Crude Oil Trading
https://bit.ly/396bPQA
Reading Time: 3 minutes

Crude Oil Trading: 

कच्च्या तेलाच्या व्यापारातून (Crude Oil Trading) चांगले उत्पन्न मिळवायचे असल्यास काही प्राथमिक गोष्टींची माहिती घेणे आवश्यक असते. बाजारात कच्च्या तेलाचे वर्णन ‘काळ्या सोन्याचे जग’ असे केले जाते.या उद्योगातून मिळणार नफा पाहता ते बरोबरच आहे. मौल्यवान धातू, कमोडिटीज, बेस मेटल्स इत्यादीं कमोडिटीजमध्ये कच्चे तेल हे सर्वात अस्थिर आणि दैनंदिन व्यापारानुरूप संवेदनशील असते. तेलाच्या वितरणावर, तसेच तेल उत्पादक देशांमधील वातावरण आणि तेलाच्या आयातीवर अवलंबून असलेल्या देशांतील इकोसिस्टिमवर जागतिक अर्थव्यवस्था अवलंबून असते. त्यामुळे कमोडिटी एक्सचेंजमध्ये कच्च्या तेलाचा व्यापार नफा मिळवून देणारा ठरतो. 

हे नक्की वाचा: शेअर बाजारातील अस्थिरता कशी हाताळावी? 

Crude Oil Trading: कच्च्या तेलातील व्यापारातून नफा मिळवण्याचे काही मार्ग 

१. व्यापारात बारकाईने लक्ष हवे: 

  • गुंतवणूकदार कच्च्या तेलात जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्यास, त्यांना पुरवठा आणि मागणीतील चढ-उतार याची जाणीव पाहिजे. 
  • क्रूड सुविधांचे उत्पादन आणि कमोडिटीची मागणी ही जागतिक अर्थकारणावर तसेच मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करण्याची देशांची क्षमता यावर अवलंबून असते. 
  • उदा. पुरवठा जास्त झाल्यास मागणी कमी होते. परिणामी उत्पादन प्रक्रिया बंद करावी लागते. तसेच कमी किंमतीत तेलाचे बॅरल विक्री करावे लागतात. 
  • दुसरीकडे, स्थिर उत्पादनाचा ट्रेंड असल्यास बिडिंगला चांगली किंमत मिळते. गुंतवणुकदारांनी या घडामोडींचा वेळोवेळी आढावा घेणे आणि या खेळावर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

२. योग्यवेळी व्यापार धोरण अवलंबणे: 

  • इक्विटी मार्केट किंवा म्युच्युअल फंडाप्रमाणेच कच्च्या तेलातही हजारो जाणकार आहेत. 
  • हे लोक, दैनंदिन जगात घडणाऱ्या भौगोलिक स्थिती जाणून घेत त्याचा कच्च्या तेलाच्या किंमतीवर तसेच त्याच्या व्यापारावर कसा परिणाम होतो यात तज्ज्ञ असतात.
  • रिटेल गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातील गुंतवणुकीप्रमाणेच गुंतवणुकीचे योग्य धोरण आखले पाहिजे.
  • पोर्टफोलिओ मॅनेजर आणि मार्केट डव्हायजर्सची मदत घेणे, हा चांगला पर्याय आहे. कारण ते ऊर्जेची इकोसिस्टिम समजून घेण्यास आपल्याला मदत करतील. 
  • तसेच, जागतिक, सामाजिक-आर्थइक आणि राजकीय ट्रेंडचे परिणाम समजून घेण्याचा प्रयत्नही गुंतवणुकदारांनी करणे आवश्यक आहे. 
  • उदा. मध्य-पूर्वेकडे एखादी युद्धासारखी परिस्थिती उद्भवली असेल किंवा तेल उत्पादक देश उद्योगाच्या दबावाखाली असतील, तर अनुक्रमे किंमत आणि बॅरलचा अतिरिक्त पुरवठा यात मोठी वाढ होऊ शकते.

संबंधित लेख: भारतातील मान्यताप्राप्त शेअर बाजार आणि वस्तुबाजार 

३. विविध प्रकारच्या क्रूडमधील फरक: 

  • ब्रेंट आणि वेस्ट टेक्सास इन्स्ट्रुमेंट (WTI) क्रूडच्या व्यापारातील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. 
  • यापैकी एक ऑफशोअर उत्पादन होणारे तेल असून दुसरे, अमेरिकेत फ्रँकिंगद्वारे उत्पादित केले जाते. 
  • भारत हा ब्रेंट क्रूडा आयात करणारा देश आहे. वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI)  क्रूडचा वापर करणारे इतर देश आहेत. 
  • किंमतीच्या बाबतीत, ब्रेंट आणि वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट प्रमाणकं मागील दशकापासून बदलत आहेत. 
  • ऑफशोअर ब्रेंटपेक्षा WTI उत्पादन जास्त आहे. एक गुंतवणूकदार म्हणून, दोन्ही ठिकाणी गुंतवणूक करायची असेल तर, त्यांची वैयक्तिक कामगिरी जाणून घेणे आवश्यक आहे.

४. चीन आणि भारताची आर्थिक स्थिती योग्यरित्या जाणून घेणे: 

  • जगात भारत आणि चीन हे क्रूडचे सर्वात मोठे आयतदार आणि ग्राहक आहेत. या दोन्ही देशांच्या अंतर्गत आर्थिक स्थितीचा परिणाम जगभरात दिसून येतो. 
  • देशांतर्गत आर्थिक मंदीमुळे क्रूडच्या किंमतीवर परिणाम होतो. मागणीत घट तसेच अतिरिक्त पुरवठा दिसून येतो. 
  • आर्थिक भरभराट झाल्यास वाहन विक्री जास्त होते, क्रूडचा औद्योगिक वापर जास्त होतो, तसेच लॉजिस्टिक आणि पुरवठा उद्योगावरही परिणाम होतो. 
  • याच कारणात्सव ऊर्जा बाजारावर याचा कशाप्रकारे परिणाम होतो, हे समजून घेण्यासाठी गुंतवणूकदारांनी क्रूड आयात करणा-या देशांच्या अंतर्गत घडामोडींचा आढावा घेणे आवश्यक आहे.

५. संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या ट्रेंडवर अवलंबून राहणे: 

  • भारत असो किंवा इतरत्र, संस्थात्मक गुंतवणूकदार, राष्ट्रीयकृत तेल महामंडळ, विमान कंपन्या इत्यादी क्रूडसाठी हजारो बॅरलचा व्यापार करतात. 
  • किंमतीतील अस्थिरता किंवा भविष्यातील वृद्धीविरुद्ध खबरदारीचा उपाय म्हणून याचा वापर केला जातो. 
  • मोठ्या तिकिट-गुंतवणूकदारांना त्याचा फायदा असा होतो. त्यांना मोठ्या प्रमाणावर क्रूड किंवा त्यातील सुविधांमध्ये साठवणुकीची गरज नाही. 
  • किंमत वाढते तेव्हा, तेल कंपन्या अतिरिक्त पैसे खर्च न करता, आपापल्या लोकसंख्येची ऊर्जेची गरज भागवू शकतात. 
  • हेजिंगचे धोरण पाहून, गुंतवणूकदारांना बाजारातील ट्रेंड समजून घेता येऊ शकतो.

महत्वाचे लेख: भारतात कमोडिटी ट्रेडिंग वाढीमागील ५ कारणे

यासोबतच, संस्था ऑफशोअर आणि ऑनशोअर अशा दोन्ही ठिकाणी संसाधने जमा करतात. जागतिक घडामोडींची अद्ययावत माहिती आणि  तज्ज्ञांच्या सुयोग्य सल्ला मिळाल्यास, गुंतवणूकदारांना ऊर्जा बाजारातूनही चांगला परतावा मिळू शकतो.

– श्री प्रथमेश माल्या

उपाध्यक्ष, गैर कृषी वायदा व चलन संशोधन

एंजल ब्रोकिंग लिमिटेड

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…