Reading Time: 2 minutes

प्रॉव्हिडन्ट फंड पगारदारांसाठी महत्त्वाचे का आहेत ?

 • कर्मचारी भविष्य निधी (ईपीएफ) देशातल्या पगारदारांसाठी सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या गुंतवणूक योजनांपैकी एक आहे. ईपीएफचा लाभ २० किंवा त्याहून अधिक कर्मचारी असणाऱ्या सर्व कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना मिळतो. दुर्दैवाने, मागील काही वर्षे व्याजदरात सातत्याने घट होत होती. परंतु,सध्या व्याजदर वाढून ८.६५% झाला आहे. 
 • पगारामधून ईपीएफ कपात केली जात असल्यामुळे, या लोकप्रिय गुंतवणूक योजनेचा अवलंब करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त प्रयत्न करण्याची गरज नाही. तसेच इथे कर्मचारी व नियोक्ता (Employer) दोघांचेही ५०-५०% योगदान असल्यामुळे, एकूण गुंतवणुकीच्या निम्मी रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केली जाते व निम्मी रक्कम नियोक्ता भरत असतो.  

आपल्या पीएफ अकाऊंट संबंधित तक्रार कशी दाखल कराल?

प्रॉव्हिडन्ट फंडचे ५ महत्वाचे फायदे 

१. कर फायदा:-

 • कर्मचाऱ्याच्या पगारातून ईपीएफ कपात करण्यात आलेली रक्कम म्हणजेच कर्मचाऱ्यांचे योगदान कलम ८० सी अंतर्गत कर सवलतीसाठी पात्र आहे. 
 • जोपर्यंत कर्मचारी नोकरी करत असतो तोपर्यंत त्याच्या पगारामधून ईपीएफ कपात होत राहते. नोकरी सोडल्यावर अथवा बदल झाल्यांनतर ईपीएफ खाते ट्रान्सफर करणे किंवा ते बंदकरता येते व त्या तारखेपर्यंतची सर्व रक्कम व्याजासह कर्मचाऱ्याच्या मिळते. ही रक्कम करमुक्त असते. 

पीएफ खाते ट्रान्सफार कसे कराल?

२. वेळेवर पैसे काढण्याचा पर्याय:-

 • ईपीएफओ खात्याचा वापर बँक खात्याच्या रूपात वापर करता येत नसला तरी, वैद्यकीय उपचारांसह,  गृह कर्ज परतफेड आणि शैक्षणिक खर्च यासारख्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी ठराविक कालमर्यादेंतर (५ ते १० वर्षे) आंशिक पैसे काढण्याची सुविधा आहे.   
 • उदाहरणार्थ, सात वर्षानंतर ईपीएफमध्ये गुंतवलेल्या रकमेच्या ५०% पर्यंत रक्कम विवाह किंवा शैक्षणिक खर्चासाठी पैसे काढता येऊ शकतात. 

३. विमा लाभ :

 • एम्प्लॉयी  डिपॉझिट लिंक्ड  इंश्युरन्स स्कीम (EDLI), द्वारा विमा  स्वंरक्षण कर्मचारी भविष्य निधीला दिले जाते. 
 • सेवा कालावधी दरम्यान कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, नोंदणी केलेल्या नॉमिनीला एकरकमी रक्कम दिली जाते. 
 • कोणताही ईपीएफ खातेधारक या योजनेसाठी पात्र ठरतो. त्याला त्यामध्ये कोणतेही योगदान करण्याची आवश्यकता नाही. 

कर्मचारी भविष्य निधी- भाग २- ईपीफ खाते कसे तपासावे?

४. दीर्घकालीन गुंतवणूक:

 • प्रतिमाह भरण्यात येणारी रक्कम आणि पैसे काढण्यासाठी असणारे काळाचे निर्बंध यामुळे ईपीएफमध्ये गुंतवलेली रक्कम एकप्रकारे दीर्घकालीन गुंतवणूक असते. 
 • तसेच, यावर मिळणारे व्याजदेखील चांगले असल्यामुळे यामधून एकरकमी चांगला परतावा मिळतो. 
 • एकप्रकारे ही आपल्या भविष्याची साठवणूक किंवा तरतूद असते.

. निवृत्तीवेतन योजना – 

 • ईपीएफ योजना निवृत्तीवेतन योजना म्हणून देखील वापरली जाते, कारण  नियोक्त्याच्या १२% पैकी ८.३३% भविष्य निर्वाह निधी पेन्शन योजनेसाठी (ईपीएस) वापरले जातात. 
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या https://arthasakshar.com/disclaimer/  
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…