Reading Time: 2 minutes
वेतनमोजणी – कोणता करपर्याय स्वीकारू?
अनेक नोकरदार पगारदात्याना त्यांच्या मालकाने त्यांना देण्यात येणाऱ्या वेतनाची मोजणी कोणत्या पद्धतीने करावी याबाबत विचारणा केली आहे. अनेकांना लवकरात लवकर अथवा जून २०२० अखेपर्यंत कोणता पर्याय स्वीकारणार ते लिहून देण्यास सांगितले आहे. असे लिहून न देणाऱ्याना जुनी करप्रणाली मान्य असल्याचे समजले जाईल असे कळवण्यात आले आहे.
आयकर: नवीन फॉर्म २६ / ए एस …
या वर्गासाठी जुनी, नवी दोन्ही करप्रणाली पर्याय उपलब्ध आहेत.
- जुन्या पद्धतीतील त्रिस्तरीय कर रचना, प्रमाणित वजावट, विविध सवलती तर नवीन प्रणालीत कोणतीही सवलत न घेता सहा स्तरातील कररचना यातील नेमका कोणता पर्याय आपल्याला फायदेशीर पडेल याबाबत संभ्रम निर्माण होणे साहजिक आहे.
- कररचना सोपी होण्यासाठी म्हणून आणलेली ही करपद्धती, पटकन कुणाला समजेल अशी नसल्याने ‘सोपे अवघड झाले हो’ असे अनेकांना वाटत आहे.
- नवीन करप्रणालीबाबत यापूर्वीच विस्ताराने लिहले असून जुन्या करप्रणालीतील सर्व सवलती आपल्याला माहिती आहेत तेव्हा गुणवत्तेच्या दृष्टीने विचार करता बहुतेक सर्व करदात्यांना जुनी करप्रणाली उपयुक्त आहे.
- याबाबत कोणताही किंतू न बाळगता सर्वांनी जुनी पद्धती मान्य असल्याचे कळवावे म्हणजे मालकाकडून जुन्या पद्धतीने मोजणी करून करकपात केली जाईल.
“करोना” – यातील काही आपण विसरलोय का?…
- यावर्षीच्या उत्पनाचे विवरणपत्र आपल्याला ३१ जुलै २०२१ रोजी किंवा त्याची मुदत वाढविल्यास त्या वाढीव तारखेपर्यंत भरून द्यायचे असल्याने वर्ष संपल्यानंतर आपल्या उत्पन्नाची मोजणी दोन्हीप्रकारे करून जर आपल्या असे लक्षात आले की नवी पद्धत आपल्याला अधिक फायद्याची आहे, तर आपण आपले विवरणपत्र नवीन पद्धतीने मोजणी करून भरावे.
- मालकाला जुन्या पद्धतीने मोजणी करून कर कापण्यासाठी सांगून आपले आयकर विवरणपत्र नवीन पद्धतीने भरणे किंवा मालकास नवीन पद्धतीने मोजणी करण्यास सांगून विवरणपत्र जुन्या पद्धतीने भरण्यास कोणतीही कायदेशीर अडचण नसल्याचा खुलासा केंद्रीय प्रत्यक्ष करनियंत्रण मंडळाने (CBDT) नुकताच केला आहे.
- पगारदार करदाते आपल्या उत्पनाची मोजणी कोणत्याही प्रकारे करून आपले विवरणपत्र भरू शकतात ही सवलत व्यवसायापासून उत्पन्न असलेल्या करदात्यांना उपलब्ध नाही.
- फक्त पगारदारांनी आपले विवरणपत्र भरण्यापूर्वी आपण कोणत्या प्रकारे उत्पन्नाची मोजणी करणार हे कळवणे अपेक्षित आहे, त्यामुळे कोणताही विचार न करता सर्वानीच आपल्या मालकास उत्पन्न जुन्या पद्धतीने मोजून करकपात करण्याची सूचना देऊन देण्यास हरकत नाही.
– उदय पिंगळे
Download Arthasaksharr App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Share this article on :