Reading Time: 2 minutes

नोकरी स्वीच करताय? कागदपत्रांच्या सगळ्या धावपळीत अजून एक खूप महत्वाची गोष्ट करायची राहून जाते. ती म्हणजे तुमचे ‘ईपीएफ खाते’. तुमचे ‘ईपीएफ खाते’ पूर्वीच्या कंपनीकडून नवीन कंपनीत ट्रान्स्फर करायला विसरू नका. पहिल्यांदा नोकरी स्वीच करत असाल तर मात्र काळजीपूर्वक आणि योग्य त्या प्रक्रियेने तुम्हाला तुमचे खाते आणि खात्यातील रक्कम हस्तांतरित करणे गरजेचे आहे. तुमची कित्येक वर्षांची बचत तुमच्यासाठी महत्वाची आहे आणि म्हणून आपले ‘पीईएफ खाते’ हस्तांतरित कसे करायचे हे जाणून घ्या.

पीएफ खाते हस्तांतरित करताना-

  • एकदा ‘पीएफ नोंदणीकृत’ संस्थेत एखाद्या व्यक्तीने नोकरी स्वीकारतो तेव्हा त्याचे एक ‘पीफ खाते’ उघडले जाते. पीएफ गुंतवणुकीच्या उद्देशाने कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही कर्मचार्यांच्या या खात्यमध्ये योगदान देतात आणि पैसे काढेपर्यंत या रकमेवर व्याज ही मिळत राहते.
  • पुढे, करिअरच्या सुरुवातीच्या किंवा मध्यावर विविध कारणास्तव कर्मचारी नोकरी बदलतो (जॉब स्विच करतो) यात काही विशेष नाही.
  • अशा परिस्थितीत, “मागील नोकरीत आधीच तयार केलेल्या कर्मचार्याच्या पीएफ खात्याचे काय केले जाऊ शकते?” अशा प्रकरणांमध्ये कर्मचार्याला दोन पर्याय असतील.
    • कर्मचारी 60 दिवसांपर्यंत नोकरी न स्वीकारल्यास खात्यातील सर्व जमा व्याजासह काढून घेता येते; किंवा
    • खात्यातील जमा शिल्लक नवीन कंपनीकडे हस्तांतरित केली जाते.
  • सेवानिवृत्तीनंतरच्या भविष्यासाठी बचत महत्वाची आहे. म्हणून पीएफ मधील पैसे काढण्याऐवजी शिल्लक हस्तांतरित करणे नेहमीच योग्य ठरते. कारकपातीच्या दृष्टीकोनातूनदेखील हाच सल्ला दिला जातो, कारण 5 वर्षांच्या सतत सेवेनंतर पीएफ खाते बंद केल्यास त्यावर कराचा बोजा वाढतो.

ऑनलाइन पीएफ हस्तांतरित करण्यासाठी यूएएन कसे वापरावे?

  • तुमचे पीफ खाते आणि त्यासंबाधित कोणतीही क्रिया यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा ‘युएएन (UAN)’. तुमचे खाते हस्तांतरित करण्याची प्रक्रिया देखिल या युएएन च्या मदतीने होते.
  • तंत्रज्ञानाचा वापर करून आता ही प्रक्रिया ऑनलाईन केली जाऊ शकते. सामान्यत: कंटाळवाणा आणि वेळखाऊ काम आता घरबसल्या केले जाऊ शकते.   
  • ऑनलाईन हस्तांतरण करण्यापूर्वी-
    • सदस्याचे त्याचे  यूएएन ‘यूएएन पोर्टल’ मध्ये सक्रिय केले पाहिजे आणि त्यासाठी वापरला मोबाइल नंबर देखील चालू असला पाहिजे
    • यूएएन सिडींगसाठी बँक अकाउंट आणि बँकेचा IFSC कोड आवश्यक आहे. तथापी निधी मंजुरीसाठी पॅन कार्ड किंवा आधार कार्ड सिडींग करून घेणे आवश्यक नाही.
    • नियोक्ताने ई-केवायसी मंजूर केले पाहिजे.
    • मागील/वर्तमान नियोक्ताने ईपीएफओ मध्ये डीजीटल नोंदणी अधिकृत केलेली असावी.  
    • कर्मचा-यांचे त्याचे मागील आणि सध्याचे पीएफ खाते क्रमांक ईपीएफओ मध्ये नोंदणी केलेले असावेत.
    • एका सदस्य आयडीसाठी फक्त एकच वेळा हस्तांतरण विनंती स्वीकारली जाऊ शकते.
    • ईपीएफओमध्ये व्यक्तिगत माहिती आणि पीएफ खाते संबंधित माहिती जसे की, यूएएन, नियोक्ता नाव, सामील होण्याची तारीख, सदस्य नाव, पित्याचे नाव, पीएफ खाते क्रमांक, जन्मतारीख आणि कंपनीचा पत्ता यांचे तपशील बरोबर असयला हवे.

हस्तांतर प्रक्रिया कशी करावी?

  • आपला यूएएन नंबर आणि पासवर्ड वापरुन युनिफाइड पोर्टल (सदस्य इंटरफेस) वर लॉगिन करा.
  • लॉगिन केल्यानंतर, ऑनलाइन सेवांतर्गत ‘वन सदस्य – एक ईपीएफ खाते (हस्तांतरण विनंती)’ वर क्लिक करा.
  • चालू नोकरीच्या ठिकाणाची वैयक्तिक माहिती आणि पीएफ खाते नोंदवा.
  • जे चालू खाते हस्तांतरित करायचे आहे त्या खात्याचा तपशील निवडा. ईपीएफओच्या  मागील नियोक्ताची सम्पूर्ण माहिती असणारे एक जीईटी एमआयडी(GET MID) बटन आहे. तुम्ही फक्त योग्य नियोक्याची निवड करा, बाकी तपशील अपोआप भरला जाईल.
  • हस्तातरण अधिकृत आहे हे निश्चित करण्यासाठी तुम्हला मागील किवा चालू नियोक्याच्या आधार घ्यावा लागतो. फॉर्म जमा करण्यासाठी एकतर मागील नियोक्ता किंवा वर्तमान नियोक्ता या पैकी पर्याय निवडा आणि त्यांचे सदस्य आयडी/यूएएन क्रमांक भरा.
  • पुढे, यूएएन नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी प्राप्त करण्यासाठी ‘ओटीपी मिळवा’ वर क्लिक करा आणि ओटीपी एंटर करा आणि सबमिट वर क्लिक करा.
  • त्यानंतर शक्यतो पुढील २० दिवसात जमा रक्कम नवीन खात्यात भरली जाऊ शकते.

अशाप्रकारे ऑनलाईन हस्तांतर प्रक्रिया करून तुम्ही तुमचे पीएफ खाते घरबसल्या  हस्तांतरित करू शकता.

 

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2PyPVYP )
कर्मचारी भविष्य निधि (EPF) भाग १,  कर्मचारी भविष्य निधी- भाग २-ईपीफ खाते कसे तपासावे?

 

(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

(Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा.)

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…