e filing of ITR
Reading Time: 2 minutes

E-filing of ITR

इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच आयटीआर ऑनलाईन पद्धतीनेही भरता येतो (E-filing of ITR). आयटीआर भरण्यासाठी ३१ डिसेंबर पर्यत मुदत देण्यात आली आहे. आयटीआर भरणे हे देशातील प्रत्येक जबाबदार नागरिकाचे कर्तव्य आहे. बऱ्याच नागरिकांना इन्कम टॅक्स रिटर्न भरणे  खूप अवघड  वाटते, परंतु इन्कम टॅक्स भरणे हे आता पूर्वीसारखे कठीण राहिले नाही यासाठी लांब रांगेत उभे राहण्याची देखील गरज नाही. तुम्ही तुमच्या घरूनच ऑनलाइन पद्धतीने देखील इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकता. 

आयटीआर भरणे हे काहींसाठी सक्तीचे, तर काहींसाठी ऐच्छिक आहे. परंतु आयटीआर भरण्याचे अनेक फायदे आहेत.

आयटीआर भरण्याचे फायदे:

  • कर्ज प्रक्रिया सुलभ होते. कोणतेही कर्ज घेण्याच्या प्रक्रियेमध्ये मागील दोन किंवा तीन आर्थिक वर्षांचे आर्थिक रिटर्न्स सबमिट करणे गरजेचे असते. त्यामुळे कर्ज घेताना आयकर रिटर्न भरण्याचा फायदा होतो 
  • तुम्हाला तुमच्या नुकसानीचा दावा करण्यास मदत मिळते.
  • तुम्हाला टीडीएस परताव्याचा दावा करण्यास मदत मिळते.
  • यामुळे तुम्हाला व्हिसा किंवा क्रेडिट कार्ड अर्जा मध्ये मदत मिळते.

ऑनलाइन आयटीआर भरण्याचे अनेक फायदे आहेत:

  • ऑनलाइन प्रक्रियेत जास्त वेळ लागत नाही.
  • यासाठी वेळेचे बंधन नाही.
  • यामध्ये गोपनीयता राहते.
  • मागील डेटा तुम्ही पाहू शकता.
  • पावतीचा पुरावा तुम्हाला लगेच तुमच्या ईमेल आयडीवर मिळतो.

आयटीआर भरण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे.

  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • फॉर्म १६
  • गुंतवणुकीचे तपशील
  • बँक अकाउंट स्टेटमेंट्स 

तुमचा आयकर रिटर्न ऑनलाइन पद्धतीने कसा भराल? (e-filing of ITR)

  • इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी सर्वात प्रथम इन्कम टॅक्स रिटर्न डिपार्टमेंट  https://www.incometax.gov.in/iec/foportal या वेबसाइट वर जा. 
  • या वेबसाइट वर लॉग इन करा जर तुम्ही आधी लॉग इन केले नसेल, तर तुम्हाला येथे आधी रजिस्टर करावे लागेल.
  • लॉग इन केल्यानंतर ई-फाईल वर जाऊन प्रिपेअर अँड सबमिट ऑनलाइन आयटीआर (prepare and submit online ITR) हा पर्याय निवडा.
  • त्यानंतर assessment year सिलेक्ट करून म्हणजे ज्या वर्षासाठी आयकर रिटर्न भरायचा आहे ते वर्ष सिलेक्ट करा.
  • तुम्हाला जो आयटीआर फॉर्म भरायचा आहे तो निवडा आणि तिथे दिलेल्या सुचना काळजीपूर्वक वाचून सर्व माहिती भरा.
  • त्यानंतर टॅक्स पेड अँड व्हेरिफिकेशन मध्ये तुमची माहिती व्यवस्थित पडताळून घ्या.
  • आता तुमचा टॅक्स भरण्यासाठी कॅल्क्युलेट टॅक्स टॅबचा वापर करून तुम्ही टॅक्स भरू शकता.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म व्हॅलिडेट करून घ्यावा लागेल.
  • तुम्हाला ज्या पद्धतीने फॉर्म व्हेरिफिकेशन करायचा आहे तो पर्याय निवडा, तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटिपी भरून पुढे जा व सबमिशन कन्फर्म हा पर्याय निवडा व तुमचा फॉर्म सबमिट करा.

अशाप्रकारे तुम्ही अगदी घरबसल्या सोप्या पद्धतीने तुमचा आयकर रिटर्न भरू शकता.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

web search:  e-filing of ITR explain in Marathi,  e-filing of ITR Marathi Mahiti

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutesअनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

आयकर विभागाची नोटीस आली आहे? घाबरू नका, आधी हे वाचा

Reading Time: 4 minutesटॅक्स, टॅक्स रिटर्न हे शब्द जरी ऐकले तरी करदाता काहीसा नाराज होतो. त्यात जर का आयकर विभागाकडून कुठली नोटीस आली तर ही नाराजी भीतीमध्ये बदलते. आयकर विभागाकडून आलेल्या कोणत्याही नोटीसमुळे अथवा पत्रामुळे करदाते घाबरून जातात. तथापि, कलम १४३(१) सूचना म्हणजे काळजी करण्याची गरज नाही. या लेखात आम्ही कलम १४३(१) च्या अंतर्गत पाठविलेल्या सूचनांबद्दल तपशीलवार चर्चा करणार आहोत जेणेकरून करदात्यांना याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल.

कलम ८० अंतर्गत करबचतीचे विविध पर्याय

Reading Time: 3 minutesआयकर कायदा १९६१, नुसार कलम ८० मध्ये करबचतीचे विविध पर्याय नमूद करण्यात आले आहेत. मागील भागात कलम ८० सी अंतर्गत नमूदकेलेल्या विविध पर्यायांची माहिती घेतली. या भागात उर्वरित सबसेक्शन अंतर्गत नमूद करण्यात आलेल्या करबचतीचे विविध पर्यायांची माहिती घेऊया.

PAN Card: पॅन कार्ड विषयी सर्व काही

Reading Time: 3 minutesपॅन कार्ड हे महत्वाच्या दस्तऐवजांपैकी एक आहे.  अगदी बँक खाते उघडण्यापासून प्रत्येक गोष्टीसाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे. तुम्ही करदाते (Tax payer) असाल किंवा नसाल, पण तुमच्याकडे तुमचे स्वतःचे पॅनकार्ड असणे अनिवार्य आहे. या लेखात आपण पॅन कार्डबद्दलची विस्तृत माहिती घेणार आहोत.