शेअर बाजारातील अस्थिरता 
https://bit.ly/36iB6W9
Reading Time: 3 minutes

शेअर बाजारातील अस्थिरता 

अस्थिरता हा शेअर बाजाराचा मूलभूत स्वभाव आहे. बाजाराचा हा एक अपिरहार्य पैलू आहे कारण शेअर बाजार नेहमीच दोलायमान असतो ज्याचा अचूक अंदाज लावला जाऊ शकत नाही. दीर्घकालीन गुंतवणूक धोरणाचे सार म्हणजे अस्थैर्याच्या पैलूचे योग्य रितीने मूल्यांकन करणे. दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध मार्ग आणि संयोजन लक्षात घेऊन विशिष्ट धोरण आखणे आवश्यक आहे. यामुळे गुंतवणुकदाराला बाजारातील अनिश्चितेत मार्ग सापडेल. 

हे नक्की वाचा: Share Market: सुरक्षित ट्रेडिंग कसे करावे?   

शेअर बाजारातील ही अस्थिरता कशी हाताळावी?

१. अस्थिर बाजाराचे संकेत ओळखायला शिका: 

 • शेअर बाजारातील अस्थिरता हाताळण्याची मूलभूत पायरी म्हणजे, एखादी गोष्ट कशी ओळखावी, हे शिकले पाहिजे. त्यानंतरच आपण आपले ध्येय गाठण्यासाठी योग्य क्रिया करण्याचा निर्णय घेऊ शकतो. 
 • पहिले आणि महत्त्वाचे म्हणजे, किंमतीतील प्रचंड चढ-उतार आणि भारी व्यापार ही अस्थिर बाजाराची दोन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
 • कंपनीतील काही बातम्या किंवा आयपीओ या कारणांमुळे सदर स्थिती उद्भवते. 
 • अस्थिर बाजाराच्या संकेतांचे मूल्यांकन व्यापारी, अल्प विक्रेते आणि संस्थात्मक गुंतवणकदार यांच्या दिवसभरातील कृतीच्या आधारेही करता येते.

२. अस्थिर बाजारात गुंतवणूक करण्यापासून दूर रहा: 

 • अस्थिर बाजारस्थिती हाताळण्याचा व्यवहार्य दृष्टीकोन म्हणजे तो पूर्णपणे टाळणे. 
 • अशावेळी चढ-उतार स्पष्ट ओळखू येईपर्यंत थांबण्याचा सल्ला येथे देता येईल. 
 • किंमती कमी होणे हे बाजारात गुंतवणूक करण्याचे योग्य संकेत नसतात. 
 • काही काळानंतर कमी किंमतीतील शेअर्सचे मूल्य वाढेल, हे निश्चित नसते. याउलट किंमत आणखी कमी होऊन, तुम्ही अडचणीत सापडू शकता. 
 • अशावेळी गुंतवणुकदाराने स्टॉकच्या ट्रॅक रेकॉर्डचे आणि मूलभूत तत्त्वांचे काळजीपूर्वक विश्लेषण केले पाहिजे.
 • महसूल वृद्धी, कर्ज ते इक्विटी गुणोत्तर आणि भविष्यातील शक्यता यासारख्या घटकांचा काळजीपूर्वक विचार केल्यास स्टॉकचा अस्थिरतेचा इतिहास आहे की नाही, हे ठरवणे सोपे जाईल आणि त्याद्वारे आपल्याला त्यात गुंतवणूक करण्यापासून दूर राहता येईल.

इतर लेख: शेअर बाजारात पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाच्या टिप्स 

३. बाजारात घाईने उतरणे किंवा बाहेर पडणे टाळा: 

 • अस्थिर बाजारासमोर स्पष्ट भूमिका घेण्याची आणखी एक पायरी म्हणजे, आपली एंट्री आणि एक्झिट योग्य वेळी असावी. या खेळात असंख्य घटक असल्यामुळे अनुभवी गुंतवणूकदारांकडूनही योग्य बाजारवेळेला आव्हान मिळू शकते. 
 • भावनेच्या भरात गुंतवणुकदारांनी कोणतेही निर्णय घेऊ नयेत किंवा कृती करू नये. घाई-घाईत आपले स्टॉक्स विकू नका.
 • एखादा गुंतवणूकदार स्टॉक मार्केटमध्ये पैसे गमावत असताना दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. तथापि, हे लक्षात ठेवा की आपण आपल्याकडील स्टॉक विकल्याशिवाय एक पैसाही गमावणार नाहीत.
 • विक्रीची अंमलबजावणी होईपर्यंत स्टॉक्स केवळ कागदावरच असतात. त्यामुळे भीतीने स्टॉक विक्री करणे आणि अकाली एक्झिट घेणे टाळले पाहिजे.

४. पोर्टफोलिओतील वैविध्य हे उत्तर ठरू शकते: 

 • पोर्टफोलिओतील वैविध्य हा काही पूर्णपणे योग्य उपाय नाही, कारण यातून प्रत्येक वेळी नफ्याची हमी मिळतेेच असे नाही. तथापि, याद्वारे अस्थिरतेचे परिणाम कमी होत असल्याने हा एक प्लस पॉइंट असू शकतो.
 • यामुळे ओव्हरएक्सपोजरचा धोका टाळता येतो. या दिशेने चाललेले पाऊल म्हणजे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणे. 
 • यात समकक्ष स्टॉक्स, बाँड्स आणि कॅशमध्ये गुंतवणूक होते. त्यामुळे एखाद्या गुंतवणूक क्षेत्रातच जास्त प्रमाणात धोका पत्करण्यापेक्षा वरील गोष्टीचा सल्ला देता येईल.

५. तुमच्या वित्तीय व्यावसायिकाकडून माहिती घ्या: 

 • ‘अतिघाई संकटात नेई’ अशी जुनी प्रसिद्ध म्हण ट्रेडिंगसाठीही प्रभावी ठरते. 
 • तुम्हाला योग्य मोजून-मापून निर्णय घेत जोखीम घेणार असाल, तर हा घटक तुमच्या फायद्यासाठी मदत करेल. 
 • बाजार समजून घेण्यासाठी स्वत:चा वेळ घ्या आणि भावनांवर आधारीत घाईने कृती करू नका. एखाद्या व्यावसायिकाच्या माहितीचा फायदा न घेता आपण एखाद्या उद्योगातील घटनेवर आधारीत कृती करणेही योग्य ठरणार नाही.
 • सर्वोत्कृष्ट गुंतवणुकीची सुनिश्चिती करण्यासाठी वित्तीय तज्ज्ञ तुमचे गुंतवणूक ध्येय, जोखीम सहनशीलता आणि आर्थिक परिस्थितीचे मू्ल्यांकन करण्यात वित्तीय तज्ज्ञ मदत करू शकतात.
 • तुमचे वय आणि सेवानिवृत्ती नियोजनाच्या आधारे वेगवेगळ्या मालमत्तांचे वाटप करा. एक गुंतवणूकदार म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आपण जेवढे तरुण गुंतवणूकदार आहात, तितकी जोखीम घेण्याची क्षमता मोठी असते. म्हणजेच, तुमच्या वयानुसार तुमच्या जोखीम क्षमता बदलत जाते. 
 • तुम्ही तरुण असाल तर तुमच्याकडे जास्त वेळ आहे. तर दुसरीकडे तुम्ही साठीत असाल तर सेवानिवृत्ती लवकरच असल्याने भांडवल संरक्षणाला प्राधान्य द्यावे लागेल.

अंतिम सूचना: 

गुंतवणुकदाराला अस्थिर बाजाराच्या संभाव्य जोखीमीवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तुमच्याकडे प्रयत्न व अनुभवी धोरण असेल, तर गुंतवणुक करण्याचाच पर्याय निवडाल. तथापि, बाजाराची स्थिती लक्षात घ्या. अस्थिरता कायम राहिली तर तुमच्या व्यापारावर परिणाम होऊ शकतो. भविष्यात काय घडेल याची पूर्ण तयारी आणि धक्कादायक घटकांविरुद्ध उभे राहण्याची क्षमता असणे यावरच योग्य धोरण अवलंबून असते.

एंजल ब्रोकिंग लिमिटेड 

श्री. जयकिशन परमार

सिनियर इक्विटी रिसर्च ॲनॅलिस्ट 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…