Freak Trade
Reading Time: 3 minutes

Freak Trade

फ्रिक ट्रेड (Freak Trade) शब्द वेगळाच वाटत असेल ना? अर्थव्यवस्थेत काही नवनवीन शब्दाचा उदय होत असतो मग ते शब्द चागलेच रुळतात. त्याचा कसा आणि कधी शिरकाव झाला ते कळत नाही. अलीकडेच एका वाहिनीवरील चर्चेत ‘फ्रिक ट्रेड’ हा शब्द ऐकायला मिळाला. त्याबरोबर हे नवीन काय आहे? आपल्याला कसं माहिती नाही, असा विचार प्रथम मनात आला. ‘ट्रेड’ म्हणजे काय? हे सर्वानाच माहिती आहे. तेव्हा ‘फ्रिक’ या शब्दाचा  शोध घेण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा उच्चार फ्री सारखाच पण त्यात हालंत क् सारखा असून नाम म्हणून अति रस घेणारा माणूस किंवा विचित्र प्रसंग आणि क्रियापद म्हणून तीव्र प्रतिक्रिया देणे किंवा एखाद्याची बोलती बंद करणे अशा अर्थी वापरला जातो. हो हो घाबरू नका मी काही तुम्हाला व्याकरण सांगण्याच्या, समजवण्याच्या, शिकववण्याचा भानगडीत पडत नाही. तुम्ही एक गुंतवणूकदार असाल तर  या विचित्र शब्द असलेल्या व्यापाराने तुमच्या गुंतवणूक धोरणावर काहीही परिणाम होणार नाही. मात्र तुम्ही सट्टेबाज असाल डिरिव्हेटिव सारखे जोखमीचे व्यवहार करीत असाल तर हा शब्द त्याचे नाम आणि क्रियापद या दृष्टीने असलेल्या दोन्ही अर्थांचा प्रत्यय देईल तर इतरांना माहिती म्हणून हे काय प्रकरण आहे ते समजेल.

हे नक्की वाचा: Safe Trading: स्टॉक मार्केटमधल्या घोटाळ्यांपासून सावधान!

फ्रिक ट्रेड (Freak Trade)

  • गेले दीड दोन महिने फ्रिक ट्रेड (विचित्र व्यापार) हा शब्द चर्चेत आहे. अनेक ट्रेडर्सनी त्याच्या व्यवहारात झालेल्या नुकसानीचे स्क्रीन शॉट समाजमाध्यमांवर जाहीर केले आहेत. 
  • यातील बहुतांश व्यवहार हे निफ्टी 50, बँक निफ्टी या इंडेक्समधील डिरिव्हेटिव व्यवहारासंबंधातील आहेत. 
  • विविध वाहिन्यांवरील  चर्चेत त्याचा वारंवार वापर केला जात आहे. हा बेकायदेशीर व्यवहार नाही तर नवीन व्यवस्थेचाच भाग आहे. 16 ऑगस्ट 2021 पासून राष्ट्रीय शेअरबाजाराने स्टॉपलॉस ऑर्डर टाकताना असलेली विशिष्ठ व्यवहार मर्यादा (TER) काढून टाकली. 
  • असे करणे जगभरातील बाजार व्यवहार घोरणांशी सुसंगत असून नियमानुसार त्याची पूर्वसूचना देण्यात आली होती. (या घडामोडींनंतर स्टॉप लॉस ऑर्डर पुन्हा विशिष्ट मर्यादेत टाकता येईल का? यावर पुन्हा विचार चालू असल्याचे समजते. नियमात बदल सर्व गोष्टींचा विचार करून केला असेल, तर आता पुनर्विचार कशासाठी हे मला न समजलेले कोडे आहे).  

हे व्यवहार कसे घडतात त्यावर उपाय काय असू शकतील? 

  • याची सुरूवात 20 ऑगस्ट 2021 रोजी झाली. यादिवशी निफ्टी 16450 CE चा प्रीमयम डोळ्याचे पाते लवते न लवते तोच काही समजण्याच्या आत क्षणार्धात 100 वरून 800 पर्यत वाढला त्यामुळे ज्यांच्या शॉर्ट पोझिशन होत्या अनेकांचा स्टॉप लॉस हिट होऊन मार्केट ऑर्डर टाकली जाऊन उपलब्ध वेगवेगळ्या प्रीमियमने पोझिशन स्क्वेअरअप झाल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले. हे कसं झाले ते पाहुयात. 
  • या ट्रेडरने 16450 CE 100 रू प्रीमयम घेऊन शॉर्ट केला 140 रु प्रीमियामला त्याने मार्केट ऑर्डर देऊन स्टॉपलॉस लावलाय जेव्हा हा प्रीमियम 140 गाठेल तेव्हा टाकलेली ऑर्डर उलट होऊन खरेदीदार शोधण्याचा प्रयत्न करेल. 
  • ज्या जवळच्या किमतीस खरेदीदार उपलब्ध त्या किमतीने खरेदी  व्यवहार होईल. 140 ला टाकण्यात येणाऱ्या स्टॉप लॉस ऑर्डर्सची सुरुवात, जेव्हा हा प्रीमयम 136 च्या आसपास असतो तेव्हा सुरुवात होऊन उपलब्ध किमतीस खरेदी केली जाते. 
  • नियमित बाजारात ही खरेदी 140 रूपयांच्या मागेपुढे होईल. मात्र 20 ऑगस्टच्या दिवशी जेव्हा हा प्रीमियम काही क्षणात 800 हून अधिक झाला तेव्हा 803.50 ₹ प्रीमयम देऊन 6000 लॉटसची खरेदी झाली. विशिष्ट किमतीस खरेदी ऑर्डर सामावून घेणाऱ्या पुरेश्या विक्रेत्यांच्या अभावामुळे हे घडले. जर ही खरेदी ₹800/- प्रीमियम देऊन झाली तर 800-100= 700 म्हणून 700×50=35000 ₹ तोटा एका लॉटमध्ये झाला.

महत्वाचा लेख: Trader’s Psychology: शेअर बाजारातील विक्रेत्यांची मानसिकता 

हे कसे टाळता येऊ शकेल?

  • सर्वसाधारणपणे ट्रेडिंग करताना स्टॉप लॉसचा वापर करावा हे धोका व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे सांगितले जाते. 
  • आता डिरिव्हेटिवच्या संदर्भात यात बदल करावा लागून असा स्टॉप लॉस लावू नये असे सांगावे लागेल. हे एक नवीन सामान्य (New normal) असेच समजावे. यासाठी एक्सचेंजला दोष देण्यात अर्थ नाही.
  • त्याचप्रमाणे असा स्टॉप लॉस न लावल्यामुळे अपेक्षित नुकसान अधिक होण्याची शक्यतेचा धोकाही वाढू शकतो.
  • जे लोक हाताने ऑर्डर टाकून असे निर्णय घेतात त्यांना इतक्या चापल्याने निर्णय घेऊन ऑर्डर टाकता येणे जवळपास अशक्य आहे हे व्यवहार इतक्या कमी वेळात घडतात की स्क्रीनवर लक्ष ठेवून असणाऱ्यानाही हे व्यवहार झाल्याचे नोटिफिकेशन आल्यावरच समजते. तेव्हा मार्केट ऑर्डर ऐवजी लिमिट ऑर्डर एका विशिष्ट मर्यादेत टाकता आल्यासाच थोडासा दिलासा मिळू शकतो अशी ऑर्डर सध्या टाकता येते पण तरीही एखाद्या खऱ्याखुऱ्या बातमीमुळे प्रीमियम कमी अधिक वाढत राहिल्यास अमर्याद तोटा वाढत राहण्याचा धोका राहतोच.
  • तुमच्या ब्रोकरकडून तुमच्या स्टॉपलॉस विषयी पूर्वसूचना मिळेल अशी सोय असल्यास योग्य वेळी तुम्हाला तुमची ऑर्डर टाकता येऊ शकेल.
  • फ्रिकट्रेड कालावधी अत्यंत कमी सेकंदाचा असतो एखाद्या ट्रेडिंग सॉफ्टवेअरचा वापर करून ट्रेडिंग करतात त्यास फ्रिक ट्रेड समजून स्टॉप लॉस मर्यादा आल्यावर 10 ते 15 सेकंद कोणतीही ऑर्डर न टाकता, बाजारातील प्रीमियमवर गुणवत्तेनुसार विचार करूनच प्रीमियम स्टॉप लॉसच्या आजूबाजूला असेल तरच ऑर्डर टाकली जाईल अशा प्रकारचे बदल करावे लागतील.

याशिवाय को लोकेशन सुविधा ज्यामुळे एक्सचेंजला पैसे देऊन अशी सुविधा घेतलेल्या व्यक्तीच्या ऑर्डर इतरांच्याहून काही अंश सेकंदाने आधी एक्सचेंजवर टाकल्या जातात. याशिवाय तीव्र क्षमतेची कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित सुसज्य यंत्रणा, अल्गो ट्रेडिंग मोजक्याच लोकांकडे एकवटली असल्याने निर्माण होत असणाऱ्या असमानतेमुळे ठराविक वर्गाला होणारा तोटा होण्याची सह्क्यता असल्याने  सर्वसाधारण गुंतवणूकदारांच्या मनोबलावर परिणाम होऊन शेअरबाजारावरील विश्वास उडण्यात शक्यता आहे. आज बाजारात किरकोळ गुंतवणूकदारांची असलेली टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढलेली असताना त्यांनी येथे टिकून राहणे हे आवश्यक आहे.  यामुळेच को लोकेशन व अल्गो या संदर्भात निश्चित नियम करण्याची आवश्यकता बाजार नियामक मंडळ आणि सेबी यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.

उदय पिंगळे

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Freak Trade Marathi Mahiti, Freak Trade in Marathi, Freak Trade mhanje kay?

Share this article on :
1 comment
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…