Reading Time: 3 minutes

दररोजच्या आयुष्यात  पैसे व्यर्थ खर्च होत असताना लॉकडाउनच्या कालावधीत मात्र सर्वच जण जागे झाले. कसे जगावे, रोजची जीवनशैली कशी असावी आणि पैसे वाचवून आपण त्यांचे व्यवस्थापन कसे करायला हवे हे सर्वच याकाळात शिकायला मिळाले. या कालावधीत अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्याने कसे जगावे हा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित राहिला होता. 

 

त्यानंतर पैशाचे बजेट करून आपत्कालीन निधी उभारायला हवा हे  सर्वानीच गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली. या महामारीच्या काळात पैशाचा वापर कसा करावा याचा अनेकांना धडा मिळाला. भविष्यासाठी अशा अनेक धड्यांमधून मिळालेली शिकवण  प्रत्यक्षात आणणे गरजेची असल्याची जाणीव  सर्वानाच झाली. भविष्यात तुमच्याकडून या चुका टाळल्या जाव्यात म्हणून आर्थिक नियोजनाचे धडे खालील लेखात देण्यात आले आहेत. 

 

१) आपण पैसे वाचवू शकतो 

 

  • आपण विचार करतो त्यापेक्षा खूप जास्त पैसे वाचवू शकतो ही साथीच्या काळात सर्वाना शिकवण मिळाली. बाहेर खाणे, खरेदी करणे, पार्टी करणे, चित्रपटगृहात किंवा कार्यक्रमांना जाणे गरजेचेच नसते हे लॉकडाउनच्या काळात समजले. जेव्हा परत सर्व पूर्वपदावर आले तेव्हा हे न करता पण सर्व काही व्यवस्थित चालू होते. 

 

  • आता सर्वानाच हे लक्षात आले की दर आठवड्याला खरेदीला जाणे गरजेचे नाही. साथीच्या रोगाच्या काळात सर्वजण घरी स्वयंपाक करून जेवण करत होते. बाहेर खायला न जाता आपण किती रुपयांची बचत करू शकतो हे समजले आहे. आता हे लक्षात ठेवायला पाहिजे की, इथून पुढे दर आठवड्याला शॉपिंग किंवा चित्रपटाला न जाता तुम्ही पैसे वाचवू शकता. 

 

२. आपत्कालीन निधी नसणे 

 

  • कोरोना साथीच्या काळात बचतीचे महत्व सर्वानाच समजले. या काळात तुम्ही आपत्कालीन निधी ठेवला असेल तर तो एक उत्तम आर्थिक आधार बनला. खरेदी करणे आणि चित्रपटावर दर आठवड्याला खर्च करण्यापेक्षा आपत्कालीन निधीमध्ये पैसे ठेवले तर अडचणीच्या काळात ते उपयोगीचे  ठरू शकतात. 

 

  • अचानक तुमची नोकरी गेली तर हाच आपत्कालीन निधी अडचणीत आधार बनू शकतो. दुर्दैवाने तुम्हाला नोकरीवरून काढून टाकले तर या निधीमुळे नोकरी मिळेपर्यंत तग धरून राहता येते. आपत्कालीन निधी ५ ते ६ महिन्यांसाठी बचत करून ठेवा, जेणेकरून अडचणीच्या काळात तो तुमच्या मदतीला येऊ शकेल.  

 

३. तुमचा स्वतःचा आरोग्य विमा काढून ठेवा 

 

  • आपल्यापैकी बरेच जण आरोग्य विमा  काढून ठेवत नाहीत कारण ते काम करत असलेल्या कंपनीने त्यांचा विमा काढून दिलेला असतो. कोरोनाच्या काळात ज्या लोकांनी नोकऱ्या गमावल्या त्या लोकांनी आरोग्य विमा गमावला होता. 

 

  • त्यामुळे अतिरिक्त आरोग्य विमा काढून ठेवणे शहाणपणाचे ठरते. अशावेळेस घरातील कोणाला रुग्णालयात भरती करावे लागले तर खिशातून पैसे जाऊ शकतात. त्यामुळे स्वतःची आणि कुटुंबीयांचा आरोग्य विमा काढून ठेवणे शहाणपणाचे ठरते. 

 

नक्की वाचा : Corona Pandemic: कोरोना महामारीने दिली या ५ आर्थिक गोष्टींची शिकवण

 

४. तुम्ही पैशांची विविध ठिकाणी गुंतवणूक करा. 

 

  • तुम्ही विविध ठिकाणी गुंतवणूक केली तर तुम्ही कठीण काळातच टिकत नाही तर प्रत्यक्षात परिस्थितीचा पण तुम्हाला फायदा मिळू शकतो. विविध ठिकाणी गुंतवणूक असल्यामुळे तुम्ही कायमच चांगली कामगिरी करत असता. इटी मनीने दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी सोन्याच्या किमती वाढण्याच्या आधी इक्विटीचा भाव वाढत होता.  

 

  • तुम्हाला विविध ठिकाणी गुंतवणूक करायची असल्यास आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या. जास्त व्याज नसलेले कर्ज घेणे टाळा आणि पैशांची सुरक्षित गुंतवणूक करा. 

 

५. बजेटमध्येच महिना काढणे 

 

  • बजेटमध्ये महिनाभर पैसे खर्च करण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे पैसे बचत होऊन खर्चावर पण नियंत्रण राहते. पैशाच्या बाबतीत ढील दिली तर चांगला पगार होऊन पण हातात काहीच राहत नाही. बजेटमध्ये जगणे कोरोनाच्या काळात सर्वानाच समजलेले आहे. तुमच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करून इच्छाना मुरड घातली की पैशांची बचत होते. 

 

  • नोकरी जाणे आणि पगारात झालेल्या कपातीमुळे अनेकांना बजेटमध्ये जगावे लागले. बजेटमध्ये जर तुम्ही जगत असाल तर तुम्हाला आपत्कालीन निधीत पैसे वाचवून बाजूला ठेवण्यास मदत मिळते. 

 

६. जास्त व्याजाचे कर्ज घेणे टाळा 

 

तुमच्या हातात नियमित पगार येत असताना पण क्रेडिट कार्ड किंवा वैयक्तिक कर्ज घेण्याचे प्रकार टाळायला हवेत. जर तुम्ही कर्ज घेतले असेल आणि नोकरी गेली तर त्याची परतफेड करणे अवघड होऊन बसते. तुम्ही जर वेळेवर पैसे जमा केले नाही तर त्या कर्जावर दिवसेंदिवस व्याजदर वाढत जातो. 

 

 जास्त कर्ज घेतलेले असताना त्यातून बाहेर पडणे अवघड होऊन बसते. त्यावर वाढत असलेल्या व्याजदरामुळे रकमेत वाढ होत जाते. त्यामुळे जास्त कर्जापासून लांब राहावे. पुढील महिन्याच्या पगारातून जेवढे कर्ज देऊ शकाल तेवढाच क्रेडिट कार्डचा वापर करायला हवा. 

 

नक्की वाचा : Emergency Fund: आपत्कालीन निधी किती असावा?

 

थोडक्यात सांगायचे म्हणजे, पैशांची बचत करून आपत्कालीन निधीची व्यवस्था करून ठेवावी, त्यामुळे अडचणीच्या वेळेत पैशांची चणचण भासत नाही.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…