Candlestick
Reading Time: 3 minutes

Candlestick

तांत्रिक विश्लेषणातील प्रमुख भागापैकी कॅन्डलस्टिक हे एक महत्वाचे अंग मानले जाते कारण कॅन्डलस्टिकचा वापर संपूर्ण जगभरात सर्व प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये केला जातो. त्यामुळे ही प्रणाली सर्वात लोकप्रिय आहे. आपण आजच्या भागात तांत्रिक विश्लेषणासाठी वापरात येणाऱ्या कॅन्डलस्टिक विषयी अधिक माहिती घेऊया.

कॅन्डलस्टिक (Candlestick) –

  • कॅन्डलस्टिक म्हणजे एखादया शेअरच्या किमंतीची हालचाल दाखवणारी क्रिया होय. 
  • कोणतीही कॅन्डल  आपणास दोन प्रकारे दिसून येते. पहिली बुलीश (bullish) हिरव्या  रंगाची तेजीदर्शक तर, दुसरी बेरिश (berish) कॅन्डल  ही लाल रंगाची असून मंदी दर्शिविते .
  • कोणतीही कॅन्डल  आपणास (high), उच्चतम (low), न्यूनतम (open), सुरुवात (close), बंद या चार किमंती दर्शिविते. 
  • सुरु झालेल्या किमंतीपासून बंद झालेल्या किमंतीच्या मधील भागाला बॉडी म्हटले जाते. बॉडीच्या वर असणाऱ्या रेषेला अप्पर शॅडो (upper shadow), तर खाली असणाऱ्या रेषेला लोअर शॅडो (Lower shadow) असे म्हणतात.
  • अशाप्रकारे या सर्व गोष्टींचा विचार केल्यास कोणत्याही शेअरमधील वर खाली होणाऱ्या किंमतीच्या हालचालीस त्या शेअरची कॅन्डल  म्हटले जाते.

हे नक्की वाचा: शेअर बाजारासंबंधी कंपन्यांमधील विक्रमी तेजीचा अर्थ  

कॅन्डलस्टिकचा इतिहास –

  • सतराव्या शतकातील जपानमधील अन्नधान्याचे मोठे व्यापारी मोनाहीसा होमो यांना कॅन्डलस्टिकचे जनक म्हटले जाते. 
  • मोनाहीसा होमो तांदूळचा व्यापार मोठ्या प्रमाणात करत असत. त्या व्यापारात त्यांनी खरेदी विक्री करून अनेक वर्ष अभ्यास केला. 
  • या अभ्यासावरून त्यांना समजले की तांदुळाच्या किमंती आपण ठरवितो त्याप्रमाणे ठरत नाहीत तर त्या विशिष्ट वेळेत एक विशिष्ट किमंतीचे पॅटर्न तयार होतात असे त्यांना दिसून आले. 
  • मग त्यांनी काही वर्ष रोजच्या व्यवहारातील तांदुळाच्या किमंती लिहून ठेवल्या त्यात त्यांना अनेक सारख्या असणाऱ्या किमंतीचे वर खाली सारखेच पॅटर्न त्यांना दिसून आले.
  • त्या पॅटर्नवरून त्यांनी एक चार्ट प्रणाली तयार केली. त्या प्रणालीचा आकार मेणबत्तीसारखा तयार झाल्याने मोनाहीसा होमो यांनी त्यास कॅन्डलस्टिकहे नाव दिले. 
  • या पॅटर्नवरून त्यांनी व्यापारात खूप पैसे व नाव मिळविले. सुरुवातीला त्यांनी ह्या दोन कॅन्डल बुद्धिबळात असणाऱ्या पांढऱ्या व काळ्या रंगावरून निश्चित केल्या. पांढरी कॅन्डल ही तेजीदर्शक तर काळी कॅन्डल ही मंदीदर्शक होती.
  • ही कॅण्डेलेस्टिक प्रणाली जपान ध्ये खूप प्रसिद्ध व लोकप्रिय झाली. 
  • पुढे अमेरिकेमधील एक अभ्यासक स्टीव निसन यांनी जापनीज कॅन्डलस्टिक पॅटर्नचा अनुवाद इंग्लिश भाषेत केला आणि पांढऱ्या कॅन्डलचे रूपांतर हिरव्या कॅन्डलमध्ये, तर काळ्या कॅन्डलचे लाल कॅन्डलमध्ये करून सर्व जगाला ह्या कॅन्डलस्टिकचे ज्ञान स्टीव्ह निसन यांनी दिले. आज जगभरात ही पद्धत सर्वात जास्त लोकप्रिय आहे. 

Candlestick: कॅन्डलस्टिक पॅटर्नचे प्रकार –

कॅन्डलस्टिक पॅटर्न आपणास दोन प्रकारे दिसून येतात.

१. सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न (Single candlestick pattern) – 

हा एक कॅन्डलच्या सहाय्याने पॅटर्न तयार होतो आणि बाजारातील शेअरच्या ट्रेंडची दिशा दाखवतो. जसे की हॅमर (hammer). 

२.  मल्टिपलं कॅन्डलस्टिक पॅटर्न (multiple candlestick pattern) –

हा पॅटर्न दोन किंवा त्यापेक्षा जास्त कॅन्डल मिळून तयार होतो व ट्रेंडची दिशा दाखवतो. उदा. थ्री व्हाईट सॉल्जर (three white soldier).

विशेष लेख: शेअर बाजार जोखीम:  काही गैरसमज

सिंगल कॅन्डलस्टिकपॅटर्न व मल्टिपल कॅन्डलस्टिकपॅटर्न हे आपणास चार मुख्य भागात विभागले जातात.

१. बुलीश कॅन्डलस्टिक पॅटर्न (Bluish candlestick pattern)

  • बुलीश कॅन्डलस्टिक पॅटर्न हे पॅटर्न तेजीचे संकेत देतात. मंदी संपून तेजी सुरु होणार असल्याचे सांगतात.
  • काही महत्वाचे पॅटर्न खालील प्रमाणे आहेत-
    • टवीझर्स बॉटम , किकिंग अप, मॉर्नींग डोजी स्टार, मॉर्निंग स्टार,बुलिश अबाँडेड बेबी, पिरसिन्ग लाईन, बुलिश तासुकी लाईन,
    • थ्री इनसाईड अप, थ्री आउट साईड अप, थ्री व्हाईट सॉल्जर,ड्रॅगन फ्लाय डोजी,
    • बुलिश ब्रेकवे, बुलिश डोजी स्टार, बुलिश एंगेल्फिन्ग, बेरीश हरामी, बुलिश हरामी,
    • हेमर, इन्व्हेटेड हेमर, हाय वेव, इत्यादी.

२. बेरीश कॅन्डलस्टिक पॅटर्न (Bearish candlestick pattern) 

  • हे पॅटर्न तेजी संपत असताना तयार होऊन मंदीचे संकेत देतात.
  • त्या पैकी महत्वाचे पॅटर्न – टवीझर्स टॉप,कॉलपसिंग डोजी स्टार, इव्हिनिंग स्टार, थ्री ब्लॅक क्रॉवास, ग्रेव स्टोन डोजी, टू क्रॉवस, थ्री इन साइड, डाउन, थ्री आउट साईड डाउन, लड्डेर टॉप, टूर्न अप, हँगिंग मेन, शूटिंग स्टार, बेरीश स्पिनिंग टॉप, इ. 

३.बुलीश कन्टुनिशन कॅन्डलस्टिक पॅटर्न (Bullish continuation candlestick pattern): 

  • तेजीचा ट्रेंड असाच सुरु राहील असे हे पॅटर्न प्रदर्शित करतात.
  • यातील काही महत्वाचे पॅटर्न – रायसिंग विंडो, बुलिश मेट, रायजिंग थ्री मेथड, बुलिश साईड बाय साईड, उपसाईड गॅप थ्री मेथड, अपसाईड तासुकी गॅप, बुलिश सेपरेटिंग लाईन, बुलिश थ्री लाईन स्ट्राईक, इ. 

४.बेरीश कन्टुनिशन कॅन्डलस्टिक पॅटर्न (Bearish continuation candlestick  pattern)        

  • हे पॅटर्न मंदीचा ट्रेड असाच चालू राहील याचे प्रदर्शन करतात.
  • यातील महत्वाचे पॅटर्न – फॉलिंग विंडो,फॉलिंग थ्री मेथड,डाऊन साईड गॅप थ्री, मेथड,डाऊन साईड, तासुकी गॅप,ओन नेक,इन नेक,बेरीश थ्री लाईन स्ट्राईक,

वरील सर्व कॅन्डलस्टिक पॅटर्नचा शेअर बाजारात अभ्यास केला तर आपणास असे दिसून येते की काही चार्ट पॅटर्न आपणास बऱ्याच वेळा दिसतात, तर काही पॅटर्न कधी कधी दिसतात. त्यामुळे या पॅटर्नसोबत तांत्रिक इंडिकेटर जोडून काम केले तर निश्चितपणे यश मिळेल.

यापुढील भागात आपण शेअर बाजारात ट्रेडिंग व इन्व्हेस्टमेंट करताना वापरात येणारे काही महत्वाचे कॅन्डलस्टिक पॅटर्न व त्यांची वैशिष्ट्ये याबद्दल माहिती घेऊया.

शरद गोडांबे.

९६५७९८०३०९

[email protected]

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: Candlestick in Marathi, Candlestick information in Marathi, Candlestick Marathi Mahiti, What is Candlestick? Marathi, Candlestick mhanje kay 

Share this article on :
1 comment
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…