Types of Term Insurance
भविष्यात परिवाराच्या आर्थिक सुरक्षिततेचा विचार करता विमा संरक्षण असणे महत्वाचे आहे. म्हणून मुदत विमा योजना खरेदी करण्यास ग्राहक पसंती देत आहेत. मुदत विमा योजनेमध्ये पॉलिसीधारकाला प्रीमियम भरून विमा कंपनीद्वारे पॉलिसी कालावधीपर्यंत लाईफ कव्हर मिळते. पॉलिसी कालावधीत पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला विम्याची रक्कम मिळते.
परंतु मुदत विमा योजना खरेदी करताना मुदत विमा व मुदत विमा योजनाचे विविध प्रकार समजून घेणे गरजेचे आहे. कारण सर्व पर्यायांची माहिती घेऊन आपल्या सोयीनुसार मुदत विमा योजना खरेदी करणे योग्य ठरते.
हेही वाचा – Term Insurance : टर्म इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी ‘ही’ घ्या काळजी
मुदत विमा योजनेचे विविध प्रकार :
१) लेव्हल टर्म इन्शुरन्स – भारतातील बहुतेक सर्वच विमा कंपन्यांद्वारे ऑफर केलेला हा प्रकार आहे. लेव्हल टर्म इन्शुरन्स हा टर्म इन्शुरन्सचा सर्वात सामान्य व सोप्पा प्रकार म्हणून ओळखला जातो. या प्रकारामध्ये पॉलिसीधारकाने निश्चित केलेली विम्याची रक्कम संपूर्ण कालावधीसाठी सारखीच राहते व पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर विम्याची रक्कम नॉमिनीला दिली जाते. पॉलिसीधारकाचे वय लेव्हल टर्म प्लॅन खरेदी करताना जितके कमी असेल तेवढा कमी प्रीमियम असतो.
२) मुदत विमा वाढ – या प्लॅन अंतर्गत पॉलिसीधारक प्रीमियमची रक्कम सारखीच ठेवून पॉलिसी कालावधीमध्ये विमा रक्कम वाढवू शकतो. दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईचा विचार करता हा पर्याय निवडला जातो. अर्थातच या पर्यायांमध्ये प्रीमियम हा लेव्हल टर्म मधील प्रीमियम प्लॅन पेक्षा थोडा जास्त असू शकतो.
३) टर्म इन्शुरन्स कमी करणे- मुदत विमा वाढवणे या पर्यायाच्या उलट टर्म इन्शुरन्स कमी करणे हा पर्याय आहे. यामध्ये दरवर्षी विम्याची रक्कम कमी होत जाते पॉलिसी धारकाचे काही आर्थिक दायित्व असेल गृह कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज फेडणे असेल तर या प्रकाराचा टर्म इन्शुरन्स त्यांच्यासाठी उपयुक्त आहे.
४)प्रीमियमचा परतावा (TROP) – या प्लॅनमध्ये पॉलिसी च्या कालावधीत कोणताही दावा केला नसेल तर विमाधारकाला प्रीमियमची रक्कम परत मिळते. पॉलिसी मुदत संपल्यानंतर ग्राहकांनी कोणतेही दावे केले नसल्यास पॉलिसीच्या मॅच्युरिटी तारखेपर्यंत भरलेली प्रीमियमची रक्कम परत मिळते. हा टर्म इन्शुरन्सचा एक लोकप्रिय प्रकार आहे.
५) परिवर्तनीय मुदत योजना – परिवर्तनीय मुदत योजनेमध्ये भविष्यात पॉलिसीधारकास पॉलिसी दुसऱ्या प्रकारच्या विमा योजनेत रूपांतरित करण्याचा पर्याय दिलेला असतो. जसे की एंडॉवमेंट योजना व संपूर्ण जीवन योजना. पॉलिसीेच्या काही वर्षानंतर पॉलिसीधारकाचे आर्थिक प्राधान्य बदलण्याची शक्यता असते.त्यावेळी हा पर्याय उपयुक्त ठरतो.
उदाहरणार्थ: पॉलिसी धारकाने खरेदी केलेल्या मुदत विमा योजना काही वर्षानंतर एंडॉवमेंट प्लॅन किंवा संपूर्ण जीवन विमा योजना इत्यादी मध्ये रुपांतरीत करता येते.
६) रायडर्सह टर्म प्लॅन – या प्रकारांमध्ये अतिरिक्त संरक्षण देणारे रायडर्सचे पर्याय उपलब्ध असतात. जे टर्म प्लॅन सह नाममात्र किंमत भरून खरेदी केले जातात. अपघाती मृत्यू लाभ, अपंगत्व, गंभीर आजार इत्यादी प्रकारचे रायडर्स उपलब्ध आहेत.
हेही वाचा – Term Vs. Personal Accident Insurance : मुदत विमा व वैयक्तिक अपघात विमा यांमधील फरक काय?
मुदत विमा योजना खरेदी करताना तुम्हाला तुमचे आर्थिक दायित्व, आर्थिक उद्दिष्टे, बजेट यांचा विचार करने गरजेचे आहे.
वर दिलेले विविध मुदत विमा योजनेचे पर्याय तुम्हाला तुमच्या परिवाराच्या सुरक्षित भविष्यासाठी योग्य मुदत विमा योजना निवडण्यास नक्कीच उपयुक्त ठरतील.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies