कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) म्हणजे नोकरदार वर्गाची हक्काची जमापुंजी. दर महिन्याला नियोक्ता (employer) व कर्मचारी या दोघांमार्फतही ‘ईपीएफ’ खात्यामध्ये निश्चित केलेली रक्कम भरली जाते. कर्मचाऱ्याचे योगदान त्याच्या पगारामधून कपात केले जाते. तर नियोक्त्यामार्फत (employer) स्वतंत्रपणे ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यावर दर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत जमा केली जाते.
प्रॉव्हिडन्ट फंडचे ५ महत्वाचे फायदे
- सामान्यतः मूळ वेतनाच्या १२% कर्मचारी व १२% नियोक्त्याचे योगदान कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी निश्चित केलेले असते.
- कर्मचारी त्यांचे ईपीएफ योगदान नाकारू शकत नाहीत किंवा टाळू शकत नाहीत कारण ती रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून अगोदरच कपात केली जाते. परंतु, नियोक्त्यामार्फत रक्कम जमा केली जाते की नाही, हे कर्मचाऱ्यांना कसं समजणार?
- सध्या अनेक कंपन्यांनी महिनोंमहिने आपल्या कर्मचाऱ्यांच्या ईपीएफची रक्कम जमा केली नसल्याचे निदर्शनास आले आहे.
- आर्थिक अडचण किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे जर कंपनी कर्मचाऱ्यांच्या ‘ईपीएफ’ खात्यावर रक्कम जमा करत नसेल तर, एकप्रकारे ही कर्मचाऱ्यांची फसवणूकच आहे.
आपल्या पीएफ अकाऊंट संबंधित तक्रार कशी दाखल कराल?
नियोक्त्यामार्फत रक्कम जमा केली की नाही हे कसे समजते?
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयामार्फत कर्मचाऱ्यांसाठी ‘एसएमएस’ सुविधा देण्यात आली आहे, ज्याद्वारे नियोक्त्याने ईपीएफ खात्यावर रक्कम जमा केल्यानंतर त्यासंबंधित एसएमएस कर्मचाऱ्यांना पाठविण्यात येतो.
- २०१८ नंतर ही महत्वपूर्ण सुविधा देण्यात आली आहे. नियोक्त्याने भविष्य निर्वाह निधीची रक्कम महिन्याच्या १५ तारखेपर्यंत संबंधित खात्यावर जमा न केल्यास कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयामार्फत कर्मचाऱ्यांना त्यासंबंधित एसएमएस पाठविण्यात येतो.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयामार्फत ‘एसएमएस सुविधा’ कशी मिळवाल?
१. मोबाईल क्रमांक अपडेट करा:
- आपल्या ईपीएफ खात्याच्या UAN सोबत मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी अपडेट करा.
- काही जाणकारांच्या मते एसएमएस सुविधा सदोष आहे. त्यामध्ये काही तांत्रिक अडचणींसोबत अनेक तक्ररीही आहेत.
- या सुविधेबाबत असणारी मुख्य तक्रार म्हणजे अनियमित एसएमएस. परंतु, ईपीएफओ खात्याच्या म्हणण्यानुसार ज्यांचे पगार कमी आहेत अशा कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे व त्यांच्या खात्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे कारण सर्वसामान्यपणे ही माणसे तंत्रज्ञानाच्या बबडतीत अल्पज्ञानी असल्यामुळे त्यांना वेबसाईटवर जाऊन लॉग इन करून ऑनलाईन बॅलन्स तपासता येत नाही.
- एसएमएस सुविधेमधील दोष दूर केल्यास ज्या कर्मचाऱ्यांना ऑनलाईन बॅलन्स तपासायला जमत नाही, अशांना या सुविधेद्वारे ईपीएफ खात्यावरच्या जमा रकमेची माहिती मिळू शकेल.
पीएफ खाते ट्रान्सफार कसे कराल?
२. मिसकॉल: उमंग ॲप अथवा मिस्ड कॉल देऊनही या सुविधेचा लाभ घेता येईल. ईपीएफ खात्यावरील जमा रक्कम जाणून घेण्यासाठी आपल्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून ०११-२२९०१४०६ या क्रमांकावर मिस कॉल करा. जर तुम्ही आपला मोबाईल क्रमांक ईपीफ खात्यासाठी रजिस्टर केलेला नसेल तर सर्वात आधी आपला मोबाईल क्रमांक रजिस्टर करून घ्या.
३. ईपीएफ खात्याची वेबसाईट: ईपीएफ खात्याच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊनही तुम्ही तुमचा ईपीएफ खात्यावरील जमा रक्कम तपासू शकता. यासाठी https://epfindia.gov.in/site_en/index.php या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करूनही तुम्ही आपले खाते तपासू शकता. यामध्ये अगदी बँक पासबुकसारखे सर्व व्यवहार तुमच्या समोर दिसतील.
तुमचा ईपीएफ म्हणजे तुमच्या भविष्याची, निवृत्तीची, आपत्कालीन प्रसंगासाठीच्या तरतुदींपैकी एक महत्वाची तरतूद आहे. त्यामुळे आपल्या ईपीएफ खात्यावरील जमा रकमेसंदर्भात माहिती घेणं हा केवळ तुमचा अधिकार नाही तर तुमची जबाबदारीही आहे.
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/