insurance agent
insurance agent
Reading Time: 3 minutes

Need of Insurance Agent

“आरोग्य विमा उतरवा” असं आपले विमा प्रतिनिधी आपल्याला नेहमीच म्हणत असतात. काही लोक त्यांना नेहमीच टाळत असतात आणि  ज्या लोकांना विम्याची गरज पटलेली असते ते स्वतःहून विमा प्रतिनिधीला बोलावून सध्याच्या गरजेनुसार विमा उतरवत असतात. आजकाल ऑनलाईन विमा खरेदी सुसह्य झाल्याने तो पर्याय सुद्धा कित्येक लोक वापरत आहेत. एक काळ असा होता जेव्हा विमा योजनांची माहिती मिळवण्यासाठी विमा प्रतिनिधींवर अवलंबून रहावं लागायचं. पण, आजकाल प्रत्येक विमा योजनेची माहिती ही गुगलवर, ‘पॉलिसी बाजार’ सारख्या वेबसाईटवर उपलब्ध असते. तरीही, आरोग्य विमा उतरवण्यासाठी अधिकृत प्रतिनिधींची मदत घेतली पाहिजे असं अर्थतज्ज्ञ का सांगतात? ते जाणून घेऊयात. 

हेही वाचा – Health Insurance : आरोग्यविमा रोकड विरहित सेवा एक वरदान

 

१. अभ्यासपूर्ण सल्ला –  आपल्या ग्राहकांना कोणत्याही एका विमा योजनेची  बाजू न घेता सर्व योजनांची पूर्ण माहिती देणं हे  विमा प्रतिनिधींचं काम असतं. मागील काही वर्षात आरोग्य विम्याची गरज आणि वापर हा कित्येक पटीने वाढलेला आपण बघत आहोत. पण, आजही बराच मोठा वर्ग हा विना आरोग्य विमा समाजात वावरत असल्याचं नुकतंच एका सर्वेक्षणात समोर आलं आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी विमा प्रतिनिधींनी आपल्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कुटुंबाच्या राहणीमान, जगण्याच्या पद्धतीनुसार योग्य आरोग्य विमा योजना सुचवणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण, कोणतीही ऑनलाईन पद्धत ही विमा उतरवण्यासाठी उपयुक्त ठरते. पण, कोणती आरोग्य विमा योजना तुमच्या परिवारासाठी योग्य आहे हे मात्र विमा प्रतिनधी तुमच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून, तुमच्या परिवारात आधी झालेल्या आरोग्य संबंधित तक्रारींचा अभ्यास करूनच सुचवू शकतो.

२. सोप्या भाषेत माहिती मिळते – आरोग्य विमा काढण्यासाठी जेव्हा एक सामान्य नागरिक स्वतः चौकशी करतो, तेव्हा त्याला बऱ्याच किचकट शब्दांना सामोरं जावं लागतं. विमा प्रतिनिधी ही अवघड शब्दातील माहिती सोपी करून आपल्या ग्राहकांना सांगू शकतो. त्यासाठी विमा प्रतिनिधींनी वेळोवेळी विमा कंपनीच्या योजनेत होणारे बदल जाणून घेतले पाहिजेत आणि त्यानुसार आपल्या ग्राहकांना योग्य सल्ला दिला पाहिजे. 

३. विविध पर्यायांची माहिती मिळते:

विमा प्रतिनिधींनी विशेषतः आरोग्य विमा विकतांना ग्राहकांना दोन-तीन वेगवेगळ्या कंपन्यांचे पर्याय सुचवले पाहिजेत. कोणत्या कंपनीचा विमा उतरवावा याचा अंतिम निर्णय ग्राहकाचा असला तरीही विमा प्रतिनिधी हा या पूर्ण प्रक्रियेत महत्वपूर्ण काम करत असतो. 

 

हेही वाचा – Insurance policy : ‘या’ आहेत सर्वात महत्वाच्या विमा पॉलिसी

 

४. विमा प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पाडली जाते – आरोग्य विमा उतरवतांना तुमच्या आजवरच्या आजारांची महिती, जन्माचं प्रमाणपत्र, फिटनेस प्रमाणपत्र सारखी माहिती आरोग्य विमा कंपनीच्या वेबसाईटवर अपलोड करण्याची गरज पडू शकते. नवीन ग्राहक जे आजच्या ऑनलाईन पद्धतींबद्दल अनभिज्ञ आहेत त्यांना विमा प्रतिनधी आरोग्य विमा उतरवण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत करू शकतो. 

५. विमा कंपनीला माहिती परिपूर्ण पद्धतीने दाखल केली जाते – आरोग्य विमा कंपन्यांच्या सर्वेक्षणात हे देखील समोर आलं आहे की, कित्येक ग्राहक हे वेबसाईटवर चौकशी करतात. पण, पूर्ण माहिती न मिळाल्याने ते आरोग्य विमा काढू शकत नाहीत. अर्धवट राहिलेल्या या चौकशीवर जेव्हा वेळेत विमा प्रतिनिधी काम करतात तेव्हाच ग्राहक कोणत्यातरी एका निर्णयावर पोहोचतात. 

६. ‘क्लेम’ सहजतेने दाखल करता येतो – आरोग्य विमा योजनांमध्ये ‘क्लेम’ करण्यासाठी देखील विमा प्रतिनिधींची गरज भासत असते. आपल्या घरात जेव्हा एखादी आपात्कालीन परिस्थिती उदभवते तेव्हा आपल्याकडे आरोग्य विमा कंपनीला संपर्क साधण्याचा वेळ नसतो, मनस्थिती नसते. विमा प्रतिनिधींनी अशा वेळी ‘पेपरलेस क्लेम’ सारख्या योजनांचा वापर करून आपल्या ग्राहकांना त्वरित ‘क्लेम’चे फायदे मिळतील हे बघणं अपेक्षित असतं.

७. विमा कंपनी व ग्राहक यांमधील उपयुक्त दुवा – 

विमा प्रतिनिधी हे ज्याप्रमाणे ग्राहकांसाठी उपयुक्त असतात. तसेच ते आरोग्य विमा कंपनीसाठी सुद्धा तितकेच उपयुक्त असतात. ग्राहकांचा आवाज कंपनी पर्यंत पोहोचवण्याचं मोलाचं काम हे विमा प्रतिनिधी करत असतात. आपल्या विमा योजनांमध्ये कोणते बदल करणं आवश्यक आहे. याची माहिती प्रत्येक कंपनी त्यांच्या विमा प्रतिनिधींना नेहमीच विचारत असते. 

 

हेही वाचा – Health Insurance: कोरोना व्यतिरिक्त आरोग्य विमा खरेदी करण्याची ६ महत्वाची कारणे

 

आरोग्य विमा प्रतिनिधी हे विमा विक्री करून आपल्या कंपनीला सेवा पुरवत असतात, आणि त्याचवेळी हे लोक एक आरोग्यदायी, सशक्त समाज निर्माण होण्यासाठी सुद्धा आपला हातभार लावत असतात. विमा प्रतिनिधींना आवश्यक असलेली खरी माहिती देणं आणि स्वतःभोवती आणि कुटुंबा भोवती ‘आरोग्य विमा कवच’ तयार करणे हे प्रत्येकाने आपलं कर्तव्य समजलं पाहिजे.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…