Arthasakshar Explain Digital detox in Marathi
https://bit.ly/2VdHnvM
Reading Time: 3 minutes

डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय ? 

डिजिटल डिटॉक्स (Digital Detox) ही अलीकडच्या काळात उदयास आलेली संकल्पना आहे. मोबाईल, कम्प्युटर, आयपॅड यासारख्या गॅजेट्सच्या अति वापराच्या सवयीमुळे माणसाचा आसपासच्या जगाशी तुटलेला संपर्क, त्यामुळे निर्माण होणारे मानसिक असंतुलन अशा अनेक कारणांमुळे डिजिटल डिटॉक्स या संकल्पनेची गरज भासू लागली. 

सोशल मीडियाचे व्यसन सोडविण्याचे १० उपाय…

डिजिटल डिटॉक्स (Digital Detox)-

  • डिजिटल डिटॉक्स (Digital Detox) म्हणजे अशा या काल्पनिक जगा मधून बाहेर पडून वास्तविक जगाचं महत्व समजून आपल्या घरातले लोक,आपल्या आसपासचा समाज, आपले नातेवाईक यांच्याशी चांगले ऋणानुबंध निर्माण करणे आणि प्रत्यक्ष जगातील सामाजिक बांधिलकी जपणे. 
  • डिजिटल म्हणजे आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये म्हणायचं म्हणलं तर वास्तविक किंवा काल्पनिक जग असं म्हणूया आणि डिटॉक्स करणे म्हणजे अगदी शब्दशः सांगायचं, तर निर्विषीकरण करणे म्हणजे शुद्धीकरण करणे.  
  • या अवास्तविक काल्पनिक जगामध्ये आपण इतके हरवून जातो की वास्तविक जगाचं भान नाही आपल्याला राहत नाही. 
  • सोशल मीडियावर आपण एखादी पोस्ट टाकली आणि त्याला आपल्या अपेक्षेप्रमाणे लाईक व कमेंट्स नाही मिळाल्या थोडक्यात लोकांचा म्हणावा तसा किंवा आपल्याला अपेक्षित असणारा प्रतिसाद नाही मिळाला, तर काहीजण अस्वस्थ होतात. काहीजण घाबरून जातात तर, काही बेचैन होतात.
  • या काल्पनिक जगाशी आपण इतके जोडले गेलो आहोत की या सगळ्या गोष्टी काल्पनिक आहेत हेच अनेकवेळा विसरतो.
  • काहीजणांना कल्पना आणि वास्तव यामधला फरकच कळेनासा होतो. अनेकजण सोशल मीडियाचं जग हेच वास्तव समजायला लागतात आणि त्यामध्येच रममाण होतात.  
  • सोशल मीडियाचा नियमित वापर करणारा प्रत्येकजण थोड्याफार फरकाने या काल्पनिक जगाच्या आहारी गेलेले आहेत किंवा त्याचं व्यसन लागले आहे. 
  • यामुळे काय होतं की आपल्या वास्तव जगाशी संपर्क खूप कमी होतो. हे टाळण्यासाठी डिजिटल डिटॉक्स या संकप्लनेची अत्यंत आवश्यकता भासू लागली आहे.
  • डिजिटल डिटॉक्सचा एकच नियम आहे की यादरम्यान फोन, टीव्ही, कॉम्प्युटर, टॅबलेट आणि सोशल मीडिया यांचा वापर पूर्णपणे टाळायचा.
  • डिजिटल डिटॉक्सचा अर्थ आहे या टेक्नॉलॉजी पासून लांब राहून आपल्या वास्तविक जगातील प्रश्न, घडणाऱ्या घटना यावर लक्ष केंद्रित करायचं आणि वास्तविक जगाशी आपला संपर्क जास्त वाढवायचा. 

तुम्ही मोबाईल ॲडिक्ट आहात का?…

डिजिटल डिटॉक्सची कारणे:

  • अमेरिकेतील नेल्सन कंपनीने केलेल्या सर्व्हेनुसार अमेरिकेतील तरूण दिवसभरातले अकरा तास काहीतरी पाहणे, ऐकणे, वाचणे अशा विविध प्रकारे या माध्यमाच्या सानिध्यात व्यतित करतात.
  • डिजिटल डिटॉक्सची बरीच कारणे आहेत. यामध्ये महत्त्वाचे कारण म्हणजे आपण स्वतःला, आपल्या कुटुंबाला, मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना वेळ देऊ शकत नाही.
  • याचा परिणाम म्हणजे आपण आयुष्यातल्या कितीतरी चांगल्या क्षणांचा अनुभव घेतच नाही आणि अवास्तविक जगात निर्माण होणाऱ्या अकारण ताणतणावाला आमंत्रण देतो.
  • आश्चर्याची गोष्ट म्हणजे अगदी लहान मुलेही याच परिस्थितीतून जात आहेत. सतत मोबाईल वर असणे किंवा सतत टीव्ही पाहणे, लॅपटॉपचा अतिवापर या सगळ्यामुळे त्यांच्या शरीरावर, मनावर, बौद्धिक विकासावर, शारीरिक हालचालींवर अत्यंत वाईट परिणाम होताना दिसत आहे.
  • या आभासी जगाव्यतिरिक्तही वास्तविक जग आहे आणि ते जास्त महत्त्वाचे आहे याची जाणीव या मुलांना होणं हे अत्यंत गरजेचे आहे.
  • आज अनेक जण या आभासी जगाच्या इतके आहारी गेले आहेत की त्यांच्यासाठी हे एक व्यसन झाले आहे आणि यातून बाहेर पडण्यासाठी अक्षरशः व्यसनमुक्ती केंद्रांची मदत घ्यावी लागते आहे. 
  • वरवर पाहता सामान्य वाटणाऱ्या या गोष्टी इतक्या थराला जाऊ नयेत यासाठी वेळीच सावध होऊन डिजिटल डिटॉक्स करणं अत्यंत आवश्यक आहे. ज्यामुळे आपल्याला वास्तवाचे भान राहून आपले बरेच प्रश्न सुटतील.
  • डिजिटल डिटॉक्स केल्यानंतर आयुष्यातले कितीतरी चांगले क्षण आपल्याला अनुभवता येतील आणि आपल्या कामात, आपल्या जीवनामध्ये प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणे शक्य होईल आणि जीवन आनंददायी बनेल. 

काय आहे पॅरेटो सिद्धांत? (८०/ २० चा नियम)…

डिजिटल डिटॉक्सचे फायदे:

  • डिजिटल डिटॉक्स केल्यानंतर अनेक मुलांमध्ये सकारात्मक बदल दिसू लागले.
  • मनोरंजनासाठी टेक्नॉलॉजीवर अवलंबून राहण्याची गरज नाही आणि त्याशिवायही अनेक पर्याय उपलब्ध आहेत याची जाणीव मुलांना झाली.
  • मुलांमध्ये इतरांच्या भावना समजून घेण्याची क्षमता वाढली.
  • एकमेकांशी संवाद कसा साधायचा आणि तो असणे किती गरजेचे आहे याची जाणीव झाली.
  • चिडचिड कमी होऊन सामंजस्य  वाढले.

या ५ सवयी असतात यशाच्या मार्गातले सर्वात मोठे अडथळे…

लहानांप्रमाणे मोठ्यांनाही डिजिटल डिटॉक्सचा खूप फायदा झाला. डिजिटल डिटॉक्सनंतर अनेकांनी आयुष्यामध्ये सकारात्मकतेचा अनुभव घेतला.  आपल्या मुलांशी असणारे, पालकांशी, इतर नातेवाईक व मित्र-मैत्रिणींशी असणारे हितसंबंध खूप सुधारले. त्यामुळे मानसिक ताणतणाव कमी झाला. सहाजिकच यामुळे घरामधले वातावरणही आनंददायी झाले. डिजिटल डिटॉक्सने आयुष्यामध्ये खूप चांगला बदल घडवून आणला.

Web title:  What is Digital Detox? 

Download Arthasaksharr App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web Search: What is Digital Detox in Marathi, Digital Detox info in Marathi, Digital Detox mhanaje kay 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutes बी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutes बी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…