Corona Pandemic
Reading Time: 3 minutes

Corona Pandemic

कोरोना नावाच्या अभूतपूर्व महामारीने (Corona Pandemic) जगण्याचे संदर्भच बदलून गेले आहेत. अजूनही धोका टळलेला नाही. या महामारीमध्ये जिवीतहानी, वित्तहानी तर होतच आहे. या अभूतपूर्व संकटातून काही गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत, त्या गोष्टी स्वीकारून त्यानुसार नियोजन करणे हेच सध्याच्या परिस्थितीत हितावह आहे. आजच्या लेखात आपण कोरोनाने शिकवलेल्या काही महत्वाच्या गोष्टींचा विचार करूया. 

हे नक्की वाचा: तुमचं आर्थिक बजेट कोलमडतं? ही आहेत त्याची ६ कारणे

Corona Pandemic: कोरोना महामारीने दिली या ५ आर्थिक गोष्टींची शिकवण

१. आरोग्य विमा पॉलिसी खरंच उपयोगी आहे का? 

  • आरोग्य पॉलिसी नक्कीच आवश्यक आहे. परंतु, तुमची पॉलिसी तुमच्या हॉस्पिटलचा संपूर्ण खर्च तुम्हाला देत नाही. हॉस्पिटलच्या बिलाचा संपूर्ण खर्च देणारी कोणतीही आरोग्य विमा पॉलिसी अस्तित्वात नाही. 
  • आपल्याकडे किती कव्हरेज आहे हे महत्त्वाचे नाही, तर आपल्या विमा पॉलिसीमध्ये कोणते खर्च अंतर्भूत केलेले आहेत, हे जास्त महत्वाचे आहे. 
  • असे काही खर्च आहेत जे आरोग्य विमा पॉलिसीमध्ये अंतर्भूत केले जात नाहीत. त्यामुळे आपल्या खिशातून हॉस्पिटलच्या बिलाच्या साधारणतः १०% ते ३०% रक्कम भरावी लागतेच. उदा जर तुमचे हॉस्पिटलचे बिल १० लाख रुपये आलं, तर १ लाख ते ३ लाखांपर्यंतची रक्कम तुम्हाला तुमच्या खिशातून द्यावी लागणार. 
  • अशावेळी ही उर्वरित रक्कम भरायला आपल्या मदतीला येतो तो आपला आणीबाणी निधी (emergency fund). 
  • “आरोग्य विमा पॉलिसी आहे म्हणून मला आरोग्य खर्चाचा विचार करायची गरज नाही”, या मानसिकेतून बाहेर या. हॉस्पिटलायझेशनच्या खर्चासाठी आरोग्य विम्यावर १००% अवलंबून राहू नका.

२. रोख रकमेची आवश्यकता 

  • सध्याचं युग हे डिजिटल युग आहे. आर्थिक व्यवहारांसाठी आपण सर्वजण ऑनलाईन मनी ट्रान्सफर किंवा यूपीआयला प्राधान्य देतो. परंतु, हास्पिटलमध्ये दाखल होताना मात्र काही प्रमाणात रोख रक्कम जवळ असणे आवश्यक आहे.  
  • कोरोना रुग्ण बाहेर जाऊन पैसे काढू शकत नाहीत किंवा त्यांना कोणी भेटूही शकत नाही. ऑनलाईन पेमेंटसाठी इंटरनेट सुविधा आवश्यक असते, ती नसेल तर मात्र रोख रकमेला पर्याय नाही. 
  • अगदी रिक्षा, टॅक्सी, फळवाले, २५/३० रुपयांसाठी युपीआयने पैसे स्वीकारण्यास तयार होत नाहीत. कित्येकदा डबेवालेही रोख रकमेचीच मागणी करतात. त्यामुळे कॅशलेस आरोग्य विमा पॉलिसी आहे, Gpay, Paytm, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड हे सर्व आहे म्हणून गाफील राहू नका. थोड्या प्रमाणात का होईना रोख रक्कम जवळ बाळगा. 

महत्वाचा लेख: क्रेडिट कार्ड वि. डेबिट कार्ड, कोणत्या कार्डचा उपयोग कधी कराल?

३. आपात्कालीन निधी 

  • आपत्कालीन निधीची आवश्यकता आत्तापर्यत अनेक लेखांमधून तुम्ही वाचली असेल. पण हा निधी कसा आणि कुठे ठेवायचा हे जास्त महत्वाचे आहे. 
  • तुम्ही यासाठी कोणताही पर्याय निवडू शकता, पण लक्षात ठेवा तुम्हाला तातडीची गरज असताना हा निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. 
  • उदा. समजा तुम्ही तुमच्या आपत्कालीन निधीची तरतूद म्हणून लिक्विड फंडामध्ये रक्कम गुंतवली आणि तुम्हाला शुक्रवारी तातडीने पैशांची गरज भासली आणि तुम्ही रिडम्प्शन रिक्वेस्ट केली तरी तुम्हाला ती रक्कम मिळायला सोमवारचा दिवस उजाडू शकतो. कारण शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे तुमची रिक्वेस्ट सोमवारी प्रोसेस होऊन तुम्हाला दोन दिवसांनी पैसे मिळतील. 
  • त्यामुळे आपत्कालीन निधीची फक्त तरतूद केली म्हणजे झालं असं नाही तर, ती योग्य ठिकाणी आणि गरजेच्या वेळी मिळावी याचीही काळजी घेणं आवश्यक आहे. 

४. आपत्कालीन परिस्थितीमध्ये क्रेडिट कार्डची उपयुक्तता 

  • अचानकपणे लागणाऱ्या निधीसाठी क्रेडिट कार्डचा वापर करू शकता. यासाठी क्रेडिट कार्डची क्रेडिट लिमिट, बिलाची तारीख आणि ड्यू डेट याचा विचार करून कोणते क्रेडिट कार्ड वापरायचे याचा विचार करा. 
  • आपत्कालीन निधीची तरतूद असेल, तर तो हातात मिळेपर्यंत तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करू शकता. 

विशेष लेख: एवढ्या मोठ्या बदलाकडे दुर्लक्ष कसे करता येईल?  

५. कॅशलेस हक्क नाही तर सुविधा आहे

  • अनेकांना असं वाटतं की आरोग्य विमा आणि कॅशलेसची सुविधा हा आपला हक्क आहे. परंतु, सध्या कोविडमुळे काही रुग्णालये कॅशलेस सुविधा नाकारत आहेत. 
  • अशा परिस्थितीत हॉस्पिटलचे बिल भरून नंतर आरोग्य विमा कंपनीकडे क्लेम पाठवण्याचा पर्याय आपल्याकडे उरतो.  
  • सध्या परिस्थिती सुधारत असली तरी येऊ घातलेल्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ही गोष्ट गांभीर्याने घेणं आवश्यक आहे. 
  • मागच्या दोन्ही लाटांमध्ये आपल्याकडे बेड मिळविण्यासाठीच खटाटोप करावा लागत होता. अशा परिस्थितीत कॅशलेस सुविधा देणारे हॉस्पिटल निवडणे केवळ अशक्य. त्यामुळे आपल्या हॉस्पिटलचे बिल भरण्याची तजवीज करून ठेवणे आवश्यक आहे. क्लेम मिळेल तेव्हा मिळेल, तो किती मिळेल हे सुद्धा अनिश्चितच असते. त्यामुळे आर्थिक नियोजनाला कोणताही पर्याय नाही. 

कोरोना हे संकट आहे. ते जसं आलं तसंच जाणारही आहे. त्यामुळे या परिस्थितीमध्येही संयम आणि नियोजनबद्ध राहणीमान आपल्याला तारून नेणार आहे. अजूनही वेळ गेलेली नाही  आर्थिक नियोजनाचे महत्व ओळखा. सकारात्मक राहा.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Corona Pandemic in Marathi Mahiti, Corona Pandemic in Marathi, Corona Pandemic Marathi, Corona Pandemic and financial Marathi Mahiti 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.