Reading Time: 4 minutes

देशात शहरीकरण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. नोकरी करत असताना लोक स्वतंत्र आयुष्य कस जगता येईल याकडेही लक्ष द्यायला लागली आहेत. उद्योग करताना स्वतःच्या मनासारखे काम करता येते.  

वेळ कोणाचीही वाट पाहत नाही. एखादी संधी गमावली तर भविष्यात परत ती येईल का नाही हे सांगता येत नाही. खाली काही महत्वाच्या उद्योगांची माहिती दिलेली आहे, ती वाचून आपण आपल्या आवडीच्या उद्योगाला सुरुवात करू शकता. 

१५ उद्योग ज्यांची ची सुरुवात करून आपण कमवू शकता चांगले पैसे 

उद्योग सुरु करताना ‘कष्ट’ आणि ‘संयम’ या दोन गोष्टी खूप उद्योजका जवळ असणे खूप गरजेचे असते.   

 १. बँकिंग सेवा केंद्र – Banking service centre 

  • बँकिंग सेवा केंद्राला छोटी बँक म्हणूनही ओळखले जाते. या छोट्या बँकांना स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा इतर बँकांकडून परवाना दिलेला असतो. त्या बँकेकडून आजूबाजूच्या नागरिकांना सेवा सुविधा पुरवल्या जातात. 
  • त्यामुळे ग्रामीण भागात अशा छोट्या बँकांचे महत्व जास्त आहे. छोटी बँक उघडण्यासाठी किमान १८ वर्ष वय पूर्ण,  इंटरनेट कनेक्शन असलेला संगणक, १०० चौरस फूट खोली आणि फिंगरप्रिंट स्कॅनर असणे आवश्यक आहे. 
  • या सगळ्या गरजांची पूर्तता केली की ग्राहक सेवा केंद्र उघडण्याचा मार्ग मोकळा होतो. 

२. डिजिटल मार्केटिंग Digital marketing – 

  • डिजिटल मार्केटिंग हा भविष्यातील खूप मोठा उद्योग आहे. डिजिटल मार्केटिंग मध्ये अफिलिएट मार्केटिंग, कन्टेन्ट मार्केटिंग, व्हिडीओ मार्केटिंग, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, वेबसाईट मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग आणि ईमेल मार्केटिंगचा समावेश होतो. 
  • डिजिटल मार्केटिंग साठी कोणत्याही अधिकच्या साहित्याची गरज लागत नाही. इंटरनेट आणि लॅपटॉप असला की डिजिटल मार्केटिंग सुरु करता येते. 
  • कमी पैशातून चांगली कमाई करता येण्यासारखा डिजिटल मार्केटिंग हा व्यवसाय आहे. 

३. खाजगी शिकवणी Private tution class – 

  • मुलांना शिकवण्याचा अनुभव असेल किंवा एखादी गोष्ट समजावून सांगायला आवडत असेल तर खाजगी शिकवणी वर्ग चालू करता येतात. 
  • हल्लीच्या काळात लोक मुलांसाठी स्वतंत्र खाजगी वर्ग लावतात आणि त्या शिक्षकांकडून मुलांचा अभ्यास करून घेतला जातो. 
  • दिवसातला एक तास जरी शिकवणीला दिला तरी चांगले पैसे कमवता येतात. 

४. स्टेशनरी दुकान Stationary shop  – 

  • स्टेशनरी दुकान हा व्यवसाय कमी गुंतवणुकीत चालू करता येतो. स्टेशनरी दुकानातून कायम चांगला परतावा मिळतो आणि त्याचे भविष्यही उज्वल आहे. 
  • हा उद्योग चालू करणे सोपे असते. होलसेल दुकानदाराकडून स्टेशनरी सामान घेऊन जशी मागणी येईल तशी त्याची विक्री करत राहायची. 
  • स्टेशनरी दुकानामधील सामान घेण्यासाठी चांगले डीलर आणि विक्रीसाठी ऑफिसेस,  कंपन्यांशी जोडलेले असणे महत्वाचे आहे. 

  

५. ब्लॉगिंग Blogging– 

  • सर्जनशील कल्पना मनात येत  असतील तर त्या कल्पनांना प्रत्यक्षात लोकांपर्यंत पोहोचवणे  गरजेचे असते. चांगले लिहिता येत असल्यास ब्लॉगिग करणे हा पण एक व्यवसाय आहे.
  • ब्लॉगिंग करताना चालू घडामोडी, शेअर मार्केट किंवा टेकनॉलॉजी क्षेत्रातील ज्ञान असणे गरजेचे असते. 
  • ब्लॉगिंग करण्यासाठी स्वतःची एक वेबसाईट आणि गुगल अनॅलिटीक्सची माहिती असणे आवश्यक आहे. 

नक्की वाचा : विनाभांडवल व्यवसायाचे स्मार्ट पर्याय 

६. हिशोबनिसाचा व्यवसाय करणे Accounting

  • प्रत्येक उद्योग करत असताना झालेल्या कामाचा हिशोब ठेवणे महत्वाचे काम असते. बऱ्याच लोकांना उद्योग करताना याची गरज लागते. 
  • बँकिंग क्षेत्रातील शिक्षण झालेले असल्यास आपण हिशोबनीसाचा व्यवसायास सुरुवात करू शकता. 
  • फायनान्स सर्व्हिस देणे आणि इतर सेवा पुरवताना आपण हा उद्योग यशस्वीपणे करू शकता. 

७. फूड डिलिव्हरी Food delievery business  – 

  • भारतामध्ये शहरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे अशा वाढणाऱ्या शहरांमध्ये फूड डिलिव्हरी बिझनेसला चांगली मागणी आहे. 
  • रेस्टोरंट किंवा क्लाउड किचन सोबत टाय अप केले की फूड डिलिव्हरीचा उद्योग सहज चालू करता येतो. 
  • कमी गुंतवणुकीत चांगला परतावा मिळवून देणारा हा फूड व्यवसाय आहे. 

८. रिअल इस्टेट व्यवसाय  Real estate business – 

  • राहण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यासाठी लोकांना जमीन आणि फ्लॅट खरेदी करायचे असतात. त्यामुळे रिअल इस्टेट उद्योग हा दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे.
  • रिअल इस्टेट उद्योगात अनेक वेगवेगळे उद्योग सुरु करता येतात. त्यामधील एखादा उद्योग निवडून चांगली कमाई करता येऊ शकते. 

९. वेडिंग प्लॅनर Wedding plannar –  

  • तुमच्याकडे काम करताना जर कल्पकता असेल तर तुम्ही वेडिंग प्लॅनर या उद्योगाला सुरुवात करू शकता. 
  • नवरा बायकोला त्यांच्या मनाप्रमाणे लग्न करायची असतात, त्यासाठी त्यांना तुम्हाला कल्पना व्यवस्थित पटवून देता यायला हवी. 
  • कल्पकता असून ती प्रत्यक्षात आणण्याचे कौशल्य तुमच्याकडे असेल तर आपणही या उद्योगाला सुरुवात करता येते.

१०. पाळीव प्राण्यांचे पाळणाघर – 

  • पाळीव प्राणी हल्ली घरोघरी पाळले जातात आणि त्यांच्या काळजीसाठी मालक पाळणाघरात त्यांना ठेवायला तयार असतात. 
  • पाळीव प्राण्यांना सांभाळणे, त्यांची देखभाल करणे हा चांगला उद्योग आहे. 

नक्की वाचा : विनाभांडवल व्यवसायाचे स्मार्ट पर्याय 

११. ऑटोमोबाईल रिपेअरिंग Automobile Repairing – 

  • कार आणि बाईकची संख्या वाढल्यामुळे ऑटोमोबाईल रिपेअरिंग हा व्यवसाय सुरु करता येतो. 
  • घरी जाऊन सर्व्हिस देणाऱ्या ऑटोमोबाईल सर्व्हिसिंगला चांगली मागणी आहे. एखादा व्यक्ती मेकॅनिक असेल आणि त्याने ऑटोमोबाईल रिपेअरिंग व्हॅन चालू केली तरी चालू शकते. 
  • कमी साहित्यात ही व्हॅन चालू करता येते. ऑनलाईन माध्यमातून जाहिरात आणि अँपद्वारे सेवा दिल्यावर हा व्यवसाय वाढवता येतो. 

१२. इलेक्ट्रॉनिक्स रिपेअरिंग Electronics Repairing – 

  • घरी आणि ऑफिसमध्ये इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर जास्त प्रमाणावर केला जातो. 
  • एखाद्या वेळी मोबाईल मध्ये प्रॉब्लेम झाला तरी एखादी समस्या उभी राहू शकते. घरोघरी जाऊन आपण इलेक्ट्रॉनिक्स रिपेअरिंगची सेवा देऊ शकता. 
  • इलेक्ट्रॉनिक्सचे शिक्षण घेतलेले असेल तर हा उद्योग चालू करायला हरकत नाही. 

१३. शैक्षणिकॲप बनवणे – 

  • आपल्याला एखाद्या विषयातील चांगले ज्ञान असले तर ऑनलाईन अँप बनवून शिकवणीला सुरुवात करता येते. 
  • शैक्षणिकॲप मध्ये सामान्य ज्ञान, गणित, आणि इतर विषयांच्या संदर्भात माहिती देऊन आपण चांगल्या व्यवसायाला सुरुवात करू शकता. 

१४. केक बनवणे – 

  • बेकरी प्रोडक्ट्ला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. एखाद्याच्या वाढदिवसाला किंवा आनंदाच्या क्षणी केक आवर्जून मागवला जातो. 
  • कमी किमतीत बेकरीच्या व्यवसायाला सुरुवात करता येते. त्यामधून केक, पाव आणि बिस्किटे बनवून त्याची आपण विक्री करू शकता. 
  • बेकरी हा उद्योग दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. घरगुती पद्धतीने बेकरीचे प्रोडक्ट बनवले तर त्याची विक्री करणे सहज सोपे जाते आणि खर्चही कमी येतो. 

१५. सीसीटीव्ही विक्री आणि दुरुस्ती  – 

  • हल्लीच्या काळात लोक वैयक्तिक सुरक्षेकडे लक्ष देत असल्यामुळे सीसीटीव्ही उद्योग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. 
  • चोरी होऊ नये किंवा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर लक्ष राहावे म्हणून सीसीटीव्हीची सेवा पुरवली जाते. 
  • कमी भांडवलात सीसीटीव्हीचा उद्योग सुरु करता येतो. सीसीटीव्ही विक्रीसोबत आपण त्याची सर्व्हिसिंगचीही सेवा देऊ शकता. 

निष्कर्ष : 

  • स्टीव्ह जॉब्स यांनी एकदा म्हटले होते की, “आपल्याकडे असणारा वेळ कमी आहे. त्यामुळे दुसऱ्याकडे काम करण्यासाठी त्याचा उपयोग करू नका.” 
  • उद्योग करताना  सुरुवातीला थोडा त्रास झाला तरी तो सहन करून घ्यायला हवा.
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…