शेअर बाजार
https://bit.ly/2Y6v1Xv
Reading Time: 2 minutes

शेअर बाजार

अनेक लोकांना वाटते की शेअर बाजार म्हणजे श्रीमंत लोकांचं काम, बाजारत गुंतवणूक करण्यासाठी मोठे भांडवल लागते, त्यामुळे ते यापासून दूर राहतात. मात्र सत्य यापेक्षा खूप वेगळे आहे. तुम्ही कमीत कमी गुंतवणुकीद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक करू शकतात. उदा. दरमहा ५०० रुपये, १०० रुपयेदेखील आपल्या इच्छेनुसार पुरेसे होतात. वास्तविक पाहता, संपत्ती निर्माण करण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे अल्प प्रमाणात गुंतवणूक करण्याची सवय लावणे. सतत गुंतवणूक करण्याच्या सवयीने आपण भविष्यात उत्तम आर्थिक स्थितीत प्राप्त करू शकतो. 

हे नक्की वाचा: टॅक्स-सेव्हिंग म्युच्युअल फंड्स – गुंतवणूक करण्याची ५ कारणे

शेअर बाजार:गुंतवणुकीस सुरवात करण्यापूर्वी लक्षात ठेवा या ५ महत्वाच्या गोष्टी 

१. दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवा: 

 • गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊन तुम्ही पहिले पाऊल उचलले आहे. आता दीर्घकालीन गुंतवणुकीस प्राधान्य द्या.
 • दीर्घकालीन गुंतवणूक केल्याने आपल्याला जबाबदारीचे भान येते. आपल्यला भविष्यात कधी पैसा लागू शकतो याची तात्पुरती कल्पना आपल्याला येते.अर्थात आधी आपले ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे. 
 • दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्याने चांगला परतावा मिळतो कारण, बाजारातील अल्पकालीन चढ-उतारांचा तुमच्यावर परिणाम होणार नाही.

२. सातत्य राखा: 

 • या प्रवासात सातत्य राखल्याने तुम्ही तुमचे आर्धिकी उद्दिष्ट सहज पूर्ण करू शकाल. कारण गुंतवणुकीसाठी सततची वचनबद्धता आवश्यक असते. 
 • एक गुंतवणूकदार म्हणून उत्तम परतावा मिळवण्यासाठी तुम्ही नियमित आणि सतत प्रयत्न केले पाहिजेत. 
 • नियमितपणे गुंतवणूक करणे, हेच महत्त्वाचे आहे. तुम्ही ठरवलेल्या आठवड्यात पैसे बाजूला काढता आले नाहीत, तर त्यापुढील आठवड्यात ते काढण्याचा प्रयत्न करा.

३. जोखीमीची तयारी समजून घेणे आवश्यक आहे: 

 • आपली जोखीम पत्करण्याची ताकद तसेच जोखीम असताना कुठे थांबायचे हे समजल्यास तुम्ही हा गुंतवणुकीचा प्रवास सहज पूर्ण करू शकता. 
 • एक गुंतवणूकदार म्हणून, आपल्या व्यक्तीमत्त्वाची ओळख करून घेतल्यास गुंतवणुकीच्या प्रवासावर लक्ष ठेवण्यास मदत होईल. 
 • तुमची जोखिमीची तयारी समजून घ्या. तुम्हाला नंतर मानसिकदृष्ट्या अस्थिर करतील, असे निर्णयच घेऊ नका. 
 • याचवेळी, तुम्ही कोणती जोखीम सहन करू शकता, याचेही स्पष्टचित्र तुमच्यासमोर असेल.

महत्वाचा लेख: Share Market: सुरक्षित ट्रेडिंग कसे करावे?  

४. भावनांवर नियंत्रण ठेवा: 

 • आपल्या गुंतवणुकीच्या मार्गावर भावनिक क्षणांचा सामना करावाच लागणार आहे. 
 • पैसा कमावणे आणि तो गमावणे या विचारचक्रात तुम्ही अनेकदा अडकाल. अशावेळी, निराश होऊन किंवा भावनिक निर्णय घेऊ नका. 
 • अशावेळी निर्णायक खेळी करणे आवश्यक आहे. अनाठायी भिती किंवा नैराश्यामुळे घाईघाईत निर्णय घेणे टाळल्यास उत्तम नफा मिळवता येईल.

५. गुंतवणुकीत वैविध्य ठेवा: 

 • विविधता हा उत्तम पर्याय व अर्थातच बॅकअप प्लॅन असतो. त्यामुळे तुमच्या गुंतवणुकीच्या आलेखामधील हा महत्त्वाचा घटक असला पाहिजे. यामुळे प्रतिकुल परिस्थितीत जोखीम कमी करण्यास मदत होते. 
 • थोडक्यात सांगायचे तर विविधता बाजाराच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ढाल बनून तुमचे रक्षण करते.
 • केवळ ठराविक क्षेत्रातच नव्हे तर त्यांच्या अंतर्गत आणि सर्व कमोडिटी आणि शक्य असल्यास बाँडमध्येही गुंतवणूक करा.
 • कधी कधी, गुंतवणुकीचा प्रवास त्रासदायक ठरू शकतो, कारण आर्थिक अडचणी कधीही यऊ शकतात. त्यामुळे अशी व्यवस्था करणे आवश्यक आहे.

विशेष लेख: Investment FAQ : गुंतवणुकीसंदर्भात काही प्रश्न व त्याची उत्तरे

अखेरीस, तुम्ही किती संपत्ती निर्माण करू शकता, यावर तुम्ही गुंतवणूकदार म्हणून किती हुशार आहात, हे कळते. तुमच्या गुंतवणुकीच्या प्रवासात घेतलेले लहान निर्णयांचाही तुमच्या पोर्टफोलिओवर परिणाम होतो. त्यामुळे वर नमूद केल्याप्रमाणे अनुभवानुसार आखलेली धोरणे आणि प्रयत्नानुसार चालणे, नेहमीच योग्य ठरेल. 

– श्री प्रांजल कामरा

मुख्य कार्यकारी अधिकारी, फिनॉलॉजी 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Stock Market Investment Marathi, Stock Market investment in Marathi, Stock Market Investment Marathi Mahiti, Share Market Investment Marathi, Share Market in Marathi, Share Market Marathi, Share Market Investment in Marathi, Share Market investment Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…