वॉरेन बफेट कोट
warren buffet quotes
Reading Time: 4 minutes

Warren Buffett Quote :   वॉरेन बफेट यांची जीवनाबद्दलची 20 उत्तम विधाने 

 • गुंतवणुकीच्या क्षेत्रात Business Magnet असं ज्यांना म्हटलं जातं ते म्हणजे ‘वॉरेन बफेट’ ! एक यशस्वी व्यावसायिक, गुंतवणूकदार आणि परोपकारी व्यक्तिमत्व अशी त्यांची ख्याती आहे. ते सध्या बर्कशायर हॅथवेचे अध्यक्ष आणि सीईओ म्हणून कार्यरत आहेत. जानेवारी 2022 पर्यंत त्याची एकूण संपत्ती $109.5 अब्ज पेक्षा जास्त आहे ज्यामुळे ते जगातील नववे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. बफेट यांची आजची संपत्ती किती आहे हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. 
 • खरं पाहिलं तर त्यांचं ज्ञान आणि शहाणपण हे पैशांपेक्षाही अमूल्य आणि अतुलनीय आहे. अशा थोर व्यक्तीच्या युगात आपण राहतोय यासाठी आपण स्वतःला खरंच भाग्यवान समजायला हवं. 
 • वॉरेन बफेट यांच्याकडे गुंतवणुकीचे आणि जीवन जगण्याचे अगदी साधे-साधे नियम आहेत जे सर्वांना माहिती आहेत परंतु आपण सर्वजण आपल्या वास्तविक जीवनात ते नियम लागू करू शकत नाही ही मोठी समस्या आहे. आज या लेखामध्ये आपण वॉरेन बफेट यांची  जीवनाबद्दलची काही अद्भूत विधाने नीट समजून घेण्याचा प्रयत्न करू.

 1. जेव्हा इतर लोक लोभी असतात तेव्हा आपण फक्त भयभीत होण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा इतर लोक घाबरतात तेव्हाच लोभी होण्याचा प्रयत्न करतो. 

अर्थ  नेहमी गर्दीसोबत धावू नका. स्वतः सारासार विचार करण्यात खरं शहाणपण आहे.

 

हेही वाचा – Warren Buffet Success Story : ‘असे’ बनले वॉरेन बफेट यशस्वी उद्योजक…

 1. प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी 20 वर्षे आणि ती नष्ट करण्यासाठी केवळ पाच मिनिटे लागतात. जर तुम्ही याबद्दल विचार केलात तर तुम्ही गोष्टी वेगळ्या पद्धतीने हाताळाल.

 अर्थ  तुमची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे. कृती करण्यापूर्वी विचार करा.

 1. किंमत ती जी तुम्ही देता आणि मूल्य ते जे तुम्हाला मिळतं.

अर्थ  किंमत आणि मूल्य भिन्न आहेत. एक गुंतवणूकदार म्हणून, तुमचे काम या दोघांमध्ये सांगड घालण्याचे आहे.

 1. आज कोणीतरी सावलीत बसले आहे कारण कोणीतरी खूप वर्षांपूर्वी झाड लावले होते.

अर्थ  श्रमाचे फळ भोगायला वेळ आणि संयम लागतो. जेव्हा तुम्ही भविष्यासाठी योजना आखता तेव्हा चांगल्या गोष्टी घडू शकतात.

 1. तुमचे नायक कोण आहेत ते मला सांगा आणि मी तुम्हाला सांगेन की तुम्ही कोण बनणार आहात

अर्थ  आपल्यावर ज्यांचा किंवा ज्यांच्या विचारांचा प्रभाव असतो आपण नकळत तसे घडत असतो. 

 1. तुम्ही काय करत आहात हे माहीत नसल्यामुळे धोका निर्माण होतो.

 अर्थ   माहिती मिळवा, स्वतःला शिक्षित करा. आपण काय करू इच्छिता याबद्दल अधिक जाणून घेऊन निदान काही प्रमाणात का होईना उद्भवलेली जोखीम कमी करू शकता.

 1. जेव्हा समुद्राची ओहोटी असते तेव्हाच तुम्हाला कळेल की कोण समुद्रात नग्न पोहत आहे.

 अर्थ  जेव्हा वेळ चांगली असते, तेव्हा प्रत्येकजण विजेता असल्याचे दिसते. जेव्हा काळ बदलतो तेव्हाच खरोखर कोण पुढे आहे हे सिद्ध होते.

 1. वाजवी कंपनीपेक्षा वाजवी किमतीत अप्रतिम कंपनी विकत घेणे खूप महत्वाचे आहे.

अर्थ –  एखादी गोष्ट कमी किमतीची पण जर खरोखरच चांगली असेल त्यात गुंतवणूक करणं तुम्हाला नक्कीच फायदा देऊ शकतं. 

 1. तुमच्यापेक्षा चांगल्या लोकांसोबत संपर्क ठेवा. ज्यांचे वर्तन तुमच्यापेक्षा चांगले आहे अशा सहकाऱ्यांना निवडा, आपोआप तुम्ही सन्मार्गावर जाल.

 अर्थ  तुमच्या सभोवतालचे लोक महत्त्वाचे आहेत. स्वत:ला तुमच्यापेक्षा चांगल्या आणि हुशार लोकांसह घेरून टाका. तुम्हाला तुमचं आश्चर्य वाटेल इतकी प्रगती तुम्ही कराल.

हेही वाचा – Shark Tank India : जाणून घ्या लोकप्रिय शो ‘शार्क टँक इंडिया’बद्दल ……

 1. ध्यासाशिवाय आपल्याकडे ऊर्जा नाही आणि ही ऊर्जा नसेल तर समजून जा आपल्याकडे काहीही नाही.

अर्थ  कोणत्याही गोष्टीत यश मिळवण्यासाठी तुम्हाला उर्जेची गरज असते जी तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे नेईल.

जर तुम्ही असे काही करत असाल ज्याची तुम्हाला आवड नाही तर विश्वास ठेवा, तुम्ही फक्त तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवत आहात.

 1. सर्वात महत्वाची गुंतवणूक ही तुम्ही स्वतःमध्ये करू शकता.

अर्थ  तुम्ही जे काही कराल, त्यात अधिक चांगले पारंगत व्हा जेणेकरुन तुम्ही अधिक पैसे मिळवू शकाल आणि तुमचे उत्पन्न वाढवू शकाल.

 1. प्रतिभा किंवा प्रयत्न कितीही मोठे असले तरी काही गोष्टींना वेळ लागतोच. नऊ स्त्रिया गरोदर राहून एका महिन्यात मूल होऊ देऊ शकत नाही.

अर्थ – मोकळा श्वास घ्या, धीर धरायला शिका, चांगल्या गोष्टी घडण्यासाठी वेळ लागतोच. 

 1. प्रामाणिकपणा ही खूप महागडी भेट आहे, स्वस्त लोकांकडून त्याची अपेक्षा करू नका.

अर्थ  अप्रामाणिक लोकांपासून चार पावले लांब राहणं केव्हाही चांगलं. 

 1. जर तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या पैशांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. 

अर्थ  जवळ असलेला पैसा योग्य त्याच कामांसाठी खर्च करा. मनात आलं म्हणून पैसा कसाही खर्च करणं टाळा. 

 1. मी 7-फूट पट्ट्यांवरून उडी मारण्याचा विचार करत नाही, मी सुमारे 1-फूट बार शोधतो ज्यावर मी पाऊल टाकू शकतो.

अर्थ  स्वतःची कुवत लक्षात घेऊन एक – एक गोष्ट मार्गी लावा. सगळंच एकदम करायला घ्याल तर नक्की गोंधळून जाल. 

 1. लोभाच्या नावाखाली आपल्याला जे आवडते ते करणे हे आपल्या जीवनाचे अत्यंत खराब व्यवस्थापन आहे.

अर्थ  तुमची आवड जाणून घ्या आणि त्यात काम करा. नावडत्या गोष्टींमध्ये मेहनत करून तुम्ही इच्छित यश मिळवू शकत नाही.  

 1. माझ्यावर किती लोक प्रेम करतात यावरून मी यशाचे मोजमाप करतो.

अर्थ  आयुष्यात माणसं जोडून ठेवा कारण तुमच्याकडे असलेली ती जिवंत संपत्ती आहे. 

 1. सवयीच्या साखळ्या खूप हलक्या असतात, जोपर्यंत त्या तोडल्या जाऊ शकत नाहीत. 

अर्थ  आयुष्यात चांगल्या सवयी लावून घ्या. वाईट सवयींपासून स्वतःला लांब ठेवा.      

हेही वाचा – Success Story of Quick Heal : वाचा एक रिपेअरमन कसा बनला Quick Healचा CEO……

 1. तुम्ही वाईट व्यक्तीशी चांगला व्यवहार करू शकत नाही.

अर्थ  चांगल्या गोष्टी घडण्यासाठी चांगल्या व्यक्तीही संपर्कात येणं आवश्यक आहे. 

 1. मी माझ्या मुलांना पुरेसे देण्यावर विश्वास ठेवतो जेणेकरून ते काहीही करू शकतील, परंतु इतके नाही की ते काहीही करू शकत नाहीत

अर्थ  पुढच्या पिढीसाठी काही करायचं असेल तर केवळ शिक्षण देणं आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी समर्थ बनवणं इतकंच करा. त्यांच्यासाठी आधीच पैसाअडका साठवून ठेऊ नका नाहीतर त्यांच्यातील स्वतःहून काही करण्याची किंवा काही बनण्याची आशाच संपून जाईल. 

वॉरेन बफेट यांचे जीवनाबद्दलचे हे काही कोट्स (विधाने) नक्कीच मार्गदर्शन करणारे आहेत. त्यांना आलेल्या विविध अनुभवातून त्यांनी नवीन पिढीसाठी दिलेली ही वैचारिक देणगी आहे. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…