Arthasakshar Tax New rules
Reading Time: 2 minutes

आयकर: नवीन फॉर्म २६ / ए एस 

आयकर विवरणपत्र अचूक भरण्याच्या दृष्टीने फॉर्म २६/ ए एस याचे महत्व आपल्याला माहीती आहेच. यामध्ये-

  • करदात्यांच्या उत्पन्नातून मुळातून कापून घेतलेला कर,
  • त्यांनी विविध ठिकाणी भरून दिलेले १५/ जी किंवा १५/ एच फार्म त्यामुळे मिळवलेले करकपात न केलेले व्याज,
  • जर तुम्ही विक्रेते असाल तर नियमानुसार मुळातून कापलेला कर,
  • भरणा केलेला जसे की अग्रीम कर, मुळातून कापलेला कर,
  • मुळातून जमा केलेला कर यासंबंधीची माहिती, मिळालेला कर परतावा,
  • मोठया रकमेच्या व्यवहारांची माहिती,
  • करदात्यांची आयकर नियमानुसार केलेली करकपात,
  • अचल मालमत्तेची विक्री केल्यामुळे मुळातून झालेली करकपात,
  • मुळातून करकपात मोजण्यात झालेली चूक इत्यादी गोष्टींची थोडक्यात पण नेमकी माहिती असते.
  • ही सर्व माहिती एकत्रित असल्याने एकूण उत्पन्नाची अचूक मोजणी करण्यास उपयोग होतो. यात काही तफावत असेल, तर त्याच्याशी संबंधित व्यक्तीच्या लक्षात आणून देऊन त्यात दुरुस्ती करता येते.
  • त्यामुळे फार्म २६/ ए एस ला वार्षिक एकत्रित कर विषयक पत्र (Consolidated Tax Credit  Statement) असे म्हणता येईल.

नवीन फॉर्म २६ / ए एस

  • सन २०२०-२०२१ चा अर्थसंकल्प सादर करीत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या फॉर्म मध्ये सुधारणा करून तो वार्षिक कर विषयक पत्र स्वरूपात न राहता त्यात रियल इस्टेट, भांडवल बाजारातील व्यवहाराच्या माहितीचा समावेश असेल असे सांगितले होते.
  • यामुळे तो अधिक पारदर्शक होऊन संभाव्य करचोरी टाळता येईल.
  • त्यामुळे नवीन स्वरूपातील बदललेला फॉर्म सर्व समावेशक वार्षिक माहिती व्यवहार पत्रक होईल.
  • आयकर कायदातील २६/ ए एस ची तरतूद असलेले कलम  २०३/एए बदलून त्या जागी २८५ / बीबी टाकण्यात आले आहे.
  • यामुळे त्यात पूर्वीच्या माहिती बरोबरच चल अचल मालमत्तेच्या खरेदी विक्री व्यवहारांची माहिती दिली जाईल.
  • तसेच मोठे व्यवहार ज्याच्या  ज्यांच्यामार्फत होतात त्यांना हे व्यवहार कोणत्या व्यक्तीसाठी केले याचा तपशील आयकर खात्यास विहित नमुन्यात व कालावधीत द्यावा लागेल.
  • पूर्वीप्रमाणेच यातील तपशील व आपली माहिती यात तफावत असल्यास ती आपणास दुरुस्त करून घेता येईल, यामुळेच आता अधिक पारदर्शकता येऊन हा फॉर्म म्हणजे वार्षिक करविषयक पत्र न राहता आपले वार्षिक व्यवहार माहिती पत्रक (Consolidated Tax Information Statement) होईल.
  • याप्रमाणे केंद्रीय प्रत्यक्ष करनियंत्रण मंडळाने (CBDT) कायद्यातील बदल २१ मे २०२० रोजी राजपत्रात जाहीर केले असून ते आज १ जून २०२० पासून अमलात येतील.
  • सर्व माहिती एकत्रितपणे असल्याने करदात्यास आयकर विवरण पत्र भरणे तर आयकर विभागास त्याची जलद तपासणी करून कारवाई यामुळे सोईचे होईल.

Download Arthasaksharr App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

web search: Form 26AS new rules in marathi, Form 26AS che navin niyam marathi 
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutes अनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

आयकर विभागाची नोटीस आली आहे? घाबरू नका, आधी हे वाचा

Reading Time: 4 minutes टॅक्स, टॅक्स रिटर्न हे शब्द जरी ऐकले तरी करदाता काहीसा नाराज होतो. त्यात जर का आयकर विभागाकडून कुठली नोटीस आली तर ही नाराजी भीतीमध्ये बदलते. आयकर विभागाकडून आलेल्या कोणत्याही नोटीसमुळे अथवा पत्रामुळे करदाते घाबरून जातात. तथापि, कलम १४३(१) सूचना म्हणजे काळजी करण्याची गरज नाही. या लेखात आम्ही कलम १४३(१) च्या अंतर्गत पाठविलेल्या सूचनांबद्दल तपशीलवार चर्चा करणार आहोत जेणेकरून करदात्यांना याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल.

कलम ८० अंतर्गत करबचतीचे विविध पर्याय

Reading Time: 3 minutes आयकर कायदा १९६१, नुसार कलम ८० मध्ये करबचतीचे विविध पर्याय नमूद करण्यात आले आहेत. मागील भागात कलम ८० सी अंतर्गत नमूदकेलेल्या विविध पर्यायांची माहिती घेतली. या भागात उर्वरित सबसेक्शन अंतर्गत नमूद करण्यात आलेल्या करबचतीचे विविध पर्यायांची माहिती घेऊया.

आयकर खात्याच्या मदतीने आयटीआर फॉर्म भरणे होईल सुलभ

Reading Time: 2 minutes कर भरणाऱ्याला जो आयटीआर फॉर्म लागू होतो त्याची निवड करणे हे फॉर्म…