बजेटच्या हलवा सेरेमनीमागचं रहस्य

Reading Time: 2 minutes

फेब्रुवारी महिना सुरू झाला की प्रत्येकाला विशेषतः अर्थसाक्षर लोकांना ‘बजेट’चे वेध लागतात. बजेट संसदेत सादर झाल्यावर न्यूज चॅनल्सवर, सोशल मीडियावर सगळीकडे बजेटवर चर्चा सुरू होते. बजेटबद्दल सगळ्यांना आकर्षण असतं. परंतु हे बजेट तयार कसं होतं? कुठे तयार होतं? त्याची प्रक्रिया काय? हे मात्र बहुतेकांना माहिती नसते. ‘बजेट जन्माची’ ही माहिती फार रंजक आहे.

बजेटची तयारी आणि हलवा सेरेमनी:-

  • बजेट तयार होतं ते एका अत्यंत कडक सुरक्षा असलेल्या जागी. ती जागा  म्हणजे ‘नॉर्थ ब्लॉक’ येथील तळघर!
  • तिथे दहा दिवस अर्थमंत्री आणि बजेट टीम काम करत असते. कोणालाही बाहेरच्या जगाशी संबंध, संपर्क ठेवण्याची परवानगी नसते. स्वतःच्या कुटुंबियांशीदेखील बजेट टीमला कोणताच संपर्क करता येत नाही. ही सारी ‘खुफिया’ प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी एक समारंभ केला जातो. त्यास ‘हलवा सेरेमनी’ म्हणतात.
  • ही काही कोणती पूजा नाही, फक्त एक वारसा, परंपरा आहे. अर्थमंत्री या कार्यक्रमाचं  नेतृत्व करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बजेट टीमसाठी मोठ्या कढईत शिरा म्हणजे हलवा तयार केला जातो. तो सगळ्या टीमला खायला दिला जातो. त्यानंतर सर्वजण नॉर्थ ब्लॉकच्या तळघरात जातात आणि इथून त्यांचा बाह्यजगाशी संपूर्णपणे संबंध तुटतो.
  • कोणालाही मोबाईल फोन आतमध्ये नेता येत नाही. आतमध्ये फक्त इंटरकॉम प्रकारातील एक लँडलाईन फोन असतो, ज्यात फक्त ‘इनकमिंग’ कॉल्सची सुविधा असते. या फोनवर जेव्हा बजेटटीममधील सदस्य  बोलतात त्यावेळी ‘इंटलीजन्स’ म्हणजे ‘गुप्तहेर खात्यातील’ माणूस तिथे हजर असतो.
  • आयबी (IB) म्हणजे इंटलीजन्स ब्युरोच्या देखरेखीखाली संपूर्ण सुरक्षा असते.  कुठेही कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये यासाठी काळजी घेतली जाते. बजेट हे अत्यंत गुप्तपणे तयार केलं जातं.
  • नॉर्थब्लॉकच्या तळघरात प्रत्येक मेंबरला झोपण्यासाठी पलंग, काम करण्यासाठी टेबल दिलेलं असतं. खाण्याची सोयदेखील तिथेच केलेली असते. कोणालाही दहा दिवस बाहेर पडता येत नाही. फक्त अर्थमंत्री आणि मोठ्या हुद्द्यावरील काही मोजक्या अधिकाऱ्यांना अधूनमधून बाहेर पडता येतं. या तळघराला ‘बंकर’चं रूप आलेलं असतं. या तळघरात डॉक्टर व स्वयंपाकी असतात. आतमध्ये संपूर्ण सोयी असतात.
  • बजेट तयार झाल्यावर ते छापण्यापूर्वी तळघरातच ‘प्रूफ रिडर्स’ कडून ते नीट तपासलं जातं. व्याकरणातील चुका दुरुस्त केल्या जातात.
  • नॉर्थ ब्लॉकमध्येच प्रिंटिंग प्रेस असते. बजेट टीमने बजेट तयार केलं की त्या प्रिंटिंग प्रेसवर ते बजेट प्रिंट केलं जातं. दहा दिवसांनंतर ते छापलेलं भलंमोठं बजेट अत्यंत सुरक्षेमधून बाहेर आणलं जातं.
  • इंडियन आर्मीची, पोलिसांची कडक सुरक्षा असते. कडक सुरक्षेमधून ते संसदेत आणल्या जातं. फक्त दहा मिनिटांपूर्वी कॅबिनेट मंत्रिमंडळाला बजेटचं संक्षिप्त रूप दाखवलं जातं. बजेट हे ‘टॉप सिक्रेट डॉक्युमेंट’ म्हणून ओळखलं जातं.
  • बजेटसंदर्भात एवढी सुरक्षितता बाळगण्याचं कारण म्हणजे अर्थव्यवस्थेसंबंधित कोणतीही महत्वाची माहिती बाहेर जात कामा नये. तसे झाल्यास, अप्रत्यक्ष करासंबंधित माहिती बाहेर गेल्यास काही व्यापाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फायदा होऊ शकतो आणि एकप्रकारे इतर जनतेवर अन्याय होऊ शकतो.

२१ जानेवारीला भारतीय अर्थमंत्रालयाचा “हलवा कार्यक्रम” पार पडला.  अर्थमंत्री अरुण जेटली अमेरिकेत असल्याने यात सहभागी होऊ शकले नाहीत. पण अर्थ मंत्रालयातील इतर मोठया हुद्द्यावरील अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हा कार्यक्रम पार पडला. १ फेब्रुवारीला अर्थमंत्री अरुण जेटली बजेट सादर करणार आहे.

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2DLp09i)

केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे काय?बजेट २०१९ : तुम्हाला माहिती असायलाच हवे असे काही,

 २०१९ साठी आर्थिक नियोजनाच्या ६ सोप्या स्टेप्स…,  २०१९ च्या आर्थिक नियोजनाचे ९९संकल्प – भाग १

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.
Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा.आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *