आरबीआय RBI
Reading Time: 3 minutes

आरबीआय (RBI)

आपल्यापैकी प्रत्येकाला आरबीआय (RBI) म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडिया नक्कीच माहिती असेल कारण भारतातील सर्व वित्तीय क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि बँका, आरबीआयच्या निर्देशानुसार काम करतात. देशाच्या आर्थिक धोरणांच केंद्र म्हणून आरबीआय सुप्रसिद्ध आहे, पण तरीही, आरबीआय नक्की काय काम करते, हे अनेक जणांना माहीती नसेल. चला तर मग जाणून घेऊयात या लेखामध्ये…

इतर लेख: जीडीपी (GDP): सकल राष्ट्रीय उत्पन म्हणजे काय?

आरबीआयची (RBI) स्थापना आणि रचना –

  • 1 एप्रिल 1935 रोजी ब्रिटिश सरकराने रिझर्व बँक ऑफ इंडिया ॲक्ट अंतर्गत रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना केली.
  • सुरुवातीच्या काळात ही बँक राष्ट्रीय पातळीवरती काम करत नव्हती तर एक स्वतंत्र संस्था म्हणून कार्यरत होती. परंतु, भारत स्वतंत्र झाल्यानंतर अगदी काही वर्षांनी म्हणजेच 1949 ला आरबीआयला राष्ट्रीय बँक म्हणून घोषित करण्यात आलं.
  • आरबीआय देशाचं आर्थिक नियोजन ठरवत असते. त्यासोबतच देशाच्या आर्थिक विकासात देखील आरबीआयचे नेहमीच मोठं योगदान राहिले आहे.
  • आरबीआय  21 कमिटी मेंबर मिळून चालवतात. या कमिटीतील सर्व सदस्यांना सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असे म्हटले जाते. 
  • या 21 जणांच्या कमिटीमध्ये आरबीआयचे गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर, भारताच्या वित्त मंत्रालयाचे प्रतिनिधी, भारताच्या केंद्र सरकारने विविध उद्योगांचे नियुक्त केलेले प्रतिनिधी आणि त्यासोबतच काही स्थानिक बँकेचे डायरेक्टर देखील असतात. 
  • सध्या शक्तीकांत दास हे आरबीआयचे गव्हर्नर आहेत तर टी. रविशंकर, महेश कुमार जैन, मायकल पात्रा, राजेश्वर राव हे सर्व आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर आहेत.

आरबीआयची (RBI) कार्यपद्धती –

  • रिझर्व बँक ऑफ इंडिया भारताची आर्थिक दिशा निर्देशित करायचं काम करत असते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासात देखील आरबीआयचा मोठा वाटा आहे.
  • भारताच्या आर्थिक घटक म्हणजेच अर्थव्यवस्था, महागाई, चलनदर अशा गोष्टी नियंत्रणात ठेवण्यासाठी आरबीआयला अनेक निर्णय घ्यावे लागतात.

१. आर्थिक संस्थांवर अंकुश –

  • आरबीआय स्वतंत्र आर्थिक संस्था आणि बँकांवर मार्गदर्शक सुचनांच्या आधारे नियंत्रण ठेवतात.
  • या संस्थावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआयने, बोर्ड ऑफ फायनान्शियल सुपर्विजन म्हणजेच बीएफएस अशा नावाची एक कमिटी तयार केलेली आहे. 
  • ही कमिटी स्वतंत्र वित्तीय संस्थांच्या आर्थिक वाटचालीला निर्देशीत करते आणि या संस्था मार्गदर्शक सूचनांनुसार काम करत आहेत की नाही याकडे लक्ष देते. 
  • या कमिटीची स्थापना 1994 मध्ये करण्यात आली. 
  • या कमिटीच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या बँक, नाॅन बँकिंग वित्तीय कंपनी आणि त्यासोबतच सर्व प्रकारच्या वित्तीय संस्था काम करतात.
  • बीएफएस कमिटीमध्ये एकूण चार सदस्य काम करतात, या चारही सदस्यांचा कार्यकाळ प्रत्येकी दोन वर्षांचा असतो. 
  • आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर या कमिटीचे सदस्य म्हणून काम पाहतात.
  • प्रत्येक महिन्यातून एकदा बीएफएस कमिटीची बैठक होते. 
  • या बैठकीत महिनाभराच्या कामकाजाचा आढावा घेतला जातो आणि वित्तीय संस्थांना जर काही अडचणी असतील, तर त्या सोडवण्याच्या दृष्टीने देखील काम केले जाते.

तुम्हाला हे माहिती आहे का – आयकर विभागाने सुरु केले नवीन पोर्टल 

२. वित्तीय संरचनेवरील नियंत्रण –

  • आरबीआय मुख्यतः वित्तीय संस्थांच्या कार्यपद्धतीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते. थोडक्यात बँकिंग क्षेत्रामध्ये सर्व व्यवहार सुरळीत पणे पार पडावेत याकडे लक्ष देण्याचं काम आरबीआय करते. 
  • आर्थिक गोष्टींमध्ये कुठलाही अडथळा न येऊ देता अविरतपणे काम सुरू राहावे हा या मागचा मुख्य उद्देश आहे.
  • या सर्व कार्य प्रणाली मध्ये कुठलीही अडचण किंवा अडथळा निर्माण झाला, तर त्यासाठी देखील आरबीआय तर्फे banking ombudsman सारखी तक्रार दाखल करण्याची यंत्रणा नेमण्यात आली आहे त्यासोबतच अनेक मार्गदर्शक सूचना देखील आरबीआय वेळोवेळी या वित्तीय संस्थांना करत असते.
  • कुठल्याही अपात्कालीन परिस्थितीत बँक आरबीआयकडे मदतीसाठी जाऊ शकते.

३. चलन नियंत्रण –

  • आरबीआयला नवीन चलन छापायचे अधिकार आहेत. आपल्या भारतीय चलनावर आरबीआयच्या गव्हर्नरची स्वाक्षरी असते.  
  • आरबीआय गरजेनुसार चलन तयार करते त्यासोबतच आवश्यकतेनुसार चलन नष्ट देखील करते. यामागील मुख्य उद्देश एवढाच आहे की बाजारातील चलनाचे महत्त्व कायम  तर राहायला हवेच, पण त्यासोबतच पत प्रणालीला देखील कुठलाही अपाय होऊ नये. 
  • देशामध्ये महागाई निर्माण न होता आर्थिक विकास करण्याचं आव्हान देखील आरबीआयसमोर असते. याचबरोबर आरबीआय देशातील अनेक प्रकारचे रिझर्व देखील नियंत्रणात ठेवते उदाहरणार्थ फॉरेन करन्सी रिझर्व.

रिझर्व्ह बँकेला बँकांची बँक असं म्हटलं जातं. या बँकेच्या  स्थापनेची आणि कामकाजाची  मूलभूत माहिती असणे आवश्यक  आहे. या लेखातून तुम्हाला रिझर्व्ह बँकेची स्थापना, तिचे कामकाज आणि तिचे महत्वही लक्षात आले असेल. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: RBI Marathi Mahiti, RBI in Marathi, RBI Marathi आरबीआय (RBI) मराठी  माहिती 

Share this article on :
1 comment
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.