Arthasakshar Us China Tension and share Market
Reading Time: 2 minutes

अमेरिका-चीनमधील तणावाचे बाजारावरील परिणाम

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवण्यासाठी चीनने ही महामारी पद्धतशीरपणे रुजवल्याचे पुरावे असल्याचे अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट यांनी स्पष्ट केले. 

लॉकडाऊनचे रिअल इस्टेटवर होणारे परिणाम

  • अमेरिका आणि चीन या जगातील दोन सर्वात मोठ्या आर्थिक शक्तींमध्ये तणावातून युद्ध भडकले असताना सोमवारी स्पॉट गोल्डच्या किंमतीत ०.१४ टक्क्यांनी वाढ झाली. 
  • दरम्यान, यूएस मॅन्युफॅक्चरिंग डेटा ११ वर्षात सर्वात कमी स्तरावर घसरला असून तो अखेरीस ४१.५ वर आला.
  • लॉकडाउनचे उपाय शिथील झाल्यानंतर आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत असल्याने कोसळणारा तेल व्यवसाय पुन्हा पूर्वपदावर येऊ शकेल, तसेच जागतिक व्यापार सुधारेल. 
  • मध्य पूर्व, यूएसए आणि जगातील इतर भागांनी अर्थव्यवस्थेला चालना देणा-या उपायांची घोषणा केल्याने डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ३.०८ टक्क्यांनी वाढले आणि २०.४ डॉलरवर बंद झाले.
  • पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेने आणि त्यांच्या समर्थकांनी १ मे २०२० रोजी दररोज उत्पादन कपात करून ९.७ दशलक्ष बॅरल एवढेच उत्पादन करण्यास सहमती दर्शवली आणि क्रूड ऑइलच्या किंमती वाढण्याची अपेक्षा आहे.
  • चांदीच्या दरात घसरण झाली असून ते ०.६७ टक्के दराने घसरत १४.८ डॉलर प्रति औसांवर बंद झाले. एमसीएक्सवर या किंमती काल ०.७७ टक्क्यांनी घसरून व ४०,९१८ रुपये प्रति किलोवर बंद झाल्या.

फार्मा क्षेत्राने दिला गुंतवणूकदारांना दिलासा

शेअर बाजार

  • शेअर बाजारात काल सलग दुसऱ्या दिवशी घसरण दिसली. सेन्सेक्सने २६१.८४ अंकांची म्हणजेच ०.८३ टक्क्यांची घट दर्शवली. 
  • बाजार बंद होताना सेन्सेक्स ३१,४५३.५१ अंकांवर होता. तर दुसरीकडे निफ्टीदेखील ८७.९० अंक म्हणजेच ०.९५ टक्क्यांनी घसरला. 
  • शेअर बाजारातील घसरणीचा सर्वाधिक फटका बँकिंग आणि एफएमसीजी क्षेत्राला बसला आहे. यांनी सांगितले. 
  • शेअर बाजारातील घसरणीमध्ये पीएसयू बँक आणि एसबीआय बँकेचा समावेश आहे. एसबीआयचे समभाग ४.६४ टक्क्यांनी घसरले आणि १७०.५० रुपयांवर बंद झाले. 
  • बाजारात घट दर्शवलेल्या इतर बँकांमध्ये बजाज फायनान्स, क्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि बजाज फिनसर्व्हचा समावेश आहे. 
  • शेअर बाजाराच्या घसरणीसाठी एफएमसीजी क्षेत्रही कारणीभूत ठरले. रॅडिकोखेतान हे सर्वाधिक नुकसानकारक ठरले. या शेअरने ७.३४ टक्क्यांची घट दर्शवली व तो २९३.३५ रुपयांवर बंद झाला.
  • त्यानंतर युनायटेड ब्रेवरीज, गॉडफ्रे फिलिप्स आणि मॅकलिओडरसेल यांचा क्रमांक लागला. तथापि एफएमसीजीच्या टॉप गेनर्समध्ये नाथबायोजेन्सने ४.९९ टक्क्यांची वाढ दर्शवली. 
  • ऊर्जा आणि इन्फ्रा या दोनच क्षेत्रात भरभराट दिसून आली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉल कॅप यादीदेखील दिवसाच्या अखेरीस १ टक्क्यांनी घसरली. 
  • मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सने सलग विक्रीचा तणाव अनुभवला. त्यामुळे निफ्टी मिडकॅप १०० इंडेक्स ०.७ टक्क्यांनी घसरली तर निफ्टी स्मॉलकॅप इंडेक्स १.३ टक्क्यांनी घसरली. 
  • मार्केटमधल्या इतर नफ्यातील स्टॉक्समध्ये भारती एअरटेलचा समावेश आहे. हा शेअर ३.६ टक्क्यांच्या वाढीसह १७०.३५ रुपयांवर बंद झाला. 

रिलायन्स जिओ -फेसबुक मधील डिलचे परिणाम

सरकारी शिथिलीकरणाचा परिणाम: 

  • क्रेडिट रेटिंग एजन्सी आयसीआरएने या तिमाहीच्या अखेरीस जून २०२० मध्ये दिलेल्या अहवालानुसार, लॉकडाउनमुळे देशाच्या जीडीपीवर जवळपास २० टक्क्यांनी घसरेल. मात्र सर्व परिस्थिती या वर्षाखेरीस पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा केली जात आहे.

फ्रॅंकलिन टेम्पल्टन इंडिया – जरा चुकीचे, जरा बरोबर…

श्री प्रथमेश माल्या, श्री अमर देव सिंह

एंजल ब्रोकिंगचे लिमिटेड 

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimerhttps://arthasakshar.com/disclaimer/ 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…