Arthasakshar Share Market updates
Reading Time: 2 minutes

फार्मा क्षेत्राने दिला गुंतवणूकदारांना दिलासा

लॉकडाऊनमध्ये झालेली वाढ आणि नजीकच्या काळात डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या व्यापार युद्धाचे दिलेले संकेत याचा परिणाम संपूर्ण आशियाई बाजारपेठेवर सोमवारी दिसून आला. 

रिलायन्स जिओ -फेसबुक मधील डिलचे परिणाम

  • सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये अनुक्रमे ५.९४ टक्के आणि ५.७४ टक्के अशी मोठी घसरण झाली. सर्वाधिक फटका बसलेल्या क्षेत्रांमध्ये बँका, धातू, वाहन यांचा समावेश असून या सत्रात ७ टक्क्यांपेक्षा जास्त अंकांनी घसरले. 
  • अशा परिस्थितीत फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्रातून गुंतवणूकदारांना दिलास मिळाला आहे.
  • निफ्टी फार्मामध्ये १० पैकी ९ स्टॉक्स बाजार बंद होताना ग्रीन झोनमध्ये होते. ओरबिंदो फार्माने या नफ्याचे नेतृत्व केले. 
  • त्यानंतर सिपला, अलकेम लॅब्स आणि कॅडिला हेल्थने अनुक्रमे ३.७७ टक्के, २.४७ टक्के आणि १.९३ टक्क्यांनी वाढ नोंदवली. ट्रेडिंग सेशनमध्ये केवळ डिव्हिस लॅबोरेटरीजने घट दर्शवली. 
  • सर्वात वाईट परिणाम झालेल्यांमध्ये बँकिंग शेअर्सचा समावेश होता. 
  • निफ्टी प्रायव्हेट बँक, निफ्टी बँक आणि एस अँडपी बीएसई बँकेक्स अनुक्रमे ८.६ %, ८.३२% आणि ८.२५ % नी घसरले. 
  • एनएसई, आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स सर्वात जास्त म्हणजे ११.०७ टक्क्यांनी घसरले. 
  • त्यानंतर फेडरल बँक, इंडसइंड बँक आणि क्सिस बँकेने अनुक्रमे ९.७३%, ९.६३% आणि ९.४६%ची घट दर्शवली. 
  • बीएसई, येस बँकेनेही ३.२२% ची सर्वाधिक घसरण अनुभवली. सर्वच बँकिंग स्टॉक्स ५ टक्क्यांपेक्षा जास्त अंकांनी घसरले.
  • धातूंच्या शेअर्समध्येही घसरणीचा कल दिसून आला. एनएसईमधील हिंडाल्को इंडस्ट्रीज, वेदान्ता, जिंदाल स्टील पॉवर यासारख्या स्टॉकनी ट्रेडिंग सेशनमध्ये १० टक्क्यांपेक्षा जास्त घट नोंदवली.
  • निफ्टी मेटलमध्ये आज फक्त ४ स्टॉक्स ५ टक्क्यांपेक्षा कमी नुकसानीवर होते. त्यापैकी तीन (वेलस्पन कॉर्प, कोल इंडिया व रत्नमणी मेटल) ४% ते ५ % च्या रेंजमध्ये होते आणि एमऑइल ३.६३% नफ्यात होते.

लॉकडाऊनचे रिअल इस्टेटवर होणारे परिणाम

कच्च्या तेलाच्या किंमती

  • मागचा आठवडा हा जगातील कच्च्या तेलाच्या किंमतींसाठी चांगला होता. 
  • डब्ल्यूटीआय क्रूड किंमती १६.८ टक्के एवढ्या आठवड्याभरातील विक्रमी गतीने वाढले. 
  • शुक्रवारी ओपेक प्लस संघटनेने नवा पुरवठा करार केला. 
  • द ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलिअम एक्सपोर्टिंग कंट्रीज व त्यातील सदस्य देशांनी १ मे २०२० पासून त्यांचे तेल उत्पादन दररोज ९.७ दशलक्ष बॅरलनी कमी करण्यावर सहमती सर्शवली. 
  • यूएस क्रूड इन्व्हेंटरली लेव्हल्स ९ दशलक्ष बॅरलने वाढल्याचे एनर्जी इन्फॉर्मेशन डमिनिस्ट्रेशनच्या अहवालातून कळाल्यानंतर मागील आठवड्यात कच्च्या तेलाच्या किंमतींना आधार मिळाला.
  • मार्केटला १०.६ दशलक्ष बॅरल वाढीची अपेक्षा होती. यूएस डिलिव्हरी पॉइंट्सवरील साठवण क्षमता वेगाने संपत असल्यामुळे, तसेच जागतिक मागणी कमी झाल्याने याआधीच्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या किंमतींवर मोठा परिणाम झाला होता.

फ्रॅंकलिन टेम्पल्टन इंडिया – जरा चुकीचे, जरा बरोबर…

सोने व चांदी –

  • गेल्या आठवड्यात, स्पॉट गोल्डच्या किंमती १.६ टक्क्यांनी कमी झाल्या. कारण अनेक देशांमधील कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाउन शिथिल होण्याची आशा असून गुंतवणुकदारांमधील जोखिमीची भूक वाढली असून, सेफ हेवन असेट असलेल्या सोन्याकडे ओढा कमी झाला आहे.
  • यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदर शून्याजवळ ठेवला असून अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी संपूर्ण साधनांचा वापर करणार असल्याचे म्हटले. यामुळे सराफा धातूंच्या किंमतींच्या घसरणीवर मर्यादा आली.
  • गेल्या आठवड्यात स्पॉट सिल्व्हरच्या किंमती १.९७ टक्क्यांची घसरण घेत १४.९ डॉलर प्रति औसांवर बंद झाल्या होत्या. तर एमसीएक्सने १.९४ टक्क्यांची घट घेत ४१,२३७ रुपये प्रति किलो एवढा दर नोंदवला.

श्री अमर देव सिंह व श्री प्रथमेश माल्या 

– एंजल ब्रोकिंग लिमिटेड

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimerhttps://arthasakshar.com/disclaimer/ 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…