आपल्या पीएफ अकाऊंट संबंधित तक्रार कशी दाखल कराल?

Reading Time: 3 minutes

भविष्य निधी (पीएफ) किंवा कर्मचारी भविष्य निधि (ईपीएफ) ही सेवानिवृत्ती लाभ योजना आहे. ही गुंतवणूक योजना कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीसाठी बचत करण्यास प्रोत्साहित करते आणि या योजनेचा मूळ उद्देश सेवानिवृत्ती निधीची तरतूद हा आहे.

ईपीएफ खात्याच्या दिशेने, कर्मचारी आणि नियोक्ता एकत्रितपणे १२% योगदान देतात. प्रत्येक कर्मचाऱ्यास सेवानिवृत्तीच्यावेळी ईपीएफ रक्कम व्याजासहित परत मिळते. ईपीएफ व्याजदर हा सतत बदलत असतो. सध्याचा व्याजदर ८.६५% आहे.

पीएफ – अर्ज व तक्रार:

 • कर्मचारी त्यांच्या नियोक्तासह पीएफकडे आधीपासूनच योगदान देत असल्यास शिल्लक तपासण्यासाठी किंवा मागे घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करु शकतात. ईपीएफ युनिफाइड पोर्टलद्वारे ईपीएफओ कडून अनेक फायदे दिले जातात.
 • हे फायदे मिळविण्यासाठी सदस्यांना ईपीएफओ पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. नियोक्ताद्वारा दिलेला युनिव्हर्सल अकाउंट नंबरसह (UAN), कर्मचारी त्यांच्या भविष्य निधीचे सुलभ व्यवस्थापन करण्यासाठी त्यांचे खाते सक्रिय करू शकतात किंवा पोर्टलवर नोंदवू शकतात.
 • आपल्या देशात, बरेच लोक पीएफ आणि पेंशनवर अवलंबून असतात आणि बऱ्याचदा पीएफ मागे घेण्यासाठी, हस्तांतरण, अद्यतन तपशील(Update details) किंवा ईपीएफ संबंधित नियोक्तासह त्यांच्या खात्याशी निगडित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
 • ईपीएफ संदर्भातील तक्रार ऑनलाईन दाखल करण्यासाची  सुविधा ‘पीएफ तक्रार पोर्टल’वर उपलब्ध आहे. ईपीएफसंदर्भात कोणतीही समस्या किंवा तक्रार निवारणास हे पोर्टल मदत करते.

पीएफ पोर्टलवर कोण अर्ज करू शकते?  

 • या पोर्टलवर अर्ज करण्यासाठी अर्जदार ईपीएफ सदस्य, निवृत्तीवेतनधारक किंवा नियोक्ता असणे आवश्यक आहे.
 • आपण आपल्या नियोक्ता (कंपनी) किंवा संबंधित ईपीएफओ विरूद्ध तक्रार करू शकता.
 • तक्रार दाखल केल्यावर ३० दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाते.
 • तक्रारीचे निवारण करण्यासाठी तक्रारदार स्मरणपत्रे पाठवू शकतात.

कोणत्या प्रकारच्या तक्रारी नोंदवल्या जाऊ शकतात?

 • पेन्शन सेटलमेंट
 • १० सी किंवा ईपीएस योजना प्रमाणपत्र.
 • पीएफ संचयांच्या हस्तांतरणासाठी फॉर्म १३
 • चेक रिटर्न येणे किंवा मिसप्लेस होणे
 • प्रॉव्हिडंट फंड बॅलन्स संबंधित मुद्दे
 • भविष्यनिर्वाह निधी काढणे
 • विमा लाभाचा भरणा

ईपीएफ तक्रार ऑनलाईन नोंदणी कशी करावी :

१. http://epfigms.gov.in/ या वेबसाईटवर जा. उजव्या कोपऱ्यात भाषेचा पर्याय आहे. (इंग्रजी व हिंदी). तुमच्या सोयीची भाषा निवडा.

२. तक्रार नोंदविण्यासाठी ‘Register Grievance’ हा पर्याय निवडा

३. Status – मेन्यूमधून आपले  ‘Status’ निवडा- ईपीएफ सदस्य, ईपीएस पेंशनर, नियोक्ता किंवा इतर

४. यानंतर  पीएफ नंबरसहित १२ अंकी यूएएन नंबर टाकावा लागेल. (सर्वसाधारणपणे पगार स्लिपवर याचा उल्लेख असतो.  यानंतरचे  इतर डिटेल्स दिलेल्या पीएफ नंबरच्या आधारे आपोआपच भरले जातील.

५. वैयक्तिक तपशील (Personal Details) च्या हेडींगमध्ये आपली वैयक्तिक माहिती म्हणजेच नाव, पत्ता, फोन नंबर शहराचे नाव पिनकोड, इत्यादी माहिती भरावी लागेल.

६. यानंतर तक्रारीचा प्रकार (grievance category) व तपशील (Grievance Details) याची माहिती भरावी लागेल. तक्रारीच्या तपशीलासाठी जास्तीत जास्त ५००० शब्दांची मर्यादा आहे. तसेच या फॉर्ममध्ये आपण तक्रारीसंदर्भात आवश्यक अशा पीडीएफ फाईल अपलोड करू शकता. यांनतर कॅप्चा कोड टाइप करून फॉर्म सबमिट करा.

७. त्यानंतर, तक्रारदारास नोंदणी क्रमांक मिळेल. हा क्रमांक आपल्या तक्रारीची स्थिती तपासण्यासाठी किंवा स्मरणपत्रे पाठविण्यासाठी आवश्यक असतो.

ईपीएफ तक्रारची स्थिती (Status) कसे तपासाल:

 • ज्या सदस्यांनी EPF i-Grievance Management System वर तक्रार नोंदवली असेल त्यांनी तिची स्थिती त्याच वेबसाइटवर तपासू शकता. वरच्या मेनूमधून ‘View Status’ वर क्लिक करा.   
 • आपल्याला पासवर्डसह प्रदान करण्यात आलेला नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा. कॅप्चा कोड भरा आणि सबमिट करा. जर आपण तक्रार फॉर्म भरताना पासवर्ड तयार केला असेल परंतु आता तो विसरला असेल तर आपण नेहमीच आपल्या नोंदणी क्रमांकाद्वारे ते पुनर्प्राप्त करू शकता. म्हणूनच, आपला नोंदणी क्रमांक सुरक्षित ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे.

ईपीएफओला स्मरणपत्रे कशी पाठवाल?

 • जर आपल्या ईपीएफ तक्रारीचे निवारण प्रमाणित वेळेत झाले नाही तर आपण  EPF i-Grievance Management प्रणालीला भेट देऊन ईपीएफओला स्मरणपत्रे पाठवू शकता.
 • मेन्यु बार वरून ‘Send Reminder’ वर क्लिक करा.तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड (जर असेल तर) एंटर करा. कॅप्चा कोड भरा आणि ईपीएफओला स्मरणपत्र पाठवण्यासाठी एंटर क्लिक करा.

पीएफ खाते ट्रान्सफार कसे कराल?,

कर्मचारी भविष्य निधि (EPF) भाग १,  

कर्मचारी भविष्य निधी- भाग २- ईपीफ खाते कसे तपासावे?

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *