Reading Time: 3 minutes

रोजच्या कामाच्या धावपळीतून जेव्हा सुट्टी मिळते, तेव्हा प्रत्येकाच्या डोक्यात फिरायला जाण्याचे विचार येऊ लागतात. वर्षाकाठी येणा-या नाताळाची सुट्टी असो किंवा नवीन वर्षाच्या स्वागताची धामधूम सुट्टीची मजा अनुभवण्यासाठी प्रत्येकजण उत्साही असतो. अशावेळी आपली प्रिय व्यक्ति, कुंटुब किंवा मित्र मंडळींसोबत कुठेतरी फिरायला जावं असं वाटणे साहजिक आहे. 

सहल म्हटलं की आठवते ती शाळेची बस, ते मित्र- मैत्रिणी आणि शाळेचे हवेहवेसे वाटणारे दिवस! या कल्पना त्याकाळीही खूप आनंददायी वाटायच्या. हल्ली मात्र सहलीच्या कल्पना बदलल्या आहेत. हल्ली ट्रीपसाठी बाहेर पडायचं म्हणजे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या सहलीची ठिकाणे, सोबतीला लागणारे साहित्य, खाण्याचे पदार्थ वगैरे वगैरे. योग्य नियोजन नसेल, तर अचानक येणा-़या अडचणींमुळे सहलीचा आनंद घेता येत नाही. सहलीच्या नियोजनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स –

वेळेच्या नियोजनासाठी पार्किन्सनचा सिद्धांत

१. सहलीचे ठिकाण निवडा 

  • साधारणपणे आपण सोशल मीडियावर एखाद्या ठिकाणचे फोटो पाहिले असतील, आपल्या जवळच्या मित्र किंवा मैत्रिणीच्या तोंडून एखाद्या ठिकाणाविषयी ऐकलं असेल किंवा एखाद्या सिनेमात एखादे ठिकाण पाहिले असेल, तर त्या ठिकाणी जाण्याची उत्सुकता असते. 
  • या सगळ्या माध्यमांमुळे तसेच इंटरनेटवर वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांची माहिती मिळते. त्यामुळे ठिकाण निश्चित करणे तसं फारसं कठीण नसतं. पण ठिकाण निश्चित करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्या, त्या खालीलप्रमाणे – 
    • जेव्हा एखाद्या समुद्रकिनारी, पर्वत किंवा जंगल सफारीसाठी जाण्याची इच्छा असते तेव्हा भौगोलिक वातावरणाचा आढावा घेऊन स्थान निश्चित करा. त्याठिकाणी जाण्यासाठी कुठला कालावधी योग्य आहे, याचा विचार करा. 
    • फिरण्याचे ठिकाण निवडताना किमतीचा किंवा पॅकेजचा विचार करा. कारण ठराविक हंगामात (नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात) राहण्यासाठी लक्झरी हॉटेल्सच्या किंमती जास्त असतात, अशावेळी आपल्या बजेटनुसार पॅकेज निवडणं महत्वाचं आहे. 
    • प्रवाशांची, विशेषतः महिला व लहान मुलांची सुरक्षा हा महत्त्वाचा विषय आहे. 

कसे कराल कामाच्या वेळेचे नियोजन? वाचा हे ६ नियम

२. ट्रीपचा कालावधी निश्चित करा-

  • सहलीच्या ठिकाणानुसार व तेथील आकर्षण म्हणजेच साईट सिईंगच्या यादीनुसार, ट्रीप किती दिवस चालेल हे ठरवता येते.  
  • काही प्रवाशांना रोज नवीन ठिकाण पहायला आवडते, तर काही प्रवाशांना एकाच ठिकाणी प्रत्येक गोष्ट पहायची असते. असे प्रवाशी वेगवेगळ्या गोष्टींचा आनंद घेत घेत मंद गतीने प्रवास करतात. एखाद्या ठिकाणी भेट देण्यासाठी किती वेळ लागू शकतो याचा अचूक अंदाज लावणे ही एक चांगल्या ट्रीपसाठी महत्त्वाची गोष्ट आहे. 
  • ख्रिसमस आणि न्यू ईयर सारख्या वेळेत जास्त लोक प्रवास करतात. यावेळी अर्थातच हॉटेल्स आणि इतर सेवांचे भाव वाढलेले असतात. विद्यार्थी, तरूण वर्ग किंवा मध्यमवर्गीय जे नेहमीच बजेटचा विचार करतात, त्यांच्यासाठी सहलीची योजना आखण्याचा हा योग्य काळ नाही. 

तुम्ही पैशाबाबत नेहमी काळजी करता का? मग हे वाचा…

३. हॉटेल्स, तिकीटे इत्यादीचे बुकिंग-

  • सहलीचे ठिकाण निश्चित झालं की तिथे जाण्यासाठी लागणाऱ्या तिकिटांचं बुकिंग करणे  ही सर्वात महत्त्वाची व प्राथमिक गोष्ट आहे. 
  • बुकिंग अगोदरच केलेले सोयीचे असते कारण ठराविक किंवा सुट्ट्यांच्या हंगामात तिकीटांच्या किमती वाढतात. 
  • आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत तिथे राहण्याची ठिकाणे व विमान तिकीटे यांच्या किमती सतत कमीजास्त होत असतात. विमानाच्या तिकिटांचे बुकिंग करण्यासाठी  ‘स्कायस्कॅनर‘ किंवा गुगल फ्लाईट्स यासारख्या वेबसाईट्सचा तर, हॉटेल बुकिंग करताना trivago.com सारख्या वेबसाईटचा वापर केल्यास बजेट बुकिंग करता येईल. 
  • रेल्वेने प्रवास करणार असाल तर किमान ३ ते ४ महिने आधी बुकिंग करावे लागेल.
  • उदाहरणार्थ नोव्हेंबर, डिसेंबर किंवा विशेषतः हिवाळ्यात ट्रीपचा प्लान असेल तर विमान तिकीटे आणि हॉटेल्स महाग होऊ शकतात. डिजिटल वॉलेट किंवा डेबिट /क्रेडिट कार्ड वापरून बुकिंग केल्यास काही कॅशबॅक अथवा डिस्काऊंट ऑफर्सचा लाभ घेता येतो. 

४. महागडी हॉटेल्स की ‘होम स्टे’?

  • हल्लीचा तरूण वर्ग फिरण्यासोबतच तेथील नवीन गोष्टी अनुभवण्यासाठी उत्सुक असतो. अशावेळी ‘होम स्टे’चा पर्याय निवडला, तर त्या ठिकाणी असलेल्या स्थानिक सोयी, नैसर्गिक ठिकाणे, निरनिराळ्या पाककृती, नवीन माणसे त्यांची जीवनशैली, तेथील वेषभूषा या सर्व गोष्टी अनुभवायला मिळतात. 
  • याशिवाय मोठ्या हॉटेल्सच्या तुलनेत ‘होम स्टे’ किमती  बजेटमध्ये असतात. 

तुम्ही महागड्या जीवनशैलीच्या जाळ्यात अडकलात तर नाही ना?

५. मित्रमंडळींसोबत किंवा सामुहिक प्रवास –

  • ब-़याचवेळेला पुरेसा पैसा नसल्याने सहलीचे बेत रद्द करावे लागतात. पण सोबत मित्र असतील, तर प्रवास, खाण्याच्या गोष्टी, राहण्याची ठिकाणे, हॉटेल्स या सगळ्या खर्चांचे विभाजन करता येते. त्यामुळे प्रवास बजेटमध्ये होतो व एकत्रितपणे आनंदही घेता येतो. 
  • काही जणांच अमुक ठिकाणी फिरायला जायचं असं स्वप्न असतं, तर काहीजण सुट्टीत थोडा बदल अनुभवण्यासाठी बाहेर पडतो. प्रत्येकाच्या आनंदाच्या कल्पना वेगळ्या असतात. 

६. आवश्यक सामानाची यादी व बॅग पॅकिंग-

  • आपण निवडलेले सहलीचे ठिकाण, त्यावेळचं नैसर्गिक हवामान, काही राजकीय परिस्थिती व त्याचे परिणाम किंवा काही सण असेल, तर याचा परिणाम तुमच्या ट्रीपवर होऊ शकतो. 
  • या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन बॅग भरा. ट्रीपचं नियोजन ऐनवेळी बिघडू नये यासाठी पूर्वतयारी असायला हवी. 
  • तेथील स्थानिक वाहतुकीच्या सोयी, स्वच्छ आणि बजेटमधील खाद्यपदार्थ, बजेट हॉटेल्स या सर्व गोष्टींचा माहिती घ्या, त्यासाठी शक्य असल्यास माहितीतल्या स्थानिक लोकांना संपर्क करण्याचा प्रयत्न करा किंवा इंटरनेटवरील विविध ब्लॉग्ज किंवा यु ट्यूब व्हिडीओज मधूनही तुम्हाला माहिती मिळू शकते. 

७. सांस्कृतिक संवेदनशीलता- 

  • एक जबाबदार नागरिक व पर्यटक म्हणून प्रवाशाने आपण जात असलेल्या ठिकाणाबाबत संशोधन केले पाहिजे. 
  • त्याठिकाणी असलेल्या स्थानिक लोकांच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत, तसेच त्यांचा अनादर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. 

ट्रीपचं नियोजन व्यवस्थित असेल, तर निश्चित जास्त आनंद घेता येतो. वर दिलेल्या मुद्द्यानुुसार नियोजन करा व या सहलीच्या क्षणांचा आनंद घ्या.  कारण या आठवणी आपल्यासोबत कायम राहतात. 

बँक व्यवहार, परदेशी सहली आणि वीज बिल ठरवणार तुमचा ‘आयटीआर’

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutes बी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutes बी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…

वाचनाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutes वाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या लेखात करूया.

बी.एस.सी. नंतरचे ७ करिअर पर्याय 

Reading Time: 4 minutes बी.एस.सी. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात या लेखमालेच्या…