बँकिंग, बँक मनी आणि वाढते वैयक्तिक कर्ज

Reading Time: 4 minutesवैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण यावर्षी वाढले असून ते बुडविणाऱ्यांचे प्रमाण नगण्य आहे, असा एक अभ्यास नुकताच प्रसिद्ध झाला आहे. देशातील बँकमनी वाढला असून त्यातून बँकिंगचे फायदे घेणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढते आहे, असा हा निष्कर्ष सांगतो. सुदृढ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हा बदल महत्वाचा आहे.

भांडवल बाजारामध्ये गुंतवणूक करताय? मग आधी हे वाचा

Reading Time: 3 minutesभांडवल बाजाराबद्दल लोकांचे दोन टोकाचे गैरसमज आहेत. ते म्हणजे यातून भरपूर पैसे मिळतात किंवा यात लोक भिकेला लागतात. सर्वसाधारण काही न करता आपल्याला भरपूर पैसे मिळावेत अशी सुप्त इच्छा असलेल्या भरपूर व्यक्ती आहेत आणि त्यांच्या मानसिकतेचा फायदा घेणारे लोकही आहेत. या बाबतीत अनेक प्रकारे प्रबोधन होत असूनही एक क्षण असा येतो की व्यक्तिला मोह होतो आणि ती फसते. फसवे दावे करण्यास कायदेशीररित्या बंदी असली तरी अनेक ठिकाणी सर्रासपणे त्याचे उल्लंघन केले जात आहे. त्यावर अंकुश ठेवणाऱ्या यंत्रणेच्या मर्यादा आहेत.

अमित शहा, राहुल गांधी आणि  अमिताभ बच्चन यांच्यातील साम्य !

Reading Time: 3 minutesभांडवली बाजारावर आधारित अर्थकारण जगाने स्वीकारले आणि ते भारतालाही स्वीकारावे लागले. पारदर्शी आर्थिक व्यवहार आणि संपत्ती वितरणाचा तो एक मार्ग आज मानला जातो. अपारदर्शी आणि अचल अशा जमीन आणि सोन्यातील गुंतवणूक कमी करून आपल्या राजकीय नेत्यांनी गुंतवणुकीचा जो नवा मार्ग निवडला आहे, तो त्यांच्या तर हिताचा आहेच, पण तो देशाच्याही हिताचा आहे.

कसे कराल बोनसचे नियोजन?

Reading Time: 3 minutesआर्थिक नववर्षाची सुरुवात करून देणारा एप्रिल महिना बहुसंख्य नोकरदारांसाठी विशेष महत्त्वाचा असतो. त्यांचे वार्षिक अप्रायजल झालेले असल्यामुळे साधारण याच सुमारास त्यांना त्यानुसार वार्षिक बोनस मिळणार असतो व पुढील वर्षासाठीची पगारवाढ ठरणार असते. बोनस किंवा तत्सम इतर कुठलाही एकरकमी मोठा निधी हातात आला, की त्याच्या खर्चाला वाटा फुटायला वेळ लागत नाही. तसे होऊ नये यासाठी अशा ‘लम्प-सम’च्या गुंतवणुकीचा विचार प्रत्येकाने आधीपासूनच करणे योग्य असते.

आपल्या आधार कार्डचा गैरवापर कसा शोधाल?

Reading Time: 2 minutesआपलं आधार कार्ड भारतातील एक महत्वाचे ओळखपत्र आहे. १२ अंकी युनिक ओळख नंबर (Unique Identification Number) असलेल्या आपल्या आधार कार्डास आपला मोबाइल नंबर, पॅन आणि बँक खात्यास जोडणे अनिवार्य करण्याचा निर्णय आला आणि देशात ‘राईट टू प्राईवसी’चं वादळ उठलं. आपली सर्व माहिती धोक्यात आहे आणि त्याचा गैरवापर होऊ शकतो, या भावनेने काहीसं असुरक्षिततेचं  वातावरण निर्माण झालं. आता तुमच्या आधार कार्डचा कुठे गैरवापर होतोय का? हे तुम्ही तपासू शकता.

काटकसरीचे कानमंत्र भाग २

Reading Time: 3 minutesप्रत्येक श्रीमंत व्यक्तीचा काटकसरीच्या मार्गानेच धनोढ्य झाला आहे असे नाही. वेगवेगळ्या अनैतिक मार्गांनीदेखील संपत्ती मिळवता येते, पण ही श्रीमंती क्षणिक असते. ज्या गतीने पैसा येतो त्याच गतीने पैसा जातो देखील. सावकाश येंणारी श्रीमंती मात्र काटकसरीच्या सवयीने येते आणि दीर्घकाळ टिकते. जास्त पैसा असणे म्हणजे जास्त खर्च करणे या पेक्षा जास्त बचत करणे असे समीकरण असेल तर ती श्रीमंती टिकते. नाहीतर पत्त्याचा बंगला कोसळावा तशी सर्व संपती क्षणात नाहीशी होते. आपली श्रीमंती टिकवण्यासाठी श्रीमंत काही सवयी अंगी बाळगतात ज्यांना अंगीकार सगळ्यांनीच करायला काही हरकत नाही.

काटकसरीचे कानमंत्र भाग १

Reading Time: 2 minutesआपण देशतील, जगातील श्रीमंत लोकांकडे पाहतो आणि सहज विचार येतो की, हे श्रीमंत आहेत कारण यांचे पूर्वज श्रीमंत होते किंवा त्यांनी पुढच्या पिढ्या श्रीमंत व्हाव्यात याची सोय खूप पूर्वीच करून ठेवली होती. आपण श्रीमंत नाहीत कारण आपल्या आधीच्या पिढ्यांनी आपल्यासाठी फार कोट्यवधी रुपये कमवून ठेवले नाहीत. पण हे साफ चूक आहे. कित्येक श्रीमंतानी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. श्रीमंत होण्यासाठी पूर्वापार संपत्ती किंवा लॉटरीच तिकीट किंवा खजिना सापडावा लागत नाही. गरज आहे ती काही सवयी स्वतः मध्ये रुजवण्याची. मग दहा बाय दहा च्या खोलीत राहणारा आणि महिना १०,००० रुपये कमावणारा माणूस देखील बिलगेट्स, अंबानी, आदानी होऊ शकतो. जाणून घ्या श्रीमंत माणसांचे बचतीचे कानमंत्र.

शेअर्स खरेदीचं सूत्र

Reading Time: 4 minutesगुंतवणूकदारांचे विविध प्रकार आपण यापूर्वी पाहिले आहेत यात गुंतवणूक कालावधीनुसार रोजच्या रोज व्यवहार करणारे ते डे ट्रेडर्स, मध्यम कालावधी साठी गुंतवणूक करणारे त्यांना पोझिशनल ट्रेडर्स, तर दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्याना लॉन्ग टर्म ट्रेडर्स असे संबोधण्यात येते. आपल्या  जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार  गुंतवणूकदार व्यवहार करीत असतात.