Reading Time: 3 minutes

अचानक नोटबंदी जाहीर झाली आणि ५०० -१००० च्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या. जुन्या नोटा बंद झाल्यामुळे ८६℅ रोख रक्कम चालू चलनातून वजा झाली. या अशा परिस्थितीत आपण पाहिले असेल की कित्येक छोटे किेवा किरकोळ दुकानदार देखील रोख रक्कम नसल्याची कारणे देत होता, हे सगळं जरी असलं तरी आपल्या दैनंदिन जीवनात मूलभूत गरजांसाठी प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे पैसे खर्चावेच लागतात. 

डिजिटल पेमेंट म्हणजे काय?

एटीएम समोर लांबच्या लांब रांगा पाहून सामान्य वर्ग गोंधळून गेला, मग लोक डिजिटल पेमेंटचा विचार करू लागले. याला प्रोत्साहन म्हणून मोदी सरकारने ‘कॅशलेस इंडिया’ सारख्या योजनाही आणल्या. आकर्षक कॅशबॅक ऑफर्स आणि ई-वॉलेटमुळे मिळणा-या सवलती पाहून ग्राहक वर्ग ऑनलाइन खरेदी व कॅशलेस पेमेंटकडे वळला. 

ऑनलाइन व्यवहार जास्तीत जास्त वाढला. याचे फायदे आहेतच पण काही तोटे ही दिसू लागले कारण ऑनलाइन व्यवहारात काही फसवणूकही दिसू लागली. म्हणून आपल्या वापरत असलेले ई-वॉलेट सुरक्षित आहे का? याची पडताळणी करणे आवश्यक आहे. 

जानेवारी २०१९ पासून, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) मोबाइल किंवा ई-वॉलेट मधून केलेल्या व्यवहारांवर काही नियम ठरवून दिले आहेत, ज्याद्वारे अनधिकृत व्यवहारांवर बंधने आली आहेत. 

कॅश – लेसकॅश ते कॅशलेस

  • सर्व व्यवहारांवर लक्ष रहावे यासाठी एसएमएस सुविधा सुरू करण्यात आली, म्हणून ई-वॉलेट सोबत मोबाईल क्रमांक आणि माहिती मिळण्यासाठी ई-मेल आयडी जोडणे आवश्यक आहे.
  • फसवणूक किंवा कोणतीही ऑनलाइन चोरी आढळल्यास तक्रार नोंदवण्यासाठी २४×७ ग्राहक सेवा क्रमांक उपलब्ध आहे. यासाठी त्यांचा हेल्पलाइन क्रमांक देखील देण्यात आला आहे. 
  • या फसवणूकीच्या प्रकरणाची नोंद जर तीन दिवसात केली तर संपूर्ण रक्कम परत केली जाते. जर चार ते सात दिवसात नोंद केली, तर व्यवहाराची रक्कम किंवा १०,००० रूपये जे कमी असेल ते परत केले जातात. 
  • सात दिवसांनंतर नोंद करण्यात आली, तर परत मिळणारी रक्कम त्या ई-वॉलेट कंपनीच्या आरबीआय धोरणाप्रमाणे असेल. बहुतेक सर्व नामांकित ई-वॉलेट कंपन्या आरबीआयकडून ठरवून दिलेल्या सुरक्षेबाबतच्या सर्व नियमांचे पालन करतात. 
  • मोबिक्विक सारख्या ई-वॉलेटने आयफोनवर चालणा-या ॲपवर फिंगरप्रिंट नावाचं वैशिष्ट्यपूर्ण अधिप्रमाण आणलं आहे, लवकरच ते अँड्रॉईड फोनवरील पवर सुद्धा लागू होईल. 
  • पण ई-वॉलेट वापरून जेव्हा कुठलाही व्यवहार करताना सावधगिरी म्हणून वजा झालेल्या पैशाची पुन्हा तपासणी करून घ्या. ही सवय असणे चांगले. 
  • जर वापरकर्ता ई-वॉलेटद्वारे वारंवार मित्रांचे किंवा नातेवाईकांचे रिचार्ज करत असेल, तर प्रत्येकवेळी नंबर टाईप करण्याऐवजी ड्रेस बुक वापरू शकतो. 
  • बऱ्याच लोकांना हे माहित नाही की हे वॉलेट वापरणे क्रेडिट कार्डपेक्षा अधिक सुरक्षित असू शकते, अगदी वीट आणि सिमेंट खरेदीसाठी सुद्धा. मोबाईल ई-वॉलेट वापरताना मोबाइल आपल्या हातातच राहतो व आपण आपल्याला हवी तेवढी रक्कम प्रविष्ट करू शकतो. 

‘गुगल पे’ची ओळख – क्षणार्धात पैसे पाठवायचे सोयीस्कर ॲप

डिजिटल पेमेंट्सची वैशिष्ट्ये-

. एन्क्रिप्शन तंत्रज्ञानाचा वापर –

  • हल्ली काही लोकप्रिय ई-वॉलेट्स जास्त वापरात आले आहेत व लोकांचा त्यावर विश्वास बसला आहे. 
  • डिजिटल पद्धतीने केलेला व्यवहार हा क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डच्या पारंपरिक स्वाईप पेमेंट पद्धत वापरण्यापेक्षा सुरक्षित आहे. 
  • ई-वॉलेट्स वापरून केलेल्या व्यवहारांसाठी सुरक्षा म्हणून आधुनिक एन्क्रिप्शन तंत्रज्ञानाचा वापर करून ती प्रक्रिया आणली आहे. 
  • क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड मात्र व्यापारी किंवा दुकानदाराकडूनच स्वाईप करावे लागते यासाठी कुठलेही एन्क्रिप्शन नाही. म्हणून ई-वॉलेट्स द्वारे सुरक्षित व्यवहार होऊ शकतो. 

२. केवायसी- 

  • फिंगरप्रिंट किंवा पिन नंबर प्रविष्ट केल्यानंतरच ई-वॉलेट्स चे प वापरता येते.तसेच हे प वापरण्यासाठी एन्क्रिप्शन दिले जाते. सरकारी नियमांनुसार ई-वॉलेट वापरणा-या ग्राहकांना आपली ओळख दर्शवण्यासाठी केवायसी सादर करणे बंधनकारक केले आहे. 
  • आपले ओळखपत्र, पासपोर्ट, आधारकार्ड अशा कागदपत्रांचा समावेश केवायसीमध्ये होतो. या सर्व कागदपत्रा़ची पूर्ण तपासणी करूनच ई-वॉलेट वापरण्याची परवानगी मिळते. 
  • ई-वॉलेटशी जोडलेल्या खात्यातील पैसे बँकेतून काढता येतात, ते पैसे ज्या व्यक्तीने काढले आहे त्याची ओळख केवायसीमध्ये असलेल्या कागदपत्रांची जुळवून तपासण्यात येते. 
  • इ -वॉलेट वापरणे सुरक्षित असले, तरी याची १००% खात्री देता येत नाही कारण आपली वैयक्तिक माहिती कितीही सुरक्षितपणे संचयित केली, तरी कुठल्याही पैश्याच्या व्यवहारामध्ये धोका असतोच. 

सावधान !! ऑनलाईन फ्रॉड कॉल…

आपले ई-वॉलेट शक्य तितके सुरक्षित ठेवण्यासाठी काय कराल?

१. सुरक्षित पिन नंबर वापरा: 

  • सहा अंकी पिन नंबर निश्चित करा जो तुमची किंवा अन्य कोणत्या जवळच्या व्यक्तीची जन्मतारीख नसावी .         
  • पिन नंबर फक्त तुम्हालाच माहित असावा.

. आपण वापरत असलेले साधन किंवा मोबाईल लॉक करा 

  • तुमचा मोबाइलला लॉगइन किंवा पुन्हा लॉगइन करताना मोबाइलचा पासवर्ड विचारल्यामुळे सुरक्षेचा आणखी एक स्तर तयार होतो. 
  • फिंगरप्रिंट सकॅनिंगचा पर्याय असेल, तर अजुनच चांगले .

३. लॉगऑऊट करा

  • जर इतर कुठल्या डीव्हॉईस वरून लॉगिन केला असेल, तर लॉगऑऊट करणे विसरू नका .
  • आपण केलेला आथिर्क व्यवहार तपासून पहा आणि काही शंका आल्यास पिन नंबर बदला .
  • आपल्या खात्याची कुठलीही माहिती कोणाला सांगू नका . 

डीजिटलायझेशन आणि रोजगाराच्या संधी

इ-वॉलेट वापरणे सोयीचे आहे व यावरून केले जाणारे व्यवहार जलदगतीने देखील होतात.  पण याच्या सुरक्षेसाठी वर दिलेल्या मुद्द्यांचा विचार करा व ऑनलाईन खरेदी असो किंवा इतर व्यवहार यांचा आनंद घ्या. 

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimerhttps://arthasakshar.com/disclaimer/  

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.