Positive Thoughts
आपल्या सर्वांच्या आयुष्यात वाईट आणि चांगल्या परिस्थिती घडतात. माणसाने नेहमी सकारात्मक विचारसरणी (Positive Thoughts) आचरणात आणायला हवी, पण दुर्दैवाने वाईट गोष्टींचा सतत विचार करत राहणे हा मानवी स्वभाव आहे. सर्वात आधी आपला हा स्वभाव बदलायला पाहिजे, तरच आपल्याला आयुष्यात एका ठिकाणी न थांबता पुढे जाणे शक्य होईल. जेव्हा सर्वच काही बिघडले आहे तेव्हा काय करावे याचा विचार करूया.
विशेष लेख: Introvert / Extrovert: तुम्ही इन्ट्रोव्हर्ट आहात की एक्स्ट्रॉव्हर्ट?
जागतिकीकरणाच्या या आधुनिक युगात आपण सगळेच महत्त्वाकांशा उराशी बाळगून नुसते पळत सुटलो आहे. त्यात, अनेकदा, अपयश आल्याने आपण निराशेच्या जाळ्यात अडकून पडतो. कधी कधी परिस्थितीच अशी असते की सतत गोष्टी बिघडतच जातात. नकारात्मक विचार करून मानसिक आरोग्याची हानी करण्यात अर्थ नाही कारण कळत नकळत याचा परिणाम तुमच्या आर्थिक नियोजनावर होत असतो. अशा कठीण परिस्थितीमध्ये आपलं मानसिक आरोग्य जपून आपल्या आर्थिक ध्येयांचा व इतर स्वप्नांचा विचार करा.
Positive Thoughts: सकारात्मक राहण्याचे ९ मार्ग
१. झाले गेले गंगेला मिळाले
जे झाले तो भूतकाळ आहे, त्यामुळे त्याचा विचार करत बसणे निरर्थक आहे. भूतकाळ बदलता येत नाही म्हणून कुढत बसण्यापेक्षा भविष्यात काय करता येईल याचा विचार करा.
२. चुकांमधून शिका
‘चुकणे हीच शिकण्याची पहिली पायरी असते’ असे आपण लहापणीपासूनच वाचत आलो आहे. आता त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ आहे. ज्या चुकांमुळे आपल्याला अपयश आले त्यावर विचार करून भविष्यात त्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये याची खबरदारी आपण घेतली पाहिजे.
३. तडजोड करण्यासाठी तयार राहा
आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही. कधीतरी आपल्याला जे आहे त्यात समाधान मानून तडजोडी कराव्या लागतात. तेव्हा मलाच का दरवेळेस तडजोड करावी लागते हा विचार न करता जे समोर आहे ते स्वीकारण्याची तयारी ठेवा.
४. संयम आणि आत्मविश्वास बाळगा
परिस्थिती कधीच सारखी नसते. वेळेप्रमाणे ती सतत बदलत असते. वाईट काळ सरायला थोडा वेळ नक्कीच लागतो, पण संयम आणि आत्मविश्वास बाळगला की कठीण परिस्थितीला सहजतेने सामोरे जाण्याचे बळ मिळते.
हे नक्की वाचा: आयुष्यात छंद हवेतच कशाला?
५. छंद जोपासा
माझ्यासोबत असे का होते ? मी जे काही प्रयत्न केले त्यात मला नेहमीच कसे अपयश मिळते? असा नकारात्मक विचार न करता आपल्या बुद्धीला चालना देणाऱ्या किंवा तुम्हाला मनापासून आवडणाऱ्या कृतीमध्ये स्वतःला व्यग्र करून घ्या. आपल्या आवडत्या छंदांमध्ये मन गुंतवून स्वतःला गुंतवून वेळ घालवा. एक ना एक दिवस मिळेल.
६. सतत सक्रिय राहा
यश अपयश हा जीवनाचा एक भाग आहे, ते म्हणजे आपलं आयुष्य नाही. सर्वांनाच याचा समान करावा लागतो. एक काही जमले नाही किंवा एकदा अपयश आले म्हणून प्रयत्न करणे सोडून चालत नाही. आपले मानसिक आरोग्य जपण्यासाठी सातत्याने प्रयत्न करून कुठल्याही चांगल्या कामात सक्रिय राहणे खूप महत्वाचे आहे.
७. नकारात्मक व्यक्तींपासून दूर रहा
बरेचदा कुणाला आनंदी ठेवण्यासाठी आपण सतत कमीपणा ओढवून घेत असतो. अशी लोक आपल्याला नेहमी गृहीत धरतात. त्यापेक्षा एकदाच काय ते मानाशी ठरवून आणि अशा लोकांपासून ठराविक अंतर ठेऊन राहणेच योग्य असते. चांगल्या विचारांची जोड असलेल्या लोकांचा सहवास शोधत राहा. याने मनात आणि आयुष्यात आलेले नाकारात्मकतेचे सावट नाहीसे होण्यास नक्कीच मदत होईल.
इतर लेख: बी.एस.सी. नंतरचे करिअर पर्याय
८. येणाऱ्या प्रत्येक दिवसाचे नियोजन करा
उद्या आपल्याला दिवस कसा घालवायचा आहे याचे आधीच नियोजन करा. म्हणजे भविष्याचे नियोजन करण्याची आणि त्याप्रमाणे निर्णय घेण्याची सवय लागून आत्मविश्वास वाढेल.
९. अपेक्षा कमी करा
अनाठायी अपेक्षा कमी केल्या की समस्या निर्माण होण्यास कुठेतरी थांबा बसतो आणि मनावर येणारे नकारात्मकतेचे मळभ दूर होऊन सकारात्मक राहण्याची ऊर्जा निर्माण होऊन आयुष्य आनंदमय होते.
टीम अर्थसाक्षरतर्फे सर्व वाचकांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies