Digital Marketing
https://bit.ly/3q9xKf4
Reading Time: 2 minutes

Digital Marketing

‘डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing)’ हा सध्याच्या व्यावसायिक जगतातील एक महत्वाचा शब्द बनला आहे. स्मार्टफोनच्या आगमनानंतर इंटरनेट हा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. अगदी घरातल्या वाणसमानापासून ते अगदी दागिन्यांपर्यंत सर्वकाही ऑनलाईन खरेदी करता येत. जवळपास सर्वच क्षेत्रातील व्यवसायिक व्यवसाय उभारणी व व्यवसाय वृद्धी दोन्हीसाठी या डिजिटल मार्केटिंगचा वापर करत आहेत. जॉब पोर्टलवर सर्च केल्यास ‘डिजिटल मार्केटिंग’ या फिल्डमध्ये हजारो नोकऱ्या (Job openings) आढळतील.  

ईमेल, एसएमएस यांच्याही पुढे जाऊन सोशल मीडिया हे डिजिटल मार्केटिंगचे सर्वात प्रभावी माध्यम बनले आहे. व्यवसाय वृद्धीसाठी डिजिटल मार्केटिंगचे धोरण आखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आजच्या लेखात आपण डिजिटल मार्केटिंगच्या विविध पर्यायांबद्दल माहिती घेणार आहोत.

हे नक्की वाचा: विनाभांडवल व्यवसायाचे स्मार्ट पर्याय 

Digital Marketing:  डिजिटल मार्केटिंगचे लोकप्रिय पर्याय

१. सोशल मीडिया: 

 • सोशल मीडिया मार्केटिंग हा  पर्याय  सर्वांच्या  नित्य परिचयाचा  आहे. अत्यंत  प्रभावी  असणारा हा  पर्याय  तितक्याच वेगाने विकसित  होत  आहे. याचं  महत्वाचं  कारण  म्हणजे  खरेदीदारांची सर्वात जास्त संख्या २४ X ७ इथे उपलब्ध असते. 
 • दिवसभरात सोशल मीडियाच्या विविध ॲपवर लोक कित्येक तास घालवत असतात. त्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या जाहिरातींना भरपूर प्रतिसादही मिळतो. 
 • आकर्षक फोटोज, व्हिडीओ, नाविन्यपूर्ण आणि प्रभावी कंटेंट यांच्या आधारे आपला ब्रँड/ व्यवसाय लोकांपर्यत पोहचवायचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे सोशल मीडिया.
 • आजच्या व्यावसायिकांना फेसबुक, इंस्टाग्राम  LinkedIn, ट्विटर, पिंटरेस्ट अशा अनेक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सतत क्टिव्ह राहणं अत्यंत आवश्यक आहे. 
 • यामध्येच अजून एक पर्याय म्हणजे सोशल मीडिया ड्स! आपल्या व्यवसायच्या जाहिरातीसाठी हा सर्वात सोपा आणि तुलनेने स्वस्त उपाय आहे.  सोशल  मीडिया ड्समुळे तुम्ही एकाच वेळी अनेक ग्राहकांपर्यंत पोहचू  शकता. 

२. आकर्षक वेबसाईट-  युएक्स (UX) डिझाईन व कंटेंट ऑप्टिमायझेशन: 

 • तुमच्या ग्राहकांवर सर्वात आधी प्रभाव कुठल्या गोष्टीचा  पडतो, तर तो तुमच्या वेबसाइटचा. लक्षात ठेवा First impression is the last impression. त्यामुळे आकर्षक वेबसाईट व कंटेंट हा खूप महत्वाचा घटक  आहे. 
 • आकर्षक जाहिरातींमुळे ग्राहक तुमच्या वेबसाईटवर येतो. अशावेळी तुमची वेबसाइट आकर्षक असेल तर ग्राहक तुमच्या उत्पादनाकडे आपोआपच खेचला जाईल. 
 • वेबसाइटवरील कंटेंटला ऑप्टिमाइज करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही नवव्यावसायिक असाल तर वेबसाईटसाठी UX डिझाईनचा वापर  करा.  
 • सर्वात  महत्वाचे  म्हणजे यामुळे तुमची वेबसाईट  जास्तीत  जास्त  आकर्षित  व युझर फ्रेंडली बनेल आणि हे ग्राहकांना आकर्षित  करण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. 

विशेष लेख: नोकरी करू की व्यवसाय?

३. इन्फ्लूएन्सर मार्केटिंग: 

 • विश्वास हा कोणत्याही व्यवसायाचा पाया आहे आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करायचा असल्यास, ब्रँडची विश्वासार्हता तयार होणे खूप महत्वाचे आहे. 
 • ग्राहकांचा विश्वास मिळविण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे इन्फ्लूएन्सर मार्केटिंग. इन्फ्लूएन्सर मार्केटिंग हा ब्रॅंडिंगसाठी वापरण्यात येणार लोकप्रिय पर्याय आहे.
 • या प्रकारामध्ये योग्य कंटेंटच्या माध्यमातून आपले उत्पादन व सेवांचे मार्केटिंग केले जाते. सोशल मिडियाच्या माध्यमातून ग्राहकांची विश्वासार्हता तयार करणे, घराघरात आपला बरंच पोचवणे, संबंधित संधी व बाजारपेठ ओळखणे आदी गोष्टी साध्य केल्या जाऊ शकतात. 
 • याचे अनेक प्रकार असून स्पॉन्सर ब्लॉग्ज, स्पॉन्सर सेलिब्रेटी कंटेंट, स्पॉन्सर फेसबुक जाहिराती, इ. प्रकार लोकप्रिय आहेत. 

४. गूगल ड्स: 

 • गूगल ड्स हे सर्वात जुने व लोकप्रिय साधन आहे. इंटरटेनटवर ७५% पेक्षा जास्त ट्रॅफिक गूगल सर्चच्या  माध्यमातून येते.
 • गूगल सर्च ड्स व डिस्प्ले ड्स हे डिजिटल मार्केटिंगमधील सर्वात जास्त उपयोगी पडणारे साधन आहे. 
 • विविध ‘कस्टमाइज्ड ड्स’ साठी या प्लॅटफॉर्मचा वापर केला जाऊ शकतो. तसेच, गूगलच्या डॅशबोर्डवर इन-डेफ्थ डाटा असतो. आपले डिजिटल मार्केटिंग अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी याचा वापर करता येतो. यामध्ये युट्यूब सर्च ड्सचाही वापर करता येतो.

आजच्या डिजिटल युगामध्ये मार्केटिंगचे स्वरूपही बदलत चालले आहे. डिजिटल मार्केटिंगचा वापर करून तुम्ही तुमचा व्यवसाय प्रस्थापित करू सुरू शकता. तेव्हा आपल्या व्यवसायला डिजिटल मार्केटिंगची जोड द्या आणि यशस्वी व्हा. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Digital Marketing Marathi Mahiti, Digital Marketing in Marathi, Digital Marketing Marathi 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.