ipo
ipo
Reading Time: 2 minutes

भांडवली बाजारपेठेत आयपीओची हवा सध्या पसरू लागली आहे. २०२१ हे वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि हे आयपीओसाठी रेकॉर्ड वर्ष ठरले आहे. नोव्हेंबर २०२१ नुसार ५३ आयपीओंनी ११४.६५३ कोटी रूपये गोळा केले आहेत. पुढील काही महिन्यांत गुंतवणूकदारांना आपल्या प्रारंभीच्या सार्वजनिक ऑफरिंगसह अनेक नवीन कंपन्या येताना दिसतील. हा गुंतवणूकदारांसाठी उत्साहवर्धक कालावधी असू शकेल परंतु त्याचवेळी सार्वजनिक ऑफर्ससाठी कंपनीची निवड करताना माहितीपूर्ण निर्णय घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. नजीकच्या भविष्यात गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेऊ शकणा-या काही आयपीओंविषयी (Five upcoming IPO)  माहिती देताहेत एंजेल वनचे एव्हीपी मिडकॅप्स, श्री. अमरजीत मौर्य.

Five upcoming IPO : पाच लक्षवेधी आयपीओ

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस : कोविड-१९ आणि लोकांचे प्रवास आणि सार्वजनिक गर्दीवर लादलेल्या निर्बंधांमुळे शिक्षण क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. देशभरातील शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग सेंटर्स अद्यापही उघडलेली नाहीत. यामुळे तसेच ऑनलाइन शिक्षणाच्या फायद्यांमुळे एज्युटेक क्षेत्राची मागील काही तिमाहींमध्ये भरभराट झाली आहे. आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस हा उद्योगातील ख्यातनाम आणि प्रतिष्ठित ब्रँड आहे. गुंतवणूकदार लघु ते मध्यम कालावधीतील वाढीच्या मोठ्या प्रवाहांमुळे हे शेअर आपल्या पोर्टफोलिओत घेण्याचा विचार करू शकतात.

इक्सिगो: आणखी एक नवीन युगाची तंत्रज्ञान कंपनी विविध पर्यटन एग्रेशन सेवा देत असून ती लवकरच आयपीओसह शेअर बाजारात येण्याची शक्यता आहे. कंपनीने खासगी गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणावर निधी उभा केलेला असला तरी प्रवर्तकांच्या मते (promoters feel) दीर्घकालीन विस्तार प्रामुख्याने सार्वजनिक ऑफरिंग्समुळे होऊ शकतो. पुन्हा एकदा या लिस्टिंगचे संपूर्ण भवितव्य आगामी महिन्यातील प्रवासाच्या स्थितीवर अवलंबून असेल, कारण त्याचा थेट प्रभाव कंपनीच्या रोख प्रवाह आणि नफ्यावर पडेल.

हेही वाचा – IPO New Rules and Regulation : आयपीओबद्दल ‘हे’ नवीन नियम माहित आहेत का ?…

सीएमएस इन्फो सिस्टिम्स: सीएमएस हे वित्तीय आणि माहितीपूर्ण सेवांच्या क्षेत्रातील आणखी एक ख्यातनाम नाव आहे. त्यातून एटीएम रोख व्यवस्थापन, रिटेल रोख व्यवस्थापन, बँकिंग ऑटोमेशन सेवा, दूरस्थ मॉनिटरिंग, कार्ड व्यवस्थापन इत्यादी विविध प्रकारच्या सेवा दिल्या जातात. अलीकडच्या काळात ऑटोमेशन आणि बँकिंग आणि वित्तीय सेवांच्या डिजिटलायझेशनमध्ये वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांना आयपीओचे अचूक मूल्यमापन आणि किंमत यांच्याबाबत प्रश्न पडू शकतो आणि एकूणच पोर्टफोलिओ विस्तारासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

ईमुद्रा: देशातील डिजिटल क्रांतीचा आणखी एक प्रवर्तक म्हणजे ईमुद्रा असून ही कंपनी लवकरच एक आयपीओ घेऊन येत आहे. ही कंपनी डिजिटल स्वाक्षरी आणि ऑनलाइन आयडी पडताळणीतील प्रवर्तक असून ती देशातील ओळख पूर्तता आणि ई-केवायसीचा दर्जा सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल,अशी अपेक्षा आहे. गुंतवणूकदार शेअर बाजारात नोंदणी करण्याची योजना करत असताना कंपनीची ऑफर किंमत आणि भविष्यातील योजनांबाबत उत्सुक असू शकतात. 

फ्लेअर रायटिंग सर्व्हिसेस: मागील पाच वर्षांत सातत्यपूर्ण डबल डिजिट वाढ (double-digit growth) होत असताना फ्लेअर रायटिंग सर्व्हिसेस ही देशातील सर्वाधिक लोकप्रिय पेन आणि स्टेशनरी उत्पादकांपैकी एक आहे. कंपनीची उत्तम पुरवठा साखळी आणि या क्षेत्रातील उत्तम अनुभवामुळे त्यांचा यात उत्तम वचक आहे. गुंतवणूकदारांना कंपनीच्या इतिहास आणि उत्तम वित्तीय स्थितीमुळे यात स्वारस्य निर्माण होऊ शकते.

हेही वाचा – शेअरबाजार: ‘LIC’ चा ‘IPO’.. मी काय करेन?…

सारांश: थोडक्यात सांगायचे झाल्यास गुंतवणूकदारांनी हे समजून घेतले पाहिजे की, आयपीओमधून निश्चित यश मिळेलच असे नाही. इतर कोणत्याही गुंतवणूक निर्णयाप्रमाणेच गुंतवणूकदाराने कंपनीची निवड करताना हुशारीने वागण्याची गरज आहे. बिझनेस मॉडेल, कंपनीची वाढीची क्षमता आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कंपनीचे मूल्यमापन अशा विविध गोष्टींचा विचार आयपीओसाठी अर्ज करताना करणे गरजेचे आहे. अंतिमतः पुढील काही महिने गुंतवणूकदारांसाठी विविध प्रकारचे पर्याय घेऊन येतील, जेणेकरून त्यांना आपला पोर्टफोलिओ विस्तारित करून लिस्टिंग गेन्समधून नफा मिळवणे शक्य होईल.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…