Coronavirus & Insurance: विमा क्षेत्राचे नुकसान कसे भरून येणार?

Reading Time: 3 minutes कोरोना आणि विमा क्षेत्र (Coronavirus & Insurance) हा विषय एकूणच आर्थिक विषयांमध्ये दुर्लक्षित झालेला विषय आहे. कोरोना व्हायरच्या कठीण परिस्थिती विमा क्षेत्राने सहन केलेल्या नुकसानाचा कोणीच विचार करत नाहीये. या लेखात आपण याच विषयावर प्रकाश टाकणार आहोत.  

बाजारातील अस्थिरता व जेष्ठ नागरिक

Reading Time: 4 minutes गेले काही दिवस भांडवल बाजारात अस्थिरता आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा निर्देशांक आपल्या ४२,२७४ वरून २५,६३९ तर, राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी हा निर्देशांक १२,४३० वरून ७,५११ पर्यंत तळ गाठून आला. जवळपास ४०% घट ही एकदम अत्यल्प कालावधीत झाली. यापूर्वीही अनेकदा ही वेळ आली आहे त्यातून बाजार सावरला आणि त्यांने पुन्हा उभारी घेतली. यातील सन २००८ मधील मंदीमध्ये निर्देशांकात ६०% घट झाली होती. देशी आणि परदेशी वित्तसंस्थाचा कल बाजारास हेलकावे देत असतो. त्यांना आपल्या गुंतवणुकीवर फक्त नफाच मिळवायचा असल्याने उपलब्ध सर्व मार्गांचा  वापर त्यांच्याकडून केला जातो. 

कोरोना व्हायरसचा कमोडिटीजच्या किंमतीवरही मोठा परिणाम

Reading Time: 2 minutes कोरोना व्हायरसमुळे धातूंच्या किंमती कमी झाल्या असून सध्याच्या धातूंच्या या संकटाला सामोरे जाण्यासाठी गुंतवणूकदार लिक्विडिटीला पसंती देत आहेत.  सरकारने शहरांना लॉकडाउन केल्याने जागतिक अर्थव्यवस्थेत तयार उत्पादनांत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतींवरही परिणाम झाला आहे. 

कोरोना आणि कायदा

Reading Time: 2 minutes कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे. भारत सुद्धा ह्याला अपवाद राहिलेला नाही. ह्या प्रचंड वेगाने फोफावणाऱ्या आजारावर नियंत्रण आणणे हे भारताच्या सरकारपुढे मोठे आव्हान झाले आहे आणि सरकार हे आव्हान मोठ्या शर्थीने पेलताना दिसत आहे. भारतात कुठलेही निर्णय घेण्यासाठी सरकारला कायद्याचे पाठबळ लागते. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने कुठले कायदे हाताशी घेतले आहेत हे आपण ह्या लेखातून जाणून घेऊया.

मन तळ्यात मळ्यात “निर्देशांकांच्या” सापळ्यात….

Reading Time: 3 minutes कोविड -१९ (कोरोना व्हायरस) च्या प्रसारामुळे आणि त्याच्या प्रभावांसह जगातील सर्वच बाजारपेठा कमी अधिक प्रमाणात प्रभावित झाल्याचे दिसत आहे. अद्याप संक्रमणाच्या वेगाने, संक्रमित देशांमध्ये आणि त्या संक्रमणांच्या तीव्रतेशी संबंधित बाजारपेठांवर परिणाम त्या त्या देशांच्या अर्थव्यवस्थेवर झाल्याचे आढळत आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून (फेडकडून) अर्ध्या टक्क्याच्या व्याजदर कपती बरोबरच इटालियन सरकारने जाहीर केलेल्या घोषित टाळेबंदीमुळे भांडवली बाजारांना आश्चर्यचकित केले.