Arthasakshar UPI Fraud in marathi
https://bit.ly/3dJXqIc
Reading Time: 2 minutes

युपीआय (UPI) च्या माध्यमातून व्यवहार करताय ? सावधान…

सध्या युपीआय (UPI) च्या माध्यमातून हे व्यवहार करणे कमी त्रासाचे आणि जास्त विश्वासार्ह मानले जात आहे. परंतु अशा वेळी या माध्यमातून अनेक फसवाफसवीच्या (Fraud) घटनाही समोर येत आहेत.

‘कोरोना’ महामारीच्या काळात प्रतिबंधात्मक उपायांपैकी एक म्हणजे पैशांची प्रत्यक्ष देवाण-घेवाण टाळणे आणि म्हणूनच आज रोज अगदी किराणा मालाचे पैसे देण्यापासून ते डॉक्टरांची फी, ते अगदी टपरीवरच्या चहाचे पैसे सुद्धा या डिजिटल माध्यमातूनच दिले जात आहेत. परंतु युपीआय वापरताना होणार एका क्षणाचा निष्काळजीपणा बँक खात्यातून मोठी रक्कम गायब करू शकतो. अर्थात यामध्ये युपीआय (UPI) च्या कार्यपद्धतीमध्ये काहीही दोष नाही, परंतू याच्या वापर करताना आवश्यक ती काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. 

सायबर सुरक्षा – इंटरनेट वापरताना कुठे क्लीक करताय ?…

एचडीएफसी बँकेने युपीआय पर्यायाचा वापर करणाऱ्या आपल्या ग्राहकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे की Anydesk सारख्या डिव्हाईस नियंत्रण पच्या माध्यमातून हॅकर्स युजर्सच्या बँक खात्यातून युपीआय माध्यमातून पैशांची चोरी करत आहेत

अशा फसवाफसवी पासून कसं सावध राहायचं?

कोणत्या विविध प्रकारातून हे युपीआय मधून फसवाफसवीची प्रकार केले जातात?

यासाठी कशी सावधानता बाळगायची? युपीआय फसवाफसवी (UPI Fraud) पासून स्वतःला कसे वाचवाल? हे समजून घेऊया.  

तुमचा मोबाईल सुरक्षित आहे का?…

१. फिशिंग (Phishing):

  • फसवाफसवी करणारे लोक तुम्हाच्या चुकीच्या मेल ऍड्रेस वरून मेल किंवा एसएमएस पाठवतात त्यामध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करायला सांगतात.
  • या लिंकवर क्लिक केल्यावर एका बनावट वेबसाईट वर आपण पोहोचतो आणि त्यावर जर आपण आपली काहीही माहिती म्हणजे पासवर्ड वगैरे दिले, तर त्या माध्यमातून आपल्या खात्यातील पैशांची चोरी होऊ शकते.
  • ही बनावट वेबसाईट खऱ्या वेबसाईटशी बऱ्याच प्रमाणात मिळतीजुळती असते.
  • यासाठी आपण नक्की कोणत्या वेबसाईट वर पोहोचलो आहोत याची खात्री करून घेणे फारच आवश्यक असते. उदा. www.my.banker.com ही बनावट वेबसाईट आहे, तर खरी वेबसाईट आहे www.mybanker.com अशी आहे.
  • यासाठी तुमच्या बँकेची, स्टॉक ब्रोकरची वेबसाईट, तुमचा यूजर आयडी . गोष्टींची नोंद तुमच्याजवळ कायम ठेवा म्हणजे अशा फसवाफसवीचा तुम्ही बळी होणार नाही.
  • याशिवाय अशा बनावट वेबसाईट वर क्लिक केल्यावर तो एखादा असा व्हायरसही असू शकतो जो तुमच्या फोनमध्ये जाऊन तुमची सर्व वैयक्तिक आणि विश्वासार्ह माहिती चोरले ज्याच्या आधारावर तुमच्या खात्यातील पैसे चोरता येऊ शकतील.
  • तुमच्या बँकेचा कस्टमर केअर नंबर गुगल वर शोधण्यापेक्षा शक्य त्या इतर विश्वासार्ह मार्गाचा अवलंब करा.त्या सर्च मधील नंबर हा एखाद्या बनावट कॉल सेंटरचाही असू शकतो.
  • अजून एक पद्धत म्हणजे तुम्हाला बँकेचा प्रतिनिधी आहेत असं सांगणारा बनावट कॉल येतो आणि त्याद्वारे तुमची वैयक्तिक माहिती विचारली जाते ज्याचा वापर करून तुमचा युपीआय (UPI) पिन बदलता येऊ शकतो. 

सायबर सुरक्षेसाठी काही महत्वाच्या टिप्स…

२. रिमोट स्क्रीन मिररिंग (Remote screen mirroring):

  • आजकाल जवळ जवळ सर्वच जण घरून काम करत आहेत. यासाठी विविध ॲप्लिकेशन्सचा वापर केला जात आहे.
  • यामध्ये रिमोट स्क्रिन मिररिंग अँप्सदेखील असतात ज्याच्या माध्यमातून तुमचा मोबाईल अथवा लॅपटॉप वायफायला, मोठ्या पडद्याला उदा. स्मार्ट टीव्ही ला जोडला जातो.
  • या ॲप्समुळे तुमचा पूर्ण फोन किंवा लॅपटॉपचा ताबा समोरच्या व्यक्तीला मिळत असतो आणि ते तुमच्या डिव्हाईस मधील सर्व महत्वाच्या माहितीचा वापर तुमच्या खात्यातील पैसे चोरण्याचा उद्देशाने करू शकतात.
  • यामध्ये तुम्हाला बँक प्रतिनिधी आहे, असं सांगून एखादे अनव्हेरीफाईड ॲप्लिकेशन डाउनलोड करायला सांगून, त्यावर तुमचे बँक व्हेरिफिकेशन द्यायचे आहे असे सांगण्यात येते. त्यानंतर आवश्यक ती सर्व माहिती काढून घेतली जाते.
  • या माहितीच्या आधारे तुमच्या बँकेच्या खात्यातून पैसे चोरले जाऊ शकतात.
  • या सर्वांवर उपाय म्हणजे सावधानता बाळगणे आणि आपला युपीआय पिन, ओटीपी कोणासोबतही शेअर करू नका. 

आपले आवडते ई-वॉलेट कितपत सुरक्षित आहे?…

युपीआय फ्रॉड (UPI Fraud) पासून तुम्हाला जर का कोणी वाचवू शकत असेल तर ते फक्त तुम्ही स्वतः! तेव्हा युपीआय व्यवहार करताना काळजीपूर्वक व्यवहार करा.  सर्व नियम पाळून व सर्वोतपरी काळजी घेऊन व्यवहार केल्यास तुम्हाला कोणीही फसवू शकत नाही.

Download Arthasaksharr App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: UPI Fraud info in Marathi, What is UPI Fraud in Marathi, How to protect yourself From UPI Fraud Marathi mahiti

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.