Arthasakshar सोन्याच्या किमतीवर परिणाम करणारे घटक
https://bit.ly/2E2jy4x
Reading Time: 3 minutes

सोन्याच्या किमतीवर परिणाम करणारे ५ घटक

सोन्याच्या किमतीवर परिणाम करणारे घटक आर्थिक, भौगोलिक सामाजिक, धार्मिक  तसेच कौटुबिकही असू असतात. कौटुंबिक प्रसंग असोत की धार्मिक उत्सव सोने हा भारतीय ग्राहकांच्या सांस्कृतिक गरजांचा अविभाज्य भाग आहे. भौतिक मालमत्ता म्हणून दागिने बनवण्यासाठी हा धातू महत्त्वाचा मानला जातो. तसेच काही ठिकाणी सोने स्वरुपातील संपत्ती विक्री करण्यायोग्य मानली जात नाही अथवा त्यांची विक्री करणं कमीपणाचं मानलं जात. इतर अनेक घटकांप्रमाणे हे घटकही सोन्याच्या बाजारावर परिणाम करतात. इतर घटकांमध्ये आर्थिक, नियामके, सांस्कृतिक कल, महागाई, समृद्धी इत्यादींचा समावेश होतो. 

Gold ETF and Gold Fund: गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड फंड 

सोन्याच्या किमतीवर परिणाम करणारे ५ प्रमुख घटक : 

१. आर्थिक अनिश्चितता: 

  • एखाद्या संकटामुळे जेव्हा आर्थिक वृद्धी थांबते, तेव्हा मागणी आणि पुरवठ्यातील अनिश्चित चढ उतारांचा परिणाम इक्विटी मार्केट, जागतिक व्यापार आणि एकूणच वित्तीय संस्थेवर होतो.
  • गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांद्वारे त्यांची गुंतवणूक सुरक्षित ठेवू इच्छितात, त्यामुळे अशा प्रकारच्या अनिश्चिततांमुळे त्यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणावे लागते. 
  • अशा स्थितीत, लोक गुंतवणुकीकरिता मालमत्ता प्रकाराकडे वळतात. यात सोन्याला पहिली पसंती मिळते. परिणामी मागणी वाढते आणि त्यानंतर त्याचे दर वाढतात. 
  • याच पार्श्वभूमीवर, सध्या जगभरात आर्थिक तसेच सामाजिक अंदाधुंदी माजवणा-या कोव्हिड-१९ च्या काळात आपल्या देशातील सोन्याचे भावही वाढलेत. 
  • फक्त एप्रिल महिन्यात सोने ११ टक्क्यांनी वाढले. 
  • सहा महिन्यांच्या काळात सोन्याच्या दरांनी डिसेंबर २०१९ मधील ३०,००० रुपयांवरून आजपर्यंत ५४,००० रुपयांचा दर गाठला.

सोन्याच्या घराघरांतील साठ्यासंबंधी लवकरच मोठ्या निर्णयाची प्रतीक्षा 

२. सरकारची धोरणे: 

  • सोन्याच्या पहिल्या दोन जागतिक ग्राहकांमध्ये भारताचा समावेश होतो आणि सरकारच्या अनेक निर्णयांचा परिणाम प्रामुख्याने सोन्याच्या दरांवर होतो. 
  • आरबीआय जेव्हा व्याजदर, वित्तीय धोरणे, वार्षिक सोन्याचे अधिग्रहण, सार्वभौम बाँड्स इत्यादींची घोषणा करते, तेव्हा या सर्वांचा परिणाम बाजारातील भावनांवर होतो. यामुळे दर कमी जास्त होतात. 
  • उदाहरणार्थ, संकटकाळातील आर्थिक पॅकेज, मालमत्तांवरील कर आकारणी आणि इतर सूक्ष्म धोरणे हे सर्व सरकारवर अवलंबून असतात. असे निर्णय अनेकदा आर्थिक संकटाचे समग्र आर्थिक परिणाम लक्षात घेऊन घेतलेले असतात. 
  • तथापि, रोखीचा पुनर्प्रवाह आणि कमोडिटी मार्केटमधील तीव्र वृद्धी यावर आर्थिक सुधारणा अवलंबून असतात.

हिरे की सोने : गुंतवणूकीचा योग्य पर्याय कोणता? 

३. महागाई: 

  • आर्थिक घसरणीवर उपाययोजना करताना, अर्थव्यवस्थेत तरलता आणण्यासाठी सरकार अनेकदा कोट्यवधी रुपयांचे प्रोत्साहन पॅकेजेस जाहीर करतात. 
  • यामुळे अशी वातावरण निर्मिती होते की, नागरिक अतिरिक्त खर्च व गुंतवणूक करायला सुरवात करतात. 
  • अनेकजण सोन्यात गुंतवणूक करून त्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतात.
  • मागील दोन दशकांतील अनुभवांवरून, जागतिक आर्थिक मंदी नंतरच्या महागाईमुळे सोन्याच्या दरात कशी वाढ होत गेली, हे दिसून येते. 
  • त्यानंतर, चलनवाढीच्या काळात सोन्याची बाजारपेठ उजळून निघू  शकते, कारण घाबरलेले गुंतवणूकदार बहुतांश वेळा गोल्ड एक्सचेंज-ट्रेडेड फंड्स (ईटीएफ), सार्वभौम बाँड्स आणि सर्वसाधारणपणे सोन्याच्या मालमत्ता वर्गात गुंतवणूक करून चलनवाढीनंतरच्या  परिस्थितीला सामोरे जायचा प्रयत्न करतात 

४. लोकसंख्या आणि लोकसंख्याशास्त्र: 

  • भारताच्या लोकसंख्याशास्त्रीय लाभांच्या वर्णनांकडे अनेकदा वरदान म्हणून पाहिले जाते. 
  • या विश्वासामुळे वृद्धीच्या संधी निर्माण होण्यास मदत होते. 
  • आपली लोकसंख्या सर्वात तरुण असून इथे ५०% पेक्षा जास्त लोक ४० वर्षे वयाखालील आहेत.
  • त्यामुळे अनेक संस्था तरुण व्यावसायिकांना खर्चाच्या पद्धतीत बदल होण्याची अपेक्षा असते. 
  • ही अपेक्षा म्हणजे, तरुण व्यक्ती सोन्यामध्ये गुंतवणूक करतील, मग ते भौतिक स्वरुपात घेतील किंवा इतर स्वरुपात.
  • पारंपरिक पद्धतीत, सोने खरेदी करण्यासाठी घरातील ज्येष्ठ व्यक्ती व्यापाऱ्याची दुकाने किंवा दागिन्यांच्या दुकानांना प्रत्यक्ष भेट देत असत. 
  • सध्या, अनेक पर्याय उपलब्ध आहेत. उदा. सरकारचे सार्वभौम सोन्याचे बाँड्स आणि ई-गोल्ड डिजिटल सर्व्हिस प्रदात्यांसाठी तरुण व्यावसायिक हे टार्गेट ग्राहक आहेत. 
  • कारण केवळ एका क्लिकच्या बटणाद्वारे, खरेदी-विक्रीच्या सोप्या सुविधेमुळे ते प्रत्यक्ष सोन्याच्याही पुढे जाऊन गुंतवणूक करू शकतात. 
  • सोने हा दक्षिण आणि पश्चिम भारतीय संस्कृती आणि धार्मिक विधींचा अत्यावश्यक भाग आहे. सण-उत्सवाच्या काळात अनेकदा सोन्याचे दर वाढतात. 
  • सोन्याचे दागिने घेण्यासाठी लोक नेहमीच सराफ्याकडे गर्दी करतात. कारण दागिने हे भारतीयांच्या सोन्याच्या वापरातील अविभाज्य घटक बनले आहेत.

सुवर्ण गुंतवणुकीचे ‘डिजिटलायजेशन’

५. वाढते उत्पन्न: 

  • गेल्या काही दशकांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था अनेक पटींनी वाढली आहे. 
  • मध्यम उत्पन्न गटातील उत्पन्नातही वाढ झाली आहे. परिणामी त्यांच्या क्रयशक्तीवरही परिणाम झाला आहे. 
  • संपत्ती निर्मितीचे विविध कमोडिटी मार्केटवर अनेक अनपेक्षित परिणाम होतात. 
  • भारत सोन्याचा सर्वात मोठा ग्राहक असल्याने नव्याने निर्माण झालेल्या संपत्तीमुळे अतिरिक्त खप झाला आहे.

उत्पन्न वाढत असल्याने लोक सोने-मालमत्ता वर्गात खरेदी आणि गुंतवणूक करत आहेत. भारत हा कुटुंब आधारीत समाज असल्याने अतिरिक्त उत्पन्न खर्चात रुपांतरीत होते. यामुळे जास्तीत जास्त उत्पन्नामुळे जास्त खर्च केला जातो. यात बहुतांश वेळा सोने खरेदीला मान मिळतो. काही प्रसंगांमध्ये सोन्याचे दागिने हे प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जाते. जागतिक गोल्ड कौंसिलच्या ताज्या अभ्यासानुसार, उत्पन्नातील प्रत्येक लहानशा वाढीचे परिणाम सोन्याच्या दरवाढीवर होतात. 

– श्री. प्रथमेश माल्या

गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष,

एंजल ब्रोकिंग लिमिटेड

For suggestions queries – Contact us: [email protected] 

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…