर्यंत देखील असू शकतो. 
 • कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या वचनाव्यतिरिक्त (वॉरन्टी) दिली जाणारी आणि विकत घेतली जाणारी वॉरन्टी म्हणजे एक्सटेंडेड वॉरन्टी. 
 • बाहेरील किंवा आपण ज्या कंपनीची वस्तू विकत घेत आहोत तिच्या व्यतिरिक्त काही तऱ्हेवाईक कंपन्या एक्सटेंडेड वॉरन्टी आपल्याला विकत असतात. 
 • आपण कोणत्याही वस्तूवर जिला वॉरन्टी मिळते अशा वस्तूंसाठी एक्सटेंडेड वॉरन्टी विकत घेऊ शकतो. 

एक्सटेंडेड वॉरन्टीचे फायदे 

तुमच्या गाडीसाठी ठरणार वरदान 

 • आपण जेव्हा दुचाकी किंवा चारचाकी विकत घेत असतो. तेव्हा आपली नवीन गाडी एकदम छान कार्य करेल अशी आपली अपेक्षा असते. मात्र काही वेळेस होतं असं की गाड्यांचे युनिटच्या युनिटच खराब असतात. अशा वेळी एक्सटेंडेड वॉरन्टी आपल्यासाठी वरदान ठरू शकते.
 • जर आपण वस्तूंची काळजी न घेणाऱ्या प्रकारामध्ये मोडत असू तर एक्सटेंडेड वॉरन्टी ही आपल्यासाठीचं आहे असं समजा. 
 • ज्यांना कोणाला वस्तूची जास्त काळजी घेता येत नाही अशांनी एक्सटेंडेड वॉरन्टी खरेदी करणे कधीही चांगलेच. 
 • एक्सटेंडेड वॉरन्टीचा एक तोटा असा देखील आहे, की जर आपण गाडी किंवा वस्तू काळजीपूर्वक वापरणारे किंवा हाताळणारे असू तर आपल्याला एक्सटेंडेड वॉरन्टीचा लाभ शून्य आहे. 

हेही वाचा – Today’s Top 10 Shares : जाणून घ्या, बाजार सुरू होण्यापूर्वी आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

आकर्षक किंमतीची ऑफर 

 • आपल्याकडील एखाद्या वस्तूसाठी एक्सटेंडेड वॉरन्टी खरेदी करत असताना आपल्याला आता आकर्षक किंमतीच्या ऑफर्स मिळतात. यामध्ये वस्तूच्या नेमक्या कोणत्या भागासाठी आपल्याला वॉरन्टी हवी आहे हे आपण निवडू शकतो. यामुळे आपल्याला निश्चितच फायदा मिळतो.
 • एखाद्या कंपनीने समजा वस्तूतल्या ७ भागांपैकी ४च भागांवर जर वॉरन्टी दिली असेल तर आपण अन्य ३ भागांसाठी एक्सटेंडेड वॉरन्टी  ऍड ऑन(खरेदी) करू शकतो. यामुळे आपल्याला वस्तूला अतिरिक्त सुरक्षा कवच मिळेल. 

कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे लागत नाहीत 

 • बाजारात सध्या दोन प्रकारच्या वॉरन्टी उपलब्ध आहे. एक कंपनीच्या ब्रॅण्डची वॉरन्टी आणि दुसरी म्हणजे इतर कंपन्यांची(थर्ड पार्टी) एक्सटेंडेड वॉरन्टी. जर आपण आपल्या कारसाठी एक्सटेंडेड वॉरन्टी घेणार असाल तर कारच्या ब्रॅण्डकडूनच ती घ्यावी असा सल्ला दिला जातो. 
 • याला कारण म्हणजे अतिरिक्त कागदपत्रांशिवाय आपल्याला एक्सटेंडेड वॉरन्टी मिळून जाते. जर समजा आपण गाडीबाबत काही दावा दाखल केला तर त्याची सर्व काळजी डीलर घेतो आणि कागदपत्रांची सर्व मदत तोच करतो. 

एक्सटेंडेड वॉरन्टीचे काही तोटे 

जास्तीचा खर्च 

विमा प्रीमियम जसा आपण खरेदी करतो तसंच काहीसं एक्सटेंडेड वॉरन्टीचं आहे. मात्र इथं खर्च मोठ्या प्रमाणावर होतो. जर आपल्याला खरंच गरज नसेल तर आपण एक्सटेंडेड वॉरन्टीचा खर्च टाळावा. वस्तुस्थिती लक्षात घेऊनच एक्सटेंडेड वॉरन्टी खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा जास्तीच्या खर्चाला सामोरे जावे लागू शकते. 

एक्सटेंडेड वॉरन्टीमध्ये सर्वच गोष्टींचा कव्हर मिळेलचं असं नाही 

एक्सटेंडेड वॉरन्टी खरेदी करत असताना ज्या काही कागदपत्रांवर आपण सह्या करत असतो, अशी कागदपत्रे नीट तपासून घ्यावीत. कंपनीने दिलेल्या प्रत्येक वचनावर कंपनी टिकूनचं राहील असं नाही. त्यामुळे कागदपत्रांची नीट तपासणी करावी आणि सगळ्या नियम, अटी एकदा बारीक वाचाव्यात. अन्यथा जास्तीचा खर्च करूनही आपल्या पदरी निराशा येऊ शकते.  

हेही वाचा – Economical Growth Rate : सर्वाधिक विकासदर ही दमदार वाटचालीची सुरवात

टीप : कार खरेदी असो किंवा मोबाईल खरेदी असो किंवा इतर वस्तूंची खरेदी करत असताना आपण एक्सटेंडेड वॉरन्टी घ्यावीचं असं काही नाही. जर आपण वस्तूंचा नीट वापर करत असू आणि तिची जपवणूक करणारे असू तर एक्सटेंडेड वॉरन्टी घ्यायची कोणतीही गरज नाही. आपली आर्थिक परिस्थिती आणि इतर बाबींचा विचार करूनच एक्सटेंडेड वॉरन्टीचा निर्णय घ्यावा.

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

UPI : युपीआय म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसची (UPI) निर्मिती…

गुंतवणूक करण्यासाठी आर्थिक सल्लागाराची निवड कशी करावी?

Reading Time: 3 minutes तुम्हाला गुंतवणूक करायची आहे आणि समजा एखाद्या व्यक्तीने ती पद्धतशीरपणे करून दिली…

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…