Reading Time: 2 minutes
  • सरकारी उद्यागांचे खासगीकरण आणि सरकारी उद्योगांचा पांढरा हत्ती होणे, हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. मात्र गेल्या 10 वर्षात या उद्योगांबाबत वेगळे आणि चांगले असे काही झाले आहे, याची दखल घेतली पाहिजे.
  • शेअर बाजारात नोंदणी असलेल्या पाच सार्वजनिक उद्योगांनी याकाळात 5 ते 15 पट परतावा दिला असून असे इतर 17 उद्योग ‘मल्टीबॅगर’ ठरले आहेत.
  • यात सर्वात आघाडीवर आहे, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) जिने 16 पट तर आयटीआय कंपनीने 15.5 पट परतावा दिला आहे. इतर कंपन्यांमध्ये एनबीसीसी (7.9 पट), एसजेव्हीएन (5.8 पट) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन (5.1 पट) चा समावेश आहे. 
  • पाच ते १५ पट परतावा देणाऱ्या सरकारी कंपन्या 
कंपनी  16 मे 2014 ची किंमत  12 एप्रिल 2024 चे किंमत  पटीत वाढ  टक्केवारीत वाढ 
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड 14.36 233 16 1,488
आयटीआय 17.20 262 16 1,449
एनबीसीसी 17.41 133 8 689
एसजेव्हीएन 22.60 130 6 478
हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन 89.89 478 5 410

 

  • याशिवाय 17 सरकारी कंपन्या गेल्या दहा वर्षात ‘मल्टीबॅगर’ ठरल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे – 

 

गेल्या 10 वर्षातील ‘मल्टीबॅगर’ 17 सरकारी कंपन्या 

कंपनी  १६ मे २०१४ ची किंमत  १२ एप्रिल २०२४ ची किंमत  परतावा (टक्केवारीत) 
एनएचपीसी  20 92 346
हिंदुस्थान कॉपर 82 362 318
पॉवर ग्रीड  67 275 318
आरईसी  109 439 304
नाल्को 45 178 304
पीएफसी  103 403 291
एमआरपीएल 59 222 282
इंडियन बँक  146  526 262
आरसीएफएल  41 144 260
एनटीपीसी 110 361 230
बीपीसीएल  184 601 218
एसबीआय 217 766 217
आयओसी  54 170 210
एनएलसी 76 235 203
कॉनकॉर 77 946 168
गेल 77 201 165 
ऑयल इंडिया  282 611 124

 

  • याशिवाय सेल, एमएमटीसी, कॅनरा बँक, इंजिनियर्स इंडिया, भेल आणि बँक ऑफ महाराष्ट्र या कंपन्यानी 93 ते 60 टक्के परतावा दिला आहे. 
  • सध्या निवडणुकीमुळे शेअर बाजारातील चढउतार वाढले आहेत. पण पुन्हा मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर येणार, असे अंदाज असल्याने सरकारी कंपन्यांचे भाव वाढतच चालले आहेत. यापुढील पडझडीत या कंपन्यांचे भाव खाली आल्यास त्यांची खरेदी केली तर गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकतो.

लेखक – यमाजी मालकर

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मृत्युपत्र – मृत्युपत्र म्हणजे काय आणि ते कसे तयार करायचे?

Reading Time: 4 minutesमृत्युपत्र हा एक महत्वाचा पण बहुतांश वेळा गांभीर्याने घेतला न जाणारा विषय आहे. मृत्युपत्र हे बंधन अथवा जबाबदारी नसून तो आपला हक्क आहे. त्यामुळे या हक्काबद्दल जागरूक व्हा. मृत्युपत्र तयार केल्यामुळे तुमच्या मालमत्तेचं व कुटुंबाचं भविष्य सुरक्षित राहील. तसेच, तुमच्या कुटुंबातील सदस्यांना एकत्र बांधून ठेवण्याची ताकदही मृत्युपत्रामध्ये आहे.  

मर्यादित भागीदारी संस्था: नियम व वैशिष्ट्ये

Reading Time: 3 minutesव्यवसायाचे कर्ज व देणी वसूल करण्यासाठी भागीदाराच्या वैयक्तिक मालमत्तेवर टाच येण्याची शक्यता असते. मर्यादित भागीदारी व्यवसायामुळे हे प्रश्न सुटू शकतात. डॉक्टर्स, सनदी लेखापाल, वास्तुविशारद, वकील, तांत्रिक सल्लागार, कर सल्लागार, वित्तीय सल्लागार यांना आपल्या ज्ञानाचा आणि सहकाऱ्याच्या ज्ञानाचा उपयोग करून मर्यादित भागीदारीमुळे (LLP) आपला व्यवसाय वाढवता येऊ शकेल. अशा प्रकारे मर्यादित भागीदारी असलेली भागीदारी स्थापन करता येणे सोपे आणि कमी खर्चाचे आहे.

लाभांश (Dividend) म्हणजे काय?

Reading Time: 3 minutesकंपनीने आपल्या करोत्तर नफ्यातून (Profit after taxes)  समभागधारकांना पैशाच्या स्वरूपात दिलेली भेट म्हणजे ‘लाभांश’ (Dividend) होय. कंपनी झालेला संपूर्ण फायदा वाटून टाकत नाही तर त्यातील काही भाग भागधारकांना देते. शिल्लक रक्कम भविष्यातील विस्तार योजना किंवा अधिक व्याजदराने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरून आपली नफाक्षमता वाढवते.

प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, मर्यादित दायित्व भागीदारी (LLP) आणि भागीदारी संस्था (Partnership Firm)

Reading Time: 3 minutesस्वतःचा व्यवसाय सुरु करायचा म्हटलं तर, व्यवसायाचे अनेक पर्याय आपल्या समोर असतात. प्रत्येक प्रकारचे स्वतःचे असं वेगळं वैशिष्ट्य व फायदे तोटे आहेत. आजच्या लेखात आपण भागीदारी संस्था (Partnership Firm), मर्यादित दायित्व भागीदारी म्हणजेच लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप (LLP) आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणजे काय? त्यांची वैशिष्ट्ये, नोंदणी प्रक्रिया व कार्यपद्धतीची माहिती घेऊया.