Reading Time: 3 minutes
जॅक मा (Jack Ma)
मागील भागात जॅक मा (Jack Ma) यांचे बालपण आणि शैक्षणिक आयुष्याबद्दल माहिती घेतली. या भागात आपण जॅक मा यांच्या यशाच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊ.
‘मा यून’ ते ‘जॅक मा’ चा यशाचा प्रवास – भाग १
- साल १९९५ च्या सुरुवातीला जॅक यांना त्यांच्या अमेरिकेतील मित्रांमुळे इंटरनेट विश्वाची ओळख झाली.
- या मित्रांच्याच मदतीने त्यांनी एके दिवशी सकाळी ९.४० ला एक वेबसाईट लाँच केली आणि दुपारी १२.३० पर्यंतच त्यांना चीनच्याच काही गुंतवणूकदारांकडून त्यांच्याबद्दल माहिती विचारणाऱ्या इ-मेल्स आल्या.
- त्यावेळी जॅक याच्या लक्षात आलं की ‘इंटरनेट’ मध्ये बरंच काही करून दाखवण्याची ताकद आहे.
- मग १९९५ च्या एप्रिलमध्ये जॅक आणि त्यांचा कॉम्पुटरचा शिक्षक असणारा मित्र ‘हे यिबिंग’ यांनी मिळून ‘चायना पेजेस’ च पाहिलं ऑफिस सुरु केलं.
- १० मे १९९५ ला अमेरिकेमध्ये त्यांनी chinapages.com नावाने डोमेन घेतले. पुढे तीन वर्षातच चायना पेजेसने ५० लाख चायनीज युआन म्हणजे त्यावेळचे ८ लाख अमेरिकी डॉलर कमावले.
- अशा प्रकारे मग जॅक मा यांनी त्यांच्या अमेरिकेतील मित्रांना सोबत घेऊन चायनीज कंपन्यांसाठी वेबसाइट्स बनवून देण्याचा व्यवसाय सुरु केला.
राकेश झुनझुनवाल – भारतीय शेअर बाजारातील बादशाह…
- त्यासाठी ते त्यांच्या मित्रांकडून त्यांच्या कंपनीविषयी सर्व माहिती घ्यायचे आणि ती इंग्रजीमध्ये भाषांतर करून त्यांच्या अमेरिकेतील मित्रांना पाठवायचे मग त्यानुसार तिकडे ती वेबसाईट तयार केली जायची.
- २०१० च्या एका कॉन्फरेन्स मध्ये जॅक मा म्हणाले होते की त्यांनी आजपर्यंत वेबसाईट कोडींगची एकही ओळ कधी लिहिली नाही, त्यांनी त्यांच्या वयाच्या ३३ व्या वर्षी पहिल्यांदा कॉम्प्युटर घेतला.
- जॅक मा यांचा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधील प्रवास समजून घ्यायचा म्हणलं तर १९९८ ते १९९९ मध्ये या चीनच्या मिनिस्ट्री ऑफ फॉरेन ट्रेड अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशनच्या, चीन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक कॉमर्स सेंटर या विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहिले.
- सन १९९९ मध्ये हे काम सोडून ते आपल्या गावी परत आले आणि त्यांनी त्यांच्या १७-१८ मित्रांसोबत ५ लाख युआनची एकत्रित गुंतवणूक करून चीनमधील अलिबाबा ही पहिली बिझनेस-टू-बिझनेस काम करणारी वेबसाईट त्यांच्या अपार्टमेंट मध्ये सुरु केली.
- सुरुवातीला या १७-१८ जणांव्यतिरिक इतर कोणाचीही अलिबाबा मध्ये कोणतीही आर्थिक गुंतवणूक नव्हती.
- आज हीच अलिबाबा.कॉम जगातली सर्वात मोठी बिझनेस-टू-बिझनेस काम करणारी वेबसाईट आहे.
- अपयश आणि इतक्या विविध आव्हानांना लहानपणापासून धाडसाने सामोरं गेल्यामुळे त्या काळी अगदी अशक्यप्राय वाटणारी गोष्टही जॅक मा अगदी यशस्वीपणे सत्यात उतरवू शकले.
इन्फोसिसची यशोगाथा – कोण बनला करोडपती…?…
जॅक मा (Jack Ma) आणि इंटरनेटचा किस्सा –
- जॅक मा त्यांच्या एका मुलाखतीत तेव्हाचा एक किस्सा सांगतात जेव्हा चीनमधील लोक या गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हते की ‘इंटरनेट’ सारखं काहीतरी अस्तित्वात आहे.
- हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी त्यांच्या मित्रांना एकदा घरी बोलावले होते.
- “त्यावेळी डायल-अप कनेक्शन खूप हळू चालायचं आणि त्यावेळी आम्ही अर्धे पान पडद्यावर येण्यासाठी जवळ जवळ साडे तीन तास वाट पहिली होती, तोपर्यंत आम्ही खाणं-पिणं, गप्पा, पत्ते खेळणे हे करत वाट पहात होतो, पण मला अभिमान आहे की ‘इंटरनेट’चं अस्तित्व त्यावेळी मी सिद्ध करू शकलो.”
अलिबाबा.कॉम –
- सन १९९९ मध्ये आपली १७-१८ मित्रांसोबत जॅक मा यांनी अलिबाबा.कॉम या बिझनेस-टू-बिझनेस व्यवसायावर आधारित वेबसाईटची सुरुवात केली.
- सुरुवातीला बाहेरच्या गुंतवणूकदरांनी यामध्ये एकही छदाम दिला नाही. परंतु सॉफ्ट बँकेकडून २० दशलक्ष डॉलर्स आणि गोल्डमन सच्सकडून ५ दशलक्ष डॉलर्स मिळवले.
- अलिबाबाच्या सुरुवातीच्या काळात ऑनलाईन पैसे भरून वस्तू घरपोच मिळतात हा विश्वास चीनच्या जनतेमध्ये निर्माण करणे हे जॅक मा यांच्यासाठी खूप मोठे आव्हान होते.
- जॅक मा त्यांच्या आठवणींना उजाळा देताना सांगतात, “सुरुवातीला ऑफिसमध्ये सात कर्मचारी होते. पहिले २ आठवडे वेबसाईटवर रजिस्टर होणाऱ्या सर्व वस्तू आम्ही खरेदी केल्या आणि ही कार्यपद्धती उपयुक्त आहे असा विश्वास लोकांना दिला. आमच्या २ खोल्या अशा वस्तूंनी भरल्या होत्या ज्या आमच्यासाठी काहीही उपयोगाच्या नव्हत्या.”
आकाशाला गवसणी घालणारी स्वप्ने-
- जॅक मा यांची स्वप्न खूप मोठी होती आणि म्हणूनच त्यांनी अलिबाबाच्या स्थापनेनंतर काही दिवसातच एका प्रेस कॉन्फरेन्स त्यांनी सांगितलं होत की, ” आम्हाला चीनमध्यें सर्वोत्तम व्हायचं नाहीये तर जगात सर्वोत्तम व्हायचं आमचं स्वप्न आहे.”
- त्यांच्या आणि अलिबाबाच्या उज्ज्वल भवितव्याबद्दल त्यांना इतकी खात्री होती की कम्पनीचा इतिहास नंतर पाहता यावा म्हणून त्यांनी फेब्रुवारी, १९९९ मध्ये त्यांच्या साध्याशा अपार्टमेंट घेतलेली एक मिटिंग देखील रेकॉर्ड करून ठेवली होती.
- “पुढच्या पाच ते दहा वर्षांमध्ये अलिबाबा चे भवितव्य काय असेल?” या स्वतःच्याच प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले होते की, “आमचे स्पर्धक चीनमध्यें नाही तर सिलिकॉन व्हॅली मध्ये आहेत… आपण अलिबाबाकडे एक आंतरराष्ट्रीय वेबसाईट म्हणून पाहिलं पाहिजे.”
जॅक वेल्श – उद्योग जगतातील एक “हरवलेला तारा”…
- जॅक मा (Jack Ma) गुंतवणूकदारांना भेटताना त्यांच्यासमोर पूर्ण अहवाल सादर करतातच असं नाही कारण मा यांच्या मते, ‘नियोजन अपयशाला कारणीभूत ठरतं, तर योजनेशिवाय यश मिळतच.’
- गुंतवणूकदारांना ही विचारसरणी पचवणं फारच कठीण जात असे. यावर मा यांचा असं म्हणणं होतं की, “याहू, ऍमेझॉन हे देखील सर्वगुणसंपन्न नाहीयेत, आम्ही अजूनही आमच्यातील ‘सर्वोत्कृष्ट’च्या शोधात आहोत.”
- ऑक्टोबर १९९९ आणि जानेवारी २००० दोनदा एकूण २५ दशलक्ष डॉलर्स इतकी रक्कम व्हेंचर कॅपिटल मिळवले.
- जॅक मा यांच्या यशाचे आणखी एक रहस्य म्हणजे नवीन कल्पना, नवीन विचार यांचा स्वीकार करून सतत विविध क्षेत्रात प्रयत्नशील राहणे.
- २००३ मध्ये मा यांनी ताओबाओ मार्केटप्लेस, अलिपे, अली मामा आणि लीनक्स अशा प्रकल्पांची सुरुवात केली.
- २०१४ मध्ये अलिबाबा ही २५ शतकोटी डॉलर्स घेऊन ‘न्यू यॉर्क स्टॉक एक्सचेंज’मध्ये आयपीओ (IPO) ही सर्वांत मोठी आयपीओ म्हणून नोंदवली गेल्यानंतर अलीबाबा ही तांत्रिक क्षेत्रातील जगातील सर्वांत मोठी कंपनी बनली.
१० सप्टेंबर २०१८ मध्ये जॅक मा यांनी अलिबाबा ग्रुपच्या अध्यक्ष पदावरून निवृत्ती घेऊन संस्थेच्या माध्यमातून आपले पूर्ण लक्ष परोपकार, समाजकार्यावर केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. आता अलिबाबाची धुरा डॅनियल झांग यांच्या हाती आहे.
Download Arthasaksharr App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Share this article on :