Coronavirus & Insurance
कोरोना आणि विमा क्षेत्र (Coronavirus & Insurance) हा विषय एकूणच आर्थिक विषयांमध्ये दुर्लक्षित झालेला विषय आहे. कोरोना व्हायरच्या कठीण परिस्थिती विमा क्षेत्राने सहन केलेल्या नुकसानाचा कोणीच विचार करत नाहीये. या लेखात आपण याच विषयावर प्रकाश टाकणार आहोत.
हे नक्की वाचा: DICGC: ठेव हमी विमा योजनेतील महत्वपूर्ण बदल
- कोव्हिड-१९ या व्हायरसशी सर्व जग लढा देत आहे. भारतातील परिस्थिती काही दिवसांपूर्वी काही प्रमाणात नियंत्रणात आलेली असली तरी जोपर्यंत शेवटचा रुग्ण बरा होत नाही तोपर्यंत त्याचा धोका टळलेला नाही.
- या व्हायरसमुळे संपूर्ण जगातील अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. सरकार यातून वर येण्याचा प्रयत्न करत आहे.
- भारतीय अर्थव्यवस्थेला देखील या सर्व काळात मोठ्या प्रमाणात फटका सहन करावा लागला आहे. संपूर्ण जगातील सर्वात जास्त नुकसान झालेल्या अर्थव्यवस्थांच्या यादीत भारत 19 व्या क्रमांकावर आहे. यावरून आपण नुकसान किती झाले आहे याचा अंदाज घेऊ शकतो.
- या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.
- यामुळे सामान्यांचे देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या आर्थिक नुकसानीचा फटका जवळपास प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बसला आहे, अगदी विमा क्षेत्र देखील याला अपवाद नाही.
- कोव्हिड-१९ च्या काळात आणि त्यानंतर देखील विमा क्षेत्राला कशाप्रकारे नुकसान सहन करावं लागलं याची माहिती घेऊया.
Coronavirus & Insurance: विमा अर्थव्यवस्था
- कोव्हिड-१९ च्या आधी सामान्यपणे एक वेगळ्या प्रकारची व्यवस्था अस्तित्वात होती पण मध्यंतरीच्या लॉकडाउनच्या काळात ही संपूर्ण व्यवस्थाच नष्ट झाली की काय असा प्रश्न पडतो.
- अगदी वस्तू तयार करण्यापासून ते वस्तू विकेपर्यंत सर्वच व्यवसायाची व्यवस्था बदलली आहे.
- कोव्हिड-१९ मुळे स्टॉक मार्केट अत्यंत अस्थिरपणे काम करत आहे आणि याचा सर्वात मोठा फटका विमा क्षेत्राला बसला आहे.
- नुकसान सर्वच क्षेत्रात झालेल आहे त्याचा अभ्यास देखील केला जात आहे परंतु याला अपवाद आहे विमा क्षेत्र! कारण यात झालेले नुकसान कोणीही पाहण्याचा प्रयत्न देखील करत नाही.
- सरकारने जाहीर केलेल्या मदतीचा फायदा या क्षेत्राला देखील होणं अपेक्षित होतं, मात्र ती मदत या क्षेत्राला उभारी देऊ शकली नाही.
- विमा क्षेत्रासाठी सर्वात महत्त्वाचा काळ म्हणजे एप्रिल आणि मार्च हा महिना असतो. परंतु या महामारीच्या काळात या दोन महिन्यात विमा क्षेत्रा मध्ये होणारी गुंतवणूक खूप मोठ्या प्रमाणात कमी झाली.
- याचा फारच मोठा फटका विमा क्षेत्राला बसला. तज्ज्ञांच्या मते या दोन महिन्यात गुंतवणूक न झाल्यामुळे विमा क्षेत्राला अंदाजे 30-35 टक्के तोटा सहन करावा लागला आहे.
Coronavirus & Insurance: संकट काळातील नुकसान आणि भावी वाटचाल
- लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात नुकसान सहन केल्यामुळे विमा क्षेत्रात देखील आता परत एकदा उभारी घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यांची पावलं आशादायक वाटत आहेत.
- लॉकडाऊनच्या काळात विमा क्षेत्रामधील काही क्षेत्रांना कशा प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आणि ते येत्या काळात कशाप्रकारे वाटचाल करतील या बद्दल जाणून घेऊयात
विशेष लेख: सरल जीवन विमा योजना – विमा नियामकांची ग्राहकांना भेट
Coronavirus & Insurance
१. सर्वसामान्य विमा
- आपण सर्वच जाणतो विमा क्षेत्र हे संपूर्णपणे सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक व्यवहारांवर अवलंबून असतं.
- लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले आणि याचाच खूप मोठा फटका विमा क्षेत्राला बसला.
- तज्ज्ञांच्या मते नुकसान भरून काढण्यासाठी विमा क्षेत्राला 2022 पर्यंत वाट पहावी लागेल.
२. आरोग्य विमा
- भारतात विमा क्षेत्रातील इतर शाखांपेक्षा आरोग्य विमा क्षेत्रात खूपच अल्प प्रमाणात गुंतवणूक केली जाते.
- आपल्याकडे याबाबतीत फारच दुर्लक्ष केलं जातं. एका सर्वेक्षणानुसार भारतातील शहरी भागातील केवळ 18% कुटुंब आरोग्य विमा घेतात आणि हाच आकडा ग्रामीण भागात 14% एवढा कमी आहे. यावरून आपण आरोग्य विमा कडे किती दुर्लक्ष करतो याचा अंदाज येईल.
- मागच्या काही वर्षांपासून केंद्र सरकारने आयुष्मान भारत, अटल बिमा योजना अशा काही योजनांची अंमलबजावणी करत आरोग्य विमा क्षेत्राला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला आहे तरीदेखील त्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी आपल्याला अजूनही थोडा वेळ लागेल.
३. जीवन विमा
- जीवन विमा अशी शाखा आहे ज्या ठिकाणी अगदी सामान्य व्यक्ती देखील गुंतवणूक करतो.
- लॉकडाऊनमध्ये अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली सर्वसामान्यांनाच आर्थिक फटका बसल्यामुळे जीवन विमा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होणारी गुंतवणूक झालीच नाही.
- त्यातही गुंतवणुकीवर मिळणारी टक्केवारी देखील मोठ्या प्रमाणात घसरलेली आहे, या घसरलेल्या टक्केवारीमुळे होणारी गुंतवणूक देखील ठप्प पडलेली आहे.या क्षेत्रात नेहमीप्रमाणे भरपूर गुंतवणूक होण्यासाठी 2 ते 3 वर्षांचा कालवधी लागेल.
महत्वाचा लेख: तुम्हाला विमा भेट कार्डबद्दल माहिती आहे का?
४. वाहन विमा
- वाहन क्षेत्रात कोव्हिड-१९ च्या आधीपासूनच मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.
- लॉकडाऊन आधीच या अडचणीमुळे वाहन विमा क्षेत्राला अंदाजे 35 टक्क्यांचं नुकसान सहन करावं लागत होतं. त्यात नंतर कोव्हिड-१९ मुळे वाहन विमा क्षेत्राला मोठा फटका सहन करावा लागला.
- अशा प्रकारच्या आर्थिक संकटातून वाहन विमा क्षेत्राला वाचवण्यासाठी तज्ज्ञांनी अनेक प्रकारच्या नवीन क्लृप्त्या लढवल्या.
- ग्राहकांनी गुंतवणूक करत राहावी म्हणून अनेक नवीन ऑफर देण्यात आल्या. उदाहरणार्थ जेवढी गाडी चालवाल तितक्याच विम्याचे पैसे भरा. अर्थात यात तुमची बचत होईल आणि तुम्ही मोजक्याच काही किलोमीटरसाठी तुमच्या गाडीचा विमा काढावा लागेल यामुळे संपूर्ण वर्षभरासाठी लागणारी मोठी रक्कम तुम्हाला खर्च करावी लागणार नाही.
- अशा काही कल्पक क्लुप्त्यांमुळेु आज वाहन विमा क्षेत्र तग धरून आहे.
विमा क्षेत्राला इतर क्षेत्रांना मदत करणारा व्यवसाय म्हणून पाहिलं जातं, त्यामुळे त्यांना अत्यंत काळजीपूर्वक त्यांचं अस्तित्व जपत काही पावले उचलून येत्या काळात झालेले नुकसान भरून काढावे लागणार आहे. जेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेची गाडी परत रुळावर येईल तेव्हा विमा क्षेत्र परत एकदा जोमाने व्यवसायात उसळी घेऊ शकेल.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: Coronavirus & Insurance industry in Marathi, Coronavirus & Insurance industry Marathi, Coronavirus & Insurance industry Marathi Mahiti