Reading Time: 3 minutes

तुम्ही निवडलेली एखादी व्यक्ती जी तुमच्या पश्चात तुमच्या मालमत्तेची उत्तर अधिकारी असेल. तुमची सर्व संपत्ती तुमच्या नंतर तुम्ही नॉमिनी म्हणून ज्या व्यक्तीचे नाव नामनिर्देशित केले आहे त्या व्यक्तीला मिळेल.  बँक व्यवहार, म्युच्युअल फंड, विमा योजना यासाठी मुख्यत्वे नामांकन असणे महत्वाचे असते. नामांकनाच्या सुविधेमुळे स्वकष्टाच्या पैशाची सुरक्षितता मिळेल. (Nomination information in Marathi)

नामांकन का महत्वाचे आहे, नामनिर्देशन कसे करावे, ही प्रक्रिया न केल्यास काय होते ह्या सर्व प्रश्नांची सविस्तरपणे माहिती आजच्या या लेखामध्ये आपण बघूया.

  • बँक किंवा कुठल्याही गुंतवणुकीच्या आर्थिक व्यवहारात कागदपत्रावर नॉमिनेशन म्हणून एक रकाना असतो. यात तुम्हाला आवर्जून तुमच्या विश्वासू आणि जवळच्या व्यक्तीचे नाव लिहिणे अपेक्षित असते. कारण तुमच्या मृत्यूपश्चात तुमची गुंतवणूक ही कायद्याने हस्तांतरित होत असते आणि हे तुमच्या संमतीने होत असते.
  • नामनिर्देशन करताना काही गोष्टी समजून घेणे गरजेचे असते कारण नामनिर्देशनाची प्रक्रिया (Nomination process)अत्यावश्यक आहे.
  • तुमच्या पश्चात तुमच्या मालमत्तेची काळजी घेणे आणि हस्तांतरणाच्या वेळी नमूद केलेल्या व्यक्तीकडे योग्य वेळी सुपूर्द करणे हा या प्रक्रिये मागचा हेतू असतो.ज्याची जबाबदारी नॉमिनीवर असते. 

 हे वाचा : भारतीय बॅंकिंग क्षेत्रातील गुंतवणूक संधी !

काही महत्वाचे आणि  नेहमी विचारले जाणारे प्रश्न : 

( Frequently asked  Q/A for Nomination )

  • नामनिर्देशन करतांना कोणाचे नाव देणे अपेक्षित असते?
  • बँक खात्यामधील पैसे तुमच्या नंतर कोणाला मिळावे हा सर्वस्वी तुमचा निर्णय असतो.
  • तुमचा जोडीदार, मुले, आई-वडील, भाऊ-बहीण, जवळचे नातेवाईक किंवा जवळचा मित्र सुद्धा असू शकतो.
  • बँकेमध्ये एक खातेधारक किती व्यक्तीचे नामांकन देऊ शकतो?
  • बँक खात्यासाठी खातेधारक एकाच व्यक्तीचे नाव नामनिर्देशनासाठी देऊ शकतो.
  • वेगवेगळ्या बँक खात्यासाठी एकाच व्यक्तीला नॉमिनी म्हणून ठेऊ शकता किंवा वेगवेगळे व्यक्ती देखील नामनिर्देशित करू शकता.
  • अल्पवयीन (minor) व्यक्तीचे खाते उघडताना ज्याप्रमाणे कायदेशीररित्या योग्य व्यक्ती किंवा पालक या खात्याला हाताळते त्याप्रमाणे कायदेशीररित्या सक्षम व्यक्ती अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने नामनिर्देशन देखील करू शकते.
  • नॉमिनी चे नाव फॉर्म मध्ये देताना त्या व्यक्तीच्या नावासोबत पत्ता, वय आणि तुमच्या सोबत त्या व्यक्तीचे असलेले नाते याबद्दल सर्व माहिती पुरविणे गरजचे असते.  
  • म्युच्युअल फंड साठी जास्तीत जास्त तीन व्यक्तीचे नाव नामनिर्देशन यासाठी देऊ शकतात.
  • मात्र प्रत्येकाच्या नावा समोर किती वाटा असणार हे नमूद करावे लागते.

 

  • नॉमिनेशन चे फायदे: 
  • खातेधारक किंवा मालमत्ताधारक व्यक्तीचे निधन झाल्यास नामनिर्देशन प्रक्रियेमुळे सर्व मालमत्ता आणि खात्यातील रक्कम ही संबंधित व्यक्तीला मिळते.
  • खाते धारकाच्या मृत्यूनंतर बँकेमध्ये ओळखपत्र आणि इतर कागदपत्र जमा करून विनासायास ही प्रक्रिया पूर्ण होते.
  • म्युच्युअल फंड मध्ये सर्व व्यवहार ऑनलाईन स्वरूपात असल्याने फंड धारकाच्या पश्चात सर्व जबाबदारी नामनिर्देशित व्यक्तीवर असते.फंड बद्दल सर्व निर्णय नामनिर्देशित व्यक्ती घेऊ शकते.

 

  • नॉमिनेशन केले नाही तर ?
  • बरेच खातेधारक नॉमिनेशनच्या प्रक्रियेला महत्व देत नाही किंवा दुर्लक्ष केले जाते मात्र त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांना खाते धारकाच्या मृत्यूनंतर अनेक संकटांना सामोरे जावे लागते.
  • बँकेत अनेक कागदपत्र जमा करावे लागतात,ही प्रक्रिया वेळखाऊ तसेच मानसिकरित्या खचून गेलेल्या कुटुंबियांना अधिक क्लेशदायक ठरू शकते.
  • यासाठी कुटुंबियातील सदस्याला वारस म्हणून मालमत्तेवर हक्क दाखवण्यासाठी न्यायालयात जावे लागते आणि स्वतःचे वारसत्व सिद्ध करावे लागते.
  • अनेक बँकांमध्ये नॉमिनेशन नसल्यामुळे कितीतरी पैसे पडून आहे.  

महत्वाचे : PMMVY – आई व बाळांसाठी वरदान असलेली ‘प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना’

मृत्युपत्रातील नॉमिनी: 

  • आपल्या आयुष्यात मेहनतीने कमावलेली सर्व संपत्ती कुटुंबातील व्यक्तीला मिळावी या हेतूने मृत्युपत्र करताना ती व्यक्ती वारसाचे नाव लिहीत असते.त्यानुसार त्याच्या नावे असलेली मालमत्ता विभागून दिली जाते.
  • मृत्युपत्र लिहिणाऱ्या व्यक्तीला एका पेक्षा अधिक संतती असतील तर त्या प्रत्येकाच्या नावे किती हिस्सा देणार आहे हे लिहून ठेवावे लागते.
  • मृत्युपत्र केलेच नाही आणि वारसदार देखील नसेल तर मृत्यूच्या पश्चात सर्व मालमत्ता नॉमिनीच्या नावे केली जाते. 
  • मात्र मृत्युपत्र केले असून नॉमिनीच्या नावे काही मालमत्ता असल्यास आणि मृत व्यक्तीचा वारसदार हयात असेल तर नॉमिनीची मालमत्ता सोडून इतर संपत्ती वारस दाराकडे जाते.

कायद्याने नॉमिनी कडील मालमत्तेचा हक्क वारस दाराकडे राहतो. 

  • म्हणजेच नॉमिनी ही केवळ मालमत्तेची विश्वस्थ असते , मालक नाही.
  • न्यायालयाच्या आदेशावरून, मृत्युपत्रातील वारसाचे नाव हे मालमत्तेचे खऱ्या अर्थाने वारसदार असतात असे निश्चित केले आहे.यावर नामांकन ही प्रक्रिया म्हणजे वारसाहक्क नाही असे नमूद केले आहे.  

निष्कर्ष : 

  • नामांकन ही एक तरतूद आहे,आपल्या पैशाच्या सुरक्षिततेसाठी !
  • आपल्या पश्चात,आपल्या कुटुंबियांच्या आयुष्यात, आर्थिक क्लिष्ट अशा बाबींमुळे समस्या निर्माण होऊ नये म्हणून केलेली एक उत्तम सुविधा आहे, सर्व लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचावी आणि जनमानसात जागरूकता निर्माण व्हावी हे गरजेचे आहे.    
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.