जेफ बेझोस Jeff Bezos
Reading Time: 3 minutes

जेफ बेझोस (Jeff Bezos)

ॲमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असून  त्यांच्या जागी अँडी जेसी (Andy Jassy) नियुक्ती करण्यात आली आहे. सलग २७ वर्ष ॲमेझॉनचे सीईओ असणारे जेफ बेझोस या वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीपासून बोर्डचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील. बेजोस यांनी आपल्या कर्मचार्‍यांना इ-मेल लिहून आपल्या राजीनामाच्या निर्णयाबद्दल माहिती दिली.

सप्टेंबर 2020 मध्ये, सलग तिसर्‍या वर्षी फोर्ब्सच्या श्रीमंत अमेरिकन लोकांच्या यादीत अव्वल स्थान मिळवणारे जेफ बेझोस हे ॲमेझॉनचे सर्वात मोठे भागधारक असल्याने कमानीची सर्व सूत्र त्यांच्याच हातात राहतील.  यावर्षी टेस्ला सुप्रीमो एलोन मस्क बेझोसला मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

व्यक्तिविशेष: राकेश झुनझुनवाल – भारतीय शेअर बाजारातील बादशाह…

कोण आहेत जेफ बेझोस (Jeff Bezos)

  • गेले २७ वर्ष ॲमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून काम पाहणारे जेफ बेझोस (Jeff Bezos) यांचा यशाचा प्रवास सोपा नव्हता. आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडून त्यांनी खूप मोठी जोखीम पत्करली होती.
  • कॉम्पुटर सायन्समध्ये पदवी प्राप्त केल्यावर हुशार जेफ बेझोस यांना इंटेल आणि बेल लॅब्स यासारख्या उच्च कंपन्यांकडून नोकरीच्या संधी मिळाल्या होत्या, पण त्या न स्वीकारता जेफने फिटेल या नुकत्याच स्थापना झालेल्या कंपनीमध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि नंतर ती कंपनी सोडून बँकर्स ट्रस्ट मध्ये नोकरी करू लागले. 
  • वयाच्या ३० व्या वर्षी जेफ ६ आकडी पगार घेऊ लागला होता, अनेकांच्या दृष्टीने हा जीवनातील एक अत्यंत यशस्वी टप्पा होता.  
  • एकदा इंटरनेटवर काहीतरी पहात असताना त्याला अशी माहिती मिळाली की इंटरनेटचा वापर २३०० टक्क्यांच्या गतीने वाढतो आहे आणि त्या क्षणी स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याचा निर्णय जेफ बेझोस यांनी घेतला. 
  • त्यांनी त्यांची अतिशय प्रतिष्ठित समजली जाणारी ‘डी इ शॉ आणि कंपनी’ येथील नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. 
  • त्यांच्या बॉसेससोबत त्यांनी एक अशी कंपनी सुरु करण्याबद्दल चर्चा केली होती की जिथे लोक इंटरनेटवरून वस्तू विकत घेता येऊ शकतील, ही कल्पना त्यांनाही आवडली होती. 
  • तरीही, ‘इतकी चांगली नोकरी सोडून अशी कोणतीही कंपनी सुरु करण्याच्या भानगडीत ‘तू’ पडू नकोस, ज्याच्याकडे इतकी चांगली नोकरी नाहीये त्याला करुदे’ असे त्यांचे मत झाले आणि म्हणून जेफ यांनी ती नोकरी सोडून स्वतःची कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला. 

ॲमेझॉनची सुरुवात: 

  • सुरुवातीला जेफ बेझोस आपल्या कंपनीला “कॅडब्रा” असे नाव देणार होते पण नंतर ‘मेझॉन’ हे नाव ठरलं. 
  • जेव्हा सगळं जग ‘इंटरनेट कसे वापरायचे?’ हे शिकण्यात गर्क होते तेव्हा जेफ इंटरनेट वर किरकोळ व्यापार सुरु करण्यावर काम करत होते. 
  • याच उद्देशाने जेफ सिऍटल ला जाऊन तिथे त्यांनी त्यांच्या पत्नी आणि २ प्रोग्रॅमर्स सोबत त्यांच्या गॅरेजमध्येच काम सुरु केले. त्यांची पहिली विक्री म्हणजे पुस्तके, जी आधी त्यांच्या ग्राहकांनी खरेदी केली आणि मग त्या पैशांनी त्यांनी खरेदी करून ग्राहकांना पोहोचवली. 
  • मेझॉनला स्पर्धा करण्यात काहीही रस नव्हता, तर त्यांचे लक्ष्य त्याच्या ग्राहकांना सर्व सुविधा वेळेत पोहोचवणे आणि या क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणे प्राधान्याचे होते. 
  • सुरुवातीची काही वर्ष त्यांचे स्पर्धक त्यांना सतत धमक्या देत असत आणि कंपनीही तोट्यात सुरु होती, आलेल्या ऑर्डर्स जेफ स्वतः नीट पॅक करायचे काम करीत. 
  • पहिली ३ वर्षे तर लोक मेझॉन खात्रीने बंद पडणार असे म्हणून मेझॉन.बॉम्ब”, “मेझॉन.टोस्ट”, “मेझॉन.कॉन” अशा नावांनी चिडवीत असत. 
  • त्यानंतर गुगल चे संस्थापक लॅरी पेज आणि सेर्गेय ब्रिन यांनी मेझॉन मध्ये गुंतवणूक केल्यानंतर जेफ यांना नफा होऊ लागला. 

विशेष लेख: जॅक वेल्श – उद्योग जगतातील एक “हरवलेला तारा”…

ॲमेझॉनच्या यशाची रहस्ये:

१. चांगली टीम निर्माण करणे: 

मेझॉनमध्ये नोकरी मिळण्यासाठी खूप मोठ्या प्रक्रियेमधून जावे लागते आणि तिथे नोकरी करण्यासाठी येणाऱ्या इच्छुकांना प्रश्नांची अशा प्रकारे उत्तरे देणे अपेक्षित असते की ज्यामधून उत्तर चुकीचे असले तरी त्यातून त्यांची चतुरता दिसेल.

२. गरजेप्रमाणेच खर्च करा: 

आजच्या व्यवसायांच्या नियमांच्या अगदी विरुद्ध नियम म्हणता येईल हा. जे खर्च आवश्यक आहेत ते केलेच पाहिजेत पण विनाकारण असणारे खर्च टाळले पाहिजेत. तात्पुरत्या सोयींसाठी केलेले खर्च हे नंतर महागात पडू शकतात.

३. केलेल्या चुकांमधून शिका: 

मेझॉनमध्ये अनेक प्रकारचे प्रयोग केले जातात त्यातले काही यशस्वी होतात, तर अनेक प्रयोग चुकतात देखील. जेफ यांच्या मतानुसार प्रयोगांशिवाय कधीही प्रगती होऊ शकत नाही. त्यामुळे नवनवे प्रयोग करत राहायचे पण झालेल्या चुकांमधून नेहमी काहीतरी शिकायचं आणि पुढे जायचं.

हे नक्की वाचा: भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती -‘आयटीसी’ची यशोगाथा…

                    भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती -‘आयटीसी’ची यशोगाथा (भाग २)…

४. खंबीर रहा: 

जीवनात ज्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांची यादी करून ती सहज तुमच्यासमोर राहील अशी ठेवा आणि हे कायम लक्षात ठेवा की जीवनात या गोष्टींशिवाय इतर कोणत्याही बाबतीत बदल होऊ शकतात. या गोष्टींच्या बाबतीत नेहमी खंबीर रहा.

५. नेहमी मोठा विचार करा: 

मेझॉनला कधीही फक्त पुस्तक विक्रीमध्येच काम करायचं नव्हतं किंवा फक्त एक ऑनलाईन विक्री करणारे दुकान अशीही ओळख नको होती. मेझॉन ही तर फक्त सुरुवात होती. २००० साली, जेफ बेझोस यांनी ब्लू ओरिजिन नावाची अंतरीक्षामध्ये संशोधन करणाऱ्या एका कंपनीची स्थापना केली, हे या तत्वाचे एक उत्तम उदाहरण आहे.

जेफ बेझोस यांनी  आपल्या कर्मचार्‍यांना लिहिलेले इ-मेल वाचण्यासाठी येथे क्लिक करा – (Full Letter of Jeff Bezos)

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: Jeff Bezos in Marathi, Jeff Bezos Marathi Mahiti

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.