जेलस मित्र
jelous friends in marathi
Reading Time: 5 minutes

Get rid of Jealous Friends :  जेलस मित्रांपासून दूर रहा 

  • तुमच्यापैकी बऱ्याच जणांना किमान एकदा तरी दुसऱ्यांची श्रीमंती किंवा प्रगती बघून त्यांच्याबद्दल किंचित का होईना मत्सर वाटला असेलच. एखाद्याचं मोठं घर, गाडी, गलेलठ्ठ पगाराची नोकरी, आज्ञाधारक मुलं, चांगलं दिसणं, चांगलं आरोग्य, उच्च दर्जाची लाइफस्टाइल अशा कुठल्या ना कुठल्या बाबतीत तुम्ही स्वतःची दुसऱ्यांशी तुलना केली असेल.
  • तुलना करताना समोरची व्यक्ती आपल्यापेक्षा या सगळ्या बाबतीत उजवी ठरायला लागते तेव्हा तुमच्या मनात त्या माणसाविषयी असूया निर्माण होते. तुमचं मन दुःखी होतं की हे सगळं जे याच्याकडे आहे ते माझ्याकडे का नाही? ही सगळी भावना म्हणजेच तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल वाटणारा मत्सर ! 
  • या मत्सरामुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या लोकांचा राग येऊ लागतो आणि तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. 

 

मत्सर वाटून घेणं म्हणजे तुम्हीच तुमच्या निरोगी आर्थिक जीवनात विष कालावल्यासारखं आहे.

  • मत्सर तुम्हाला तुमच्या कुवती बाहेरच्या गोष्टी विकत घेण्यास प्रवृत्त करते.
  • मत्सरामुळे तुम्ही कर्ज काढून कार किंवा फर्निचर घेता जे तुमच्या डोक्यावरचा कर्जाचा भार वाढवते.  
  • मत्सर तुम्हाला बरेच लक्झरी ब्रँड खरेदी करण्यास प्रवृत्त करते जे तुम्हाला खरोखर परवडत नाही, त्यामुळे अधिक महत्त्वाच्या गोष्टींसाठी तुम्हाला पैसे अपुरे पडू लागतात. 

हेही वाचा – कमावण्यापूर्वी कधीही आपला पैसा खर्च करू नका. – थॉमस जेफरसन…

 

पुढील 7 गोष्टी आचरणात आणून तुम्ही या वाईट भावनेवर ताबा मिळवू शकता आणि एका निखळ जीवनाचा आनंद घेऊ शकता. 

  1. तुमच्याकडे आधीपासून असलेल्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ काढा.
  • इतर लोकांकडे जे काही आहे ते तुमच्याकडे नसले तरीही, याचा अर्थ असा नाही की तुमचे जीवन चांगले नाही. प्रत्येकाचे जीवन अनेक चांगल्या गोष्टींनी भरलेले असते. गरज आहे ती फक्त तुम्ही जाणीवपूर्वक त्या चांगल्या गोष्टी शोधून काढायची.
  • तुमच्या आयुष्यात आधीपासून असलेल्या चांगल्या गोष्टी शोधा आणि त्याबद्दल देवाकडे कृतज्ञता व्यक्त करा. 

तुमच्यावर प्रेम करणारे लोक पहा. तुम्ही साध्य केलेल्या सकारात्मक गोष्टी पहा. सकाळच्या कोवळ्या सूर्याच्या किरणांची उबदार अनुभूती यांसारख्या साध्या सुखांकडेही पहा. तुमचे जीवन चांगुलपणाने भरलेले आहे, त्यामुळे तुमच्या जीवनातल्या त्याच चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.

  • अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसाठीसुद्धा जगातील कित्येक लोक पारखे झालेले असतात, तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळाल्या आहेत यासाठी खरंच स्वतःला नशीबवान समजा. 

तुम्ही काय करू शकता 

  • तुम्ही ज्यासाठी कृतज्ञ आहात त्या पाच गोष्टी दररोज एका वहीत लिहिण्यासाठी काही मिनिटे वेळ काढा आणि या सवयीला आपल्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवा.
  1. लक्षात ठेवा की कोणाचेही जीवन “परिपूर्ण” नसते आणि आपण पाहत असतो तो लोकांचा समाजात वावरता यावं यासाठी काळजीपूर्वक समोर आणला जाणारा  “सार्वजनिक मुखवटा” असतो.
  • इतर लोकांचे जीवन तुमच्या स्वतःच्या जीवनापेक्षा खूप परफेक्ट आहे या कल्पनेत अडकणे सोपे आहे.
  • परंतु, तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की जेव्हा तुम्ही लोकांना समाजात वावरताना पाहता तेव्हा तो त्यांचा सार्वजनिक चेहरा असतो. ते बहुतेक वेळा स्वतःला सर्वोत्तम दाखवण्याचा प्रयत्न करत असतात.
  • जेव्हा आपण सोशल मीडियावर लोकांना पाहतो, तेव्हा ते नेहमीच त्यांच्या सर्वोत्तम गोष्टींचे प्रदर्शन करत असतात. कारण त्यांना त्यांच्या जीवनातील मोठेपणा दाखवायचा असतो, दोष नाही.
  • आपल्या संपूर्ण जीवनाची तुलना इतरांच्या जीवनातील सकारात्मक पैलूंशी करू नका. तुम्ही ती तुलना जवळजवळ कधीच जिंकू शकणार नाही, उलट तुम्हाला त्याचा त्रासच जास्त होऊ शकतो.

 

हेही वाचा – Key investment lessons: महाभारतातून शिका आपल्या आर्थिक गुंतवणुकीची पंचसूत्रे !…

तुम्ही काय करू शकता 

  • “जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे” अशी एक म्हण आहे. तुम्हाला एखाद्याच्या ज्या गोष्टींबद्दल मत्सर वाटतोय ते मिळवण्यासाठी त्या माणसांनी किती मेहनत केली असेल याची कल्पना करून बघा.   
  • तुम्हाला त्यांच्या ज्या गोष्टीचा हेवा वाटतो ते मिळवण्यासाठी त्या व्यक्तीने केलेल्या अपार त्यागांचा विचार करा. खूप कमी कमाई आणि कठीण प्रसंग सहन करून तिथे पोहोचण्यासाठी त्यांनी किती वर्षांचा अभ्यास केला असेल?  या सगळ्या गोष्टींचा विचार कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे सगळं करणं तुमच्या कुवतीच्या बाहेरचं आहे. आणि मग कुठेतरी तुम्ही इतरांचा मत्सर करणं हळूहळू कमी करू लागाल. 

  1. जेव्हा दुसरे लोक यशस्वी होतात, तेव्हा त्यांचा हेवा करण्यापेक्षा ते यश त्यांच्यासोबत साजरे करा
  • आपल्याकडे एक रीत आहे, ज्यामध्ये प्रत्येक विजयाला “पराजया” बरोबर तोलले जाते. प्रत्येक यश लाभलेल्या आणि हरलेल्या व्यक्तीत तुलना केली जाते. कदाचित मत्सर जगाच्या याच दृष्टिकोनातून जन्माला आला असावा. 
  • पण हा दृष्टिकोन खोटा आहे. उदाहरणार्थ, प्रेम करणारी दोन माणसे घ्या, त्यांच्यात प्रेमळ नातेसंबंध असतात आणि त्यात ते दोघेही जिंकतात. त्यात हरण्याची भावना नसते. 
  • तसेच चांगली मैत्री असलेल्या दोन मित्रांच्या नातेसंबंधात कोणताही तोटा नसतो कारण त्या मैत्रीत ते दोघेही काही  गमावत नाहीत.
  • त्याचप्रमाणे जर तुमच्या मित्राने काही अचिव्ह (Achieve) केले तर त्याचा अर्थ त्याच्या तुलनेत तुम्ही हरला असा होत नाही. 

तुम्ही काय करू शकता 

  • जेव्हा तुमचा मित्र यशस्वी होतो तेव्हा तुम्हीही त्याच्या यशात सामील होऊन आनंदी व्हा आणि तो आनंद जाहीरपणे मनापासून अभिनंदन करून व्यक्त करा.
  1. समविचारी आणि तुमच्या सारखी समान मूल्ये जोपासणाऱ्या लोकांसोबत नातेसंबंध जोपासा. 
  • “द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला, कडू कावूळ झाला संगती गुणे.. !” रसाळ गोड असलेला द्राक्ष जर लिंबाच्या सहवासात आला तर द्राक्षास कडू पाडण्याची ताकद त्या लिंबामध्ये आहे, तसेच महत्व संगतीचे आपल्या आयुष्यात आहे. 
  • चांगले आणि पॉझिटीव्ह विचार करणाऱ्या लोकांशी मैत्री केली तर त्यांच्यातील चांगल्या गुणांचा तुमच्यावर चांगला परिणाम होऊ शकतो. अशा प्रकारे, इतरांबद्दल मत्सर नसलेल्या, त्याऐवजी नम्र आणि इतरांसाठी 

खरोखर आनंदी असलेल्या लोकांशी स्वत: ला जोडल्यामुळे तुम्हीही त्यांच्याप्रमाणे बनून जाल. 

तुम्ही काय करू शकता 

  • तुमच्या आजूबाजूला नम्रता, प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता यासारखे गुण असणाऱ्या व्यक्तींशी मैत्री वाढवा आणि त्यांच्या मैत्रीतील चांगल्या गुणांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करा, कालांतराने तुम्ही स्वत: नम्र आणि विश्वासार्ह होऊन जाल .
  1. तुम्हाला तुमच्या आयुष्यात नको असलेले विचार किंवा मूल्ये सार्वजनिकपणे मांडणाऱ्या लोकांना टाळा.
  • थोडक्यात सांगायचं झालं तर तुमच्या जीवनात तुम्हाला नको असलेली वैशिष्ट्ये दाखवणार्‍या लोकांशी असलेले नातेसंबंध हळूहळू काढून टाकणे.
  • इतरांबद्दल मत्सर करणारे, टीका करणारे आणि नकारात्मक वागणारे लोक टाळा. जे लोक त्यांच्या मालकीच्या आणि विकत घेतलेल्या वस्तूंच्या बाबतीत त्यांच्या किमतींचा बडेजाव करण्याचा प्रयत्न करतात त्यांना टाळा. 
  • तसेच जे लोक त्यांच्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि आर्थिक यशाची बढाई मारतात त्यांनाही टाळा.

तुम्ही काय करू शकता 

  • तुमच्या मित्रांची यादी पहा आणि जे अनेकदा त्यांच्या संभाषणात, वागण्यात नकारात्मक गुण आणतात त्यांना ओळखा आणि त्यांच्यासोबत कमी वेळ घालवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा. तो वेळ अधिक सकारात्मक असलेल्यांसोबत घालवायचा प्रयत्न करा.

 

‘मार्केटिंग’ आणि ‘मार्केटिंग करणारे’ ओळखायला शिका.

  • “जे चकाकतं ते सोनं नसतं”. टीव्ही, पेपर मध्ये दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सच्या चंदेरी जाहिराती पाहून अनेकदा आपल्याला ती प्रॉडक्ट्स वापरणाऱ्या आपल्या मित्रांचा किंवा ती जाहिरात करणाऱ्या लोकांचा हेवा वाटतो. आपल्याकडेही ती वस्तू असावी असं वाटू लागतं. 
  • खासकरून तुमचा आवडता अभिनेता किंवा अभिनेत्री जर त्या प्रोडक्टची जाहिरात करत असेल आणि ती वस्तू आपल्याकडे नसेल तर त्या मत्सरात अजूनच वाढ होते. त्यामुळे तुम्ही अजूनच दुःखी होता. 

 

हेही वाचा –  Buy your Dream Home : तरुण वयात घर विकत घेण्यासाठी ‘या’ १० स्मार्ट टिप्स…

तुम्ही काय करू शकता 

  • जाहिरात किंवा मार्केटिंग करणाऱ्यांचे ध्येय तुम्ही त्यांची प्रॉडक्ट्स विकत घेतलीच पाहिजे हे असते याची जाणीव ठेवा. 
  • जाहिरात आणि जाहिरातीत काम करणारे खूप आकर्षक आणि आदर्श वाटत असले तरी तो फक्त दिखावा असतो. त्यामुळे ही मार्केटिंगची स्ट्रॅटेजि लक्षात घेऊन आपल्याकडे ती गोष्ट नाही याचं दुःख किंवा मत्सर वाटून घेऊ नका. 
  1. तुमचा वेळ आणि पैसा याबाबत जागरूक रहा. 
  • जेव्हा तुम्ही तुमचा वेळ, शक्ती आणि पैसा इतरांना देता, तेव्हा तुमच्यासाठी तितकीशी किंमत नसलेली एखादी गोष्ट इतरांसाठी किती मौल्यवान असू शकते हे तुम्ही कधीतरी अनुभवले असेल आणि त्यावरून तुमच्याकडे किती मूल्य आहे आणि तुम्हाला इतरांना किती द्यायचं आहे याची जाणीव होऊ लागते.
  • उदाहरणार्थ, एखाद्या वयस्कर आजीला किराणा सामान आणून देण्यात मदत करणं, किंवा वडीलधाऱ्या व्यक्तीला एखादं मोबाईल अँप (App) कसं वापरायचं ते शिकवणं. आपल्याला किरकोळ वाटणाऱ्या या अशा गोष्टींमुळे त्यांच्या दृष्टीने त्यांना खूप मोलाची मदत झालेली असते. 

तुम्ही काय करू शकता 

  • दुसऱ्यांना मदत होईल अशा छोट्या छोट्या गोष्टी अधूनमधून करा. तुम्ही ज्यांना मदत करता त्यांच्या डोळ्यांत तुमच्या बद्दल दाटून आलेली कृतज्ञता तुम्हाला मत्सर, हेवा अशा वाईट भावनांवर मात करायला नक्कीच मदत करेल. 

अशाप्रकारे तुमचं आयुष्य चांगल्या गोष्टींनी आणि चांगल्या लोकांनी व्यापून टाका जेणेकरून मत्सर, हेवेदावे, राग-रुसवा याऐवजी तुमच्या आयुष्यात उरेल फक्त प्रेम !

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutesआर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…

करोडपती कसे व्हावे?

Reading Time: 4 minutesमाझ्या लहानपणी म्हणजे 50 वर्षांपूर्वी दहा हजार ही खूप मोठी रक्कम होती…

Education – नामांकन : गरज की आवश्यकता ?

Reading Time: 3 minutesतुम्ही निवडलेली एखादी व्यक्ती जी तुमच्या पश्चात तुमच्या मालमत्तेची उत्तर अधिकारी असेल.…

डिजिटल रुपया म्हणजे काय ? घ्या समजून

Reading Time: 2 minutesडिजिटल रुपया म्हणजे काय आणि त्याचा व्यवहारात उपयोग कसा होईल याची उत्सुकता…