Arthasakshar Investment FAQ
Reading Time: 5 minutes

Investment FAQ

गुंतवणूक करताना सर्वसामान्य गुंतवणूकदारांना अनेक प्रश्न पडत असतात. आजच्या लेखात गुंतवणुकीसंदर्भातील काही मूलभूत प्रश्नोत्तरांची (Investment FAQ) माहिती घेऊया. 

हे नक्की वाचा:म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील चुका कशा टाळाव्यात?

Investment FAQ : गुंतवणुकीसंदर्भात काही प्रश्न व त्याची उत्तरे –

१. नमस्कार, माझी  मनी बॅक पॉलिसी (MONEY BACK POLICY) रु ११,००० आणि एन्डॉवमेंट पॉलिसी ENDOWMENT POLICY  रु. १६,५०० सुरु आहे. प्रत्येकी २ हप्ते भरले आहेत. टाइम पिरियड १२ व १५ वर्षे आहे. म्युच्युअल फंड बद्दल अगोदर फारशी माहिती नव्हती . आज पोलिसी बंद करायची म्हटली तरी पूर्ण मुद्दल मिळणार नाही, काय करायला हवे?’सुरु ठेवू का बंद करू?  कृपया तुमचे मत कळवा.

  • नमस्कार आपण किती रकमेचा विमा घेतला हे लिहिले नाही. विम्याच्या हप्त्याप्रमाणे हे मनी बॅक किंवा एन्डॉवमेंट प्रकारातल्या विमा योजना आहेत. एवढा मोठा मासिक हप्ता भरल्यानंतर मुदतीनंतर आपल्याला साधारण % परताव्याची रक्कम परत मिळेल.
  • विमा आणि गुंतवणूक यांची गफलत करू नये. विमा संरक्षणासाठी मुदतीचा विमा घ्यावा जेणेकरून कमीत कमी हप्त्यांमध्ये खूप मोठ्या रकमेचे विमा छत्र मिळते. विमा योजना वर्षाच्या आत बंद केल्यास साधारण काहीच रक्कम परत मिळत नाही. वर्षांनंतरही बंद करायची असल्यास मुद्दलामध्ये नुकसान होते. वरील उदाहरणात तुम्ही दोन्ही विमा योजना बंद कराव्यात. जरी आता दोन हप्त्यांचे नुकसान झाले तरी पुढे होणारे मोठे नुकसान टाळता येईल. एकूण रु २७,५०० च्या मासिक गुंतवणुकीतून रु. २५०० ते रु ३५०० हप्ता बसेल असा मुदतीचा विमा घ्यावा.
  • तुमचे वय ३५४० च्या वयोगटात असेल तर साधारण रु. ७५लाख किंवा रु. करोड चा मुदतीचा विमा छत्र मिळू शकेल. उरलेली रु. २४,००० / २५,००० ची म्युच्युअल फंडात प्रत्येकी रु ,००० च्या प्रकारच्या योजनांमध्ये एसआयपी (SIP) चालू करावी ती १२१५ वर्षे चालू ठेवावी. म्युच्युअल फंडाने दीर्घ मुदतीमध्ये किमान १२ % परतावा दिला तरी आपली गुंतवणूक वाढून साधारण रु. .२५ कोटी इतकी होऊ शकते. म्हणजेच आपल्याला मोठ्या रकमेचे विमाछत्र आणि आपली चांगली धनवृद्धी होऊ शकते.

२. नमस्कार, माझे वय ३० आहे.  एक वर्षांपूर्वी घरासाठी रु. ३० लाखाचे २० वर्षे मुदतीचे कर्ज घेतले आहे. कर्जाचा हप्ता रु. २७,००० आहे. घराच्या मोठया मासिक हप्त्यामुळे बचत काहीच होत नाही. कुटुंबामध्ये पत्नी व एक २ वर्षाची मुलगी आहे. मी आर्थिक नियोजन कसे करावे?

  • नमस्कार, सर्वप्रथम आपण किमान रु. ६० लाख इतका मुदतीचा विमा घ्यावा. विम्याचा हप्ता साधारण महिन्याला रु.१००० च्या आसपास होईल. आपण जर फक्त कर्जाच्या परतफेडीची चिंता करत बसलो तर आपली धनवृद्धी होणार नाही. आपण घरकर्जाच्या हप्त्याच्या १०% म्हणजे साधारण रु ,७०० ची २० वर्ष एसआयपी (SIP)चालू करा.
  • म्युच्युअल  फंडातून साधारण १४% परतावा गृहीत धरला तर २० वर्षांमध्ये गुंतवणुकीतील वाढ साधारण रु. ३५ लाख होईल. जर तुम्ही तुमची रु ,७०० ची एसआयपी  ची रक्कम दर वर्षी फक्त १०% वाढवलीत म्हणजेच दुसऱ्या वर्षी रु ,९७० तिसऱ्या वर्षी रु ,२५० तर  २० वर्षांमध्ये गुंतवणुकीतील वाढ साधारण रु. 67 लाख होईल म्हणजेच ज्यावेळी तुमचे घर कर्जमुक्त झालेले असेल. त्यावेळी मुलीच्या उच्च शिक्षणासाठी आणि लग्नासाठी एक चांगली धनराशी जमा झालेली असेल. मात्र त्यासाठी शिस्तबद्ध पद्धतीने २० वर्ष एसआयपी  चालू ठेवणे आवश्यक आहे.                     

 संबंधित लेख: म्युच्युअल फंड संबंधित काही रोचक माहिती

३. नमस्कार, माझे वय ४८ आहे, माझ्याकडे ८ विमा पॉलिसी आहेत. वर्षाला रु १,६७,००० मी विम्याचा हप्ता भरतो. माझ्या विमा सल्लागाराने सांगितले की मला निवृत्तीवेळी साधारण रु २८ लाख मिळतील. पोस्ट च्या योजनेमध्ये ५ वर्षासाठी रु. ८ लाख गुंतविले आहेत. माझी दरमहा आणखी रु. ७,००० बचतीची तयारी आहे. माझ्या निवृत्ती नियोजनासाठी मी आणखी काय करावे? मला पेन्शन नाही.

  • नमस्कार , तुमचे आतापर्यंतचे आर्थिक नियोजन हे कोणतीही जोखीम घेता केलेली गुंतवणूक आहे. पोस्ट विमा यातील गुंतवणूक आपल्याला साधारण % परतावा देतात. तसेच ह्या योजना व्याजही संबंधित आहेत. आपला देश जसा मोठी आर्थिक प्रगती करेल तेंव्हा येणाऱ्या काळात व्याजाचे दर आणखी खाली जातील (लक्षात घ्या २००० साली व्याज दर साधारण १२१३ % होते). अशा वेळी आपल्याला निवृत्तीनंतर चांगली पेन्शन मिळण्यासाठी आपली गुंतवणूक आपल्याला जास्त परतावा कुठून मिळेल अशा योजनांमध्ये गुंतवणूक करावी.
  • आपल्या चालू असलेल्या विमा योजना जुन्या असतील तर त्या मुदतीपर्यंत चालू ठेवा. पोस्टाच्या योजनाची जेव्हा मुदतपूर्ती होईल तेव्हा ती रक्कम म्युच्युअल फंडाच्या हायब्रीड कॅटेगरी मध्ये वळती करा. म्युच्युअल फंडमध्ये ,००० रुपयांची एसआयपी  चालू करा दर वर्षी एसआयपी  ची रक्कम १०% वाढवा. १४% परतावा गृहीत धरल्यास त्यातून साधारण रु. ४० लाख धनराशी जमा होईल. निवृत्तीनंतर सर्व गुंतवणूक म्युच्युअल फंडाच्या हायब्रीड कॅटेगरी फंड मध्ये एकत्रित करून त्यातून एसडब्लूपी (SWP) द्वारे दरमहा नियमित पेन्शन घेऊ शकाल. त्याच बरोबर आपल्या गुंतवणुकीत वाढ होण्याची शक्यता म्युच्युअल फंडामध्ये शक्य आहे.           

इतर लेख : उत्तम परतावा आणि करबचतीचा पर्याय – ईएलएसएस

४. नमस्कार , माझे वय ३२ आहे , मी व माझी पत्नी दोघे सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करतो, दोघांचे एकत्रित मासिक उत्पन्न साधारण रु ३ लाख आहे. सध्याचा मासिक खर्च रु. ७०,००० आहे व बँकेतील बचत रु. ८,००,००० आहे. वयाच्या ४५ व्या वर्षी माझा स्वतःचा व्यवसाय करायचे स्वप्न आहे. त्यासाठी मला रु. ४ कोटी भांडवल लागू शकेल. मी गुंतवणूक कशी करावी?

  • नमस्कार , सर्वप्रथम आपण आपला रु २ कोटी रकमेचा मुदतीचा विमा घ्यावा, ज्यात काही अघटीत घडल्यास रु १ कोटी ताबडतोब व बाकीचे रु १,००,००० दरमहा १० वर्षे मिळतील अशी विमा योजना घ्यावी.
  • असे केल्याने आपल्या कुटुंबाचे संरक्षण होईल. बँकेतील रक्कम तशीच ठेवावी जी आपण आपत्कालीन गरजेसाठी वापरू शकतो. आपल्या महिन्याच्या रु. २,३०,००० बचतीतून रु.३०,००० डेट फंड एसआयपी (SIP) व रु २,००,००० इक्विटी फंडात एसआयपी करावी. इक्विटी म्युच्युअल फंडाने किमान १२% परतावा दिला तरी आपली गुंतवणूक वाढून साधारण रु. ७.५ करोड होईल.
  • डेट फंडमधील एसआयपी मधून तुमची अल्पकालीन स्वप्ने जसे गाडी, विदेश यात्रा वैगरे पूर्ण करता येतील व इक्विटी एसआयपी मधून आपण वयाच्या ४५ व्या वर्षी निवृत्ती घेऊन आपले ड्रीम व्हेंचर चे स्वप्न साकारू शकाल.        

५. नमस्कार माझा पगार रु. २०,००० आहे. महिन्याला जेमतेम रु. ५०० किंवा रु. १००० ची बचत होते, एखाद्या महिन्यात काहीच बचत होत नाही. मी कुठे पैसे साठवले तर १२-१५ वर्षात चांगली वाढ होईल.

  • गुंतवणूक ही सर्वांसाठी आहे. आपली बचत कमी जरी असली तरी आपण आपल्या भवितव्यासाठी गुंतवणूक करू शकतो. तुम्ही म्युच्युअल फंडात एसआयपी (SIP) चालू करा. रु. १००० ची एसआयपी  १५ वर्ष चालू ठेवल्यास, १४ % परतावा गृहीत धरून गुंतवणूक वाढून रु. ६ लाख होऊ शकेल.
  • एखाद्या महिन्यात जर आपल्या बँकेत रु. १००० जमा नसतील व त्या महिन्यात आपली एसआयपी नाही झाली तरी आपल्याला काही दंड भरावा लागत नाही. फक्त लागोपाठ ३ महिने जर आपल्या बँकेत आवश्यक जमा नसेल व ३ महिने एसआयपी नाही झाली तर एसआयपी बंद होते व आपल्याला पुन्हा चालू करण्यासाठी पुन्हा सर्व प्रक्रिया करावी लागते. त्याच बरोबर आपली कौशल्य क्षमता वाढवून आपले उत्पन्न अधिक कसे वाढवता येईल याकडेही आपण पहिले पाहिजे.                 

महत्वाचे लेख: डायरेक्ट वि. रेग्युलर म्युच्युअल फंड गुंतवणूक योजना

६. नमस्कार , मी ३ महिन्याने निवृत्त होणार आहे. मला साधारण रु. ७२ लाख निवृत्ती लाभ मिळतील. मला माझ्या गुंतवणुकीतून दरमहा रु. ४५,००० हवे आहेत मी कशी गुंतवणूक करावी?

  • निश्चित परताव्याच्या योजना जसे पोस्ट ऑफिस किंवा विमा कंपन्यांच्या पेन्शन योजना आहेत मात्र त्यात तरलता नसते. तसेच यातील मिळणारे उत्पन्न हे महागाई वर मात करणारे नसते. तुम्ही म्युच्युअल फंडाचा पर्याय स्वीकारावा जेणे करून गुंतवणुकीला तरलता राहील जास्त परतावा मिळण्याची शक्यता वाढेल.
  • म्युच्युअल फंडाच्या योजनेतील जोखीम कमी करण्यासाठी आपण आपल्या गुंतवणुकीचे निरनिराळ्या कॅटेगरी मध्ये वर्गीकरण करा. रु. लाख अल्ट्रा शॉर्ट टर्म कॅटेगरी मध्ये जे तुमच्या आपत्कालीन गरजेसाठी असतील. प्रत्येकी रु २२ लाख हे –
    • इक्विटी सेविंग फंड कॅटेगरी
    • कॉन्सर्व्हेटिव्ह हायब्रीड फंड कॅटेगरी
    • अग्ग्रेसिव्ह हायब्रीड फंड कॅटेगरी, यामध्ये वर्गीकरण करा
  • कॅटेगरी इक्विटी सेविंग फंड कॅटेगरी मधून रु.१३,००० ची एसडब्लूपी (SWP) करावी. कॉन्सर्व्हेटिव्ह हायब्रीड फंड कॅटेगरीमधून रु.१५,००० ची एसडब्लूपी करावी  मधून रु.१७,००० ची एसडब्लूपी करावी. या योजनांतील गुंतवणुकीतून दीर्घकाळामध्ये आपले मूळ मुद्दल वाढू शकते, मात्र अल्पकाळामध्ये आपल्या मुद्दलीमध्ये चढउतार दिसू शकतात.

गुंतवणुकीसंदर्भात अनेक छोटे मोठे प्रश्न पडत असतात. सर्वच प्रश्नांची उत्तरे एकाच लेखात मांडणं केवळ अशक्य. त्यामुळे या लेखात गुंतवणुकीसंदर्भातील सर्वसामान्य प्रश्नोत्तरे (Investment FAQ) मांडून त्यासंदर्भात सविस्तर माहिती पोचविण्याचा प्रयत्न केला आहे. 

(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखिमेचा अधीन असते, कृपया योजनेसंबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.)

निलेश तावडे

( २० वर्षाचा म्युच्युअल फंड क्षेत्राचा अनुभव)

(वाचकांच्या प्रतिक्रिया आणि आमचा गुंतवणूक सल्ला, आपणही आपल्या शंका पाठवा आम्ही आपल्या शंकांचे निरसन करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. WHATS APP @ 9324543832 or write to us at [email protected])

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Investment FAQ Marathi, Investment FAQ in Marathi 

Share this article on :
1 comment
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…